करत बसा महिला दिन साजरे

Submitted by बेफ़िकीर on 13 March, 2018 - 13:12

ज्याने कारकीर्दीत एकदाच इंग्लंडच्या बॉब विलीसच्या एका षटकात सहा चौकार मारले, काही अचूक निरुपयोगी चांगल्या खेळी खेळल्या आणि संघात पुन्हा स्थान मिळावे म्हणून षटकार नावाचे पाक्षिक काढून गावसकर आणि शास्त्रीचे पाय चाटले त्या संदीप पाटील नामक सुमार फलंदाजाचा एक शो सध्या लिव्हिंग फूड्झ की अशा काहीतरी नावाच्या वाहिनीवर येतो.

त्याने आज त्या वाहिनीवर मिताली राज आणि महिला संघाची द्रूतगती गोलंदाज (की कोणीतरी) (नांव माहीत नाही) ह्यांची मुलाखत घेतली.

हा कार्यक्रम स्टेज्ड असून विविध खाद्यपदार्थ बनवण्याबाबत आहे, हे ठीक!

जे प्रश्न विचारले त्यातील काही:

१. तुम्ही घरी कोणत्या डिशेस बनवू शकता? - नाही बनवू शकल्या तर काय??

२. डेटिंग करायचे झाले तर कोणत्या क्रिकेटर बरोबर कराल? - का? नसले करायचे तर? क्रिकेटर बरोबर नसले करायचे तर??

३. धोनीच्या हातून पुरस्कार स्वीकारताना कसे वाटले? - काही का वाटावे? मिताली राजने स्वतःचे 'राज'प्रस्थापित केलेले आहे.

आय पी एल च्या कुठल्यातरी क्ष खेळाडूला मिळणार्‍या मानधनाच्या तुलनेत मितालीचे (की मिथालीचे?) मानधन अक्षरशः नगण्य आहे. (हे रसप उर्फ रणजीत पराडकरची फेसबूकवरील पोस्ट वाचून मीही म्हणत आहे).

ह्या मितालीने गाजवलेले कर्तृत्व संदीप पाटीलच्या कर्तृत्वाच्या तुलनेत कितीतरी मोठे आहे.

हा स्टेज्ड शो असल्याने बिचार्‍या एक्स्पोजर तरी मिळते म्हणून आल्या असतील.

हा संदीप पाटील काय करतोय तिथे? त्या जागी गावसकर किंवा शास्त्रीला घ्या म्हणावं!

बख्श दो यार!

============

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

२. डेटिंग करायचे झाले तर कोणत्या क्रिकेटर बरोबर कराल?
>>>>

संदिप पाटीलला चक दे दाखवायला हवा.

अर्थात ते प्रश्न त्याने स्वत: लिहिले नसतील. पण तरी त्याला स्वत:ची अक्कल हवी. नसेलच. प्रसिद्धीसाठी तो पण काहीही करू शकतो हे एकदा मागे दिसलेले. मी निवडसमितीवर असताना सचिनला संघाबाहेर काढणार होतो असे तारे तोडले होते.

बाकी संदिप पाटील माझ्या काळातील खेळाडू नसल्याने त्याच्या कर्तबगारीबद्दल फारसे ठाऊक नाही.
षटकार मधून गावस्कर शास्त्री चापलूसी करणे ही नवीन मजेशीर माहिती मिळाली.

अरे हो, सध्या महिला क्रिकेटची सचिन तेंडुलकर मिताली राज आणि एकूणच महिला क्रिकेटला तुलनेत चांगले दिवस आलेत. आमच्या क्रिकेट व्हॉटसपग्रूपवर त्यांच्या सामन्यांचीही चर्चा होते हे विशेष.

ऋन्मेष, ती महिला क्रिकेटची सचिन तेंडुलकर नाहीये. ती मिताली राज आहे.
बेफी भावना पोचल्या. हे असं बरेचदा होतं.

महिला क्रिकेटची सचिन तेंडुलकर या उपाधीत काही गैर नाही.
अश्या उपाध्या देणे कॉमन आहे.
पुरुषापुरुषांमध्येही आपापसात देतातच. दोन वेगळ्या देशात वा दोन वेगळ्या पिढ्यांमध्ये. यात फक्त समानता दाखवली जाते. आणि गौरवच केला जातो.

