हाक

Submitted by मउ on 17 March, 2018 - 07:11

कधीतरी बोलुन बघ,
मनाचे कवाड खोलुन बघ
मी तिथेच आहे पूर्वीसारखी
मला पुन्हा आजमवुन तर बघ..

बीझी आहेस थोडा
कळत रे मला
माझ्यासाठी पण
थोडा वेळ काढून तर बघ..

माझे प्रेम अजूनही आहे
तसेच आणि तेवढेच
पूर्वीची ती प्रीत आठवून तर बघ..

पुन्हा तशीच पहिल्यासारखी हाक मारुन तर बघ ........
--------- मयुरी महाडीक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निरागस, लोभसवाणी कविता

ह्या विषयावर गझलेच्या माध्यमातून अनेकांनी खूप लेखन केलेले आहे

नितळपणे व कारागिरी न करता उतरलेली रचना