दुख्ख

Submitted by सोनाली ०४ on 10 March, 2018 - 03:53

मी पहिल्यादा इथे लिहित आहे. काही चुकल तर माफी असावी.... माझ्या वडिलाना २०१२ मधे कॅन्सर झाला होता ते २०१४ ला ओफ झाले.. तेव्हा मी जोब करत होते बहिणीने सगळ केल वडिलाच मला काहीच करता आल नाही. वडिल जेव्हा ओफ झाले तेव्हा त्यानच्याबरोबर कुनी नव्ह्त या गोष्टीचा मला आजही खुप त्रास होतोय. मी घरात सगळ्यात लहान असुन बहीणी मला शेअर करतात पण मी माझ्या मनातल दुख्ख त्याना सान्ग्त नाहि कारण मला रडायला येत बोलताना. तेव्हा परिस्थिती अशी होती कि मला जोब वर जाण भाग होत वडिल रिटायर्ड झाले होते. पण आता वाट्त की मी जोब सोडायला हवा होता.. वडिलानि आमच्या साठी खुप केलय. मी त्या लायकीची नाही अस वाट्त. कधी कधी अस वाट्त कि हे सगळ सोडुन वडिलान्कडे जाव आणि त्याची क्शमा मागावी खुप गिल्ट वाट्त.
मी अस काय कराव मला समजत नाही म्हणुन इथे लिहिले आहे. मी इथे अनोळ्खी आहे म्हणुन माझ्या भावना इथे मान्ड्ल्या. आज पर्यत मी हे कुणासमोरही व्यक्त नाही केल. माझ्या बहिणी माझ्या फ्रेन्ड सारख्या आहेत तरिही मी माझे मन नाहि मोकळे करु शकत आज इथे करत आहे

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तेव्हा परिस्थिती अशी होती कि मला जोब वर जाण भाग होत वडिल रिटायर्ड झाले होते.
<<
एक जबाबदारी निभावताना काही इतर गोष्टी आऊटसोर्स कराव्या लागतात.

तुम्ही जॉब करून वडीलांच्या उपचारांचा व घराचाही भार सांभाळत होता. ही वडिलांची सेवाच झाली. तेव्हा स्वतःला दोषी ठरवणार्‍या "गिल्ट" चे गाठोडे फेकून द्या. वडिलांनाही तुमचा अभिमानच वाटत असेल.

>>कधी कधी अस वाट्त कि हे सगळ सोडुन वडिलान्कडे जाव आणि त्याची क्शमा मागावी खुप गिल्ट वाट्त.<<

↑ हे असले विचारही डोक्यात येऊ देऊ नका.

आ.रा.रा. +१
त्याच बरोबर nimita यांची कॅन्सरची विजयगाथा वाचा. त्या स्वतः या रोगाशी लढून त्यातून बाहेर आल्या आहेत. यासर्वातून बाहेर पडण्यात त्यांना त्यांच्या सर्व कुटुंबाची कोणत्या ना कोणत्या प्रकारे साथ होतीच ! प्रचंड प्रेरणादायी आणि सकारात्मक लेख आहेत. खालच्या लिंक वर लेख आहेतः-
https://www.maayboli.com/node/65391

गिल्ट मानू नका.
प्रत्येक ठिकाणी आपण फ्रंट स्टेज ला पेशंट च्या बेड पाशी असूनच मदत करू शकतो असं नाही.बॅक एन्ड पण ज्याचं योगदान मोठं आहे अशी कामं भरपुर असतात.तुम्हाला जे जमत होतं तुम्ही केलंत, करण्याची इच्छा होती.हे बरंच आहे.

आ रा रा यान्च्याशी सहमत.

प्रत्येकाचे काही कर्तव्ये आहेत. मुला बाळान्ची, वडिलधार्‍यान्ची देखभाल हे अत्यन्त महत्वाचे आहेत तसेच हे सर्व मार्गाला लागण्यासाठी नोकरी/ धन्दा करुन पैसे कमावणे हे पण तितकेच महत्वाचे आहे. सर्व सोन्गे आणता येतात, पण पौशाचे नाही. वडिलान्ची सेवा करण्यासाठी तुम्ही तुमचा जॉब सोडला असता तर