हे क्रिकेटच नाही तर प्रत्येक क्षेत्रात चालते. याच धर्तीवर बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीचीही उदाहरणे देऊ शकतो. पण धागा भरकटायचा Happy

हा संदीप पाटील काय करतोय तिथे? त्या जागी गावसकर किंवा शास्त्रीला घ्या म्हणावं! >>
पण शो तर खाद्यपदार्थांचा आहे ना? मग ह्या दोघांचं काय कर्तुत्व आहे ह्या क्षेत्रात (हा कार्यक्रम स्टेज्ड असून विविध खाद्यपदार्थ बनवण्याबाबत आहे, हे ठीक! हे लेखातच लिहिलय)

रुन्म्या तुझे इंग्रजीचे ज्ञान जेमतेम ऐवजी चिंधीभर असल्यामुळे रवी शास्त्रीची इंग्लिस रनिंग कॉमेंट्री तुझ्या डोक्यावरुन जात असणार. अन्यथा शास्त्रीची कमेंट्री मधे सचिन चे २००, भारताने जिंकलेल्या वर्ल्डकप फायनलची शेवटची ओव्हर, इ. कॉमेंट्री ऐकण्यासारखी आहे. अर्थात गागुचका आहेच म्हणा Wink

आणि शास्त्री माझा लाडका आहे.
लहानपणी त्याचा आणि अक्रमचा शाझ आणि वाझ कार्यक्रम मी आवडीने बघायचो. मला अश्या ऑलटाईम स्मार्ट लोकांचे फार कौतुक वाटते Happy

सचिनच्या 200 वेळी.. फर्स्ट मॅन ऑन द अर्थ .. सुपरमॅन फ्रॉम ईंडिया.. वगैरे शास्त्रीचे बोल शारजाच्या टोनी ग्रेग सारखेच कानात बसून आहेत Happy

हा कार्यक्रम झी वर यायचा बहुतेक, नांव विसरलो. संदिप पाटिलला स्वैपाक करायची आवड आहे, एक पुस्तक हि लिहिलेलं आहे त्याने. या कार्यक्रमात भाग घेणार्‍यांना ते पुस्तक भेट म्हणुन तो देतो; म्हणुन कार्यक्रमाचा तो होस्ट आहे. गावस्कर, कपिल, श्रिकांत, किरमाणी, जिमी अमरनाथ इ. आलेले एपिसोड्स मस्त आहेत.

आता सुमार बॅटिंग विषयी - क्रिकेटचं काय आहे, फक्त एखादी खेळी किंवा मोठ्ठाले रेकॉर्डस लक्षात रहातात. बोलरवर तुटुन पडण्याची जिगर आणि अबिलिटी कालांतराने लोकांच्या विस्मरणात जाते. गावस्कर-विश्वनाथच्या जमान्यात धुवांधार बॅटिंग काय असते ते पाटिलने इंट्रोड्युस्/एक्झिक्युट करुन दाखवले. मी मुंबईचा असल्याने पाटिलची बॅटिंग कांगा लिग पासुन रणजी-टेस्ट क्रिकेट पर्यंत पाहिलेली आहे. एफर्ट्लेस, ऑन-डिमांड सिक्सर दुराणी नंतर बहुतेक फक्त पाटिलनेच डिलिवर केलेले आहेत. त्याचा आक्रमक (थोडाफार खडुस) स्वभाव (ऑन्/ऑफ फिल्ड) पुढे त्याच्या प्रगतीच्या आड आला असावा.

चापलुशी विषयी - मी वर लिहिल्याप्रमाणे पाटिलचा स्वभाव "खाईन तर तुपाशी..." या कॅटगोरीत मोडणारा आहे. शास्त्री तर त्याच्या समोर बच्चा होता, पण संघात वर्णी लागावी म्हणुन गावस्करची दाढी कुरवाळ्णं हि तर खुप लांबची गोष्ट. खरं पहाता गावस्कर-पाटिल मध्ये एक प्रकारची सुप्त रायवलरी होती; दादर युनियन आणि शिवाजी पार्क जिमखान्यातुन (रिस्पेक्टिवली) खेळत असल्याने. Happy

त्या काळात गावस्करचा निळ्या डोळ्यांचा मुल्गा कोणाला ठरवायचंच असेल तर तो मान शास्त्रीला जातो... Proud

खरं पहाता गावस्कर-पाटिल मध्ये एक प्रकारची सुप्त रायवलरी होती; दादर युनियन आणि शिवाजी पार्क जिमखान्यातुन (रिस्पेक्टिवली) खेळत असल्याने. >>>>> षटकार, चंदेरी ( फिल्मी ) वगैरे सारखी पाक्षिके की साप्ताहीके, मी उड्या मारुन वाचायची. Proud Sad

त्या वेळी षटकार मध्ये मला वाटते की द्वारकानाथ संझगिरी की कुणा पत्रकाराने गावसकर- वेंगरसरकर वादा विषयी लिहीले होते. आणी त्यात दिलीप वर ( हो दिलीपच, मी त्याची फॅन आहे ) कसा अन्याय झाला ते लिहीले होते. गावसकर जाम भडकला होता. कारण त्याने दिलीपला बाजूला टाकले असा सपशेल आरोप होता त्यावर.

गावस्कर आणि कपिल असाही वाद असावा.
तसेच कपिल आणि सचिन असाही वाद असावा.
हे माझ्या सूक्ष्म नजरेने केलेले निरीक्षण आहे. जेव्हा हे लोकं आमने साममे येतात तेव्हा कम्फर्टेबल नसतात.

कल्पना नाही. पण गावस्करने वर्षभरापूर्वी धोनीने 2019 विश्वचषक खेळण्याला समर्थन दिले होते.

धोनीचा कप्तानीचा पत्ता मात्र शास्त्री कोहली जोडगोळीने कापला. पण नंतर धोनीनेही शहाणपणा दाखवत समझोता केला आणि संघहित साधले.

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात खेळाडूंमधल्या वाद-विवाद आणि दुष्मनीला फार जुनी परंपरा आहे. उदाहरणंच द्यायची झाली तर पार १९३१ सालच्या भारताच्या पहिल्या-वहिल्या टेस्ट दौर्‍यापासून देता येतील -

विझी - महराजा ऑफ पटीयाला
विझी - लाला अमरनाथ / सीके नायडू
सीके नायडू - अमरसिंग
लाला अमरनाथ - इफ्तीकार अलीखान पतौडी
अजित वाडेकर - मन्सूर अलीखान पतौडी
गावस्कर - कपिल देव / वेंगसरकर
अझरुद्दीन - मनोज प्रभाकर
सेहवाग - धोणी
गंभीर - कोहली

शेजारच्या पाकिस्तानमध्ये चटकन आठवणारी उदाहरणं म्हणजे
इमरान - जावेद मियांदाद
अक्रम - वकार

बाकी पार ब्रॅडमन - जॅक फिंगल्टन पासून ते मायकेल क्लार्क - सायमन कॅटीच, केव्हीन पीटरसन - स्ट्राऊस / अँडरसन / कूक / अँडी फ्लॉवर अशी बरीच उदाहरणं आढळतील

सिम्बा.... बेफिकिर महाशयांना अशा उघडयावरच्या बातम्या दिसत नाहीत का? पार कोपच्यातल्या एका टूकार च्यानलवरच्या एका टुकार शोमधल्या एका टुकार खेळातल्या दोन टुकार खेळाडूंमध्ये काय टुकार बोलणी चाललीत त्यावर हे इथे एक महाटुकार धागा काढतात.

ज्याने कारकीर्दीत एकदाच इंग्लंडच्या बॉब विलीसच्या एका षटकात सहा चौकार मारले, काही अचूक निरुपयोगी चांगल्या खेळी खेळल्या आणि संघात पुन्हा स्थान मिळावे म्हणून षटकार नावाचे पाक्षिक काढून गावसकर आणि शास्त्रीचे पाय चाटले त्या संदीप पाटील नामक सुमार फलंदाजाचा >> केवळ अज्ञान.
१. गावस्कर, संदीप व शास्त्री कधी रिटायर झाले हे पाहीले तरी वरील वाक्यातले अज्ञान समजून येते.
२. संदीपला सुमार फलंदाज म्हणण्यातील अज्ञान. संदीप सारखी खेळी अद्यापही ऑस्ट्रेलियात कुठल्याही भारतीयाने केली नाही.
३. ८३च्या विश्वकरंडक स्पर्धेत संदीपचे योगदान खूप मोठे आहे. त्यासाठी फक्त आकडेवारी पुरेशी नाही.

पाटील संघाबाहेर असताना षटकार नावाचे पाक्षिक काढून गावस्कर व शास्त्री ह्यांच्या स्तुतीपर कवने रचत असे, पुन्हा संघात येण्यासाठी

मिताली राज ची मुलाखत ह्याने काय घ्यावी

षट्कार हे पाक्षिक मी त्याच्या पहिल्या अंकापासुन ते शेवटचा अंक निघत असेपर्यंत नियमित वाचत असे. त्यामधे लेखक महाशय म्हणतात तशी स्तुतीपर कवने वगैरे काही नव्हती.

बाकी कोणाची मुलाखत कोणी घ्यावी याबद्दल काही निकष असतात का?

जे काही तीन प्रश्न लेखक महाशयांनी उधृत केले आहेत त्यात दुसरा खटकला, पण बाकीच्यामधे यांना काय खटकलं कळत नाही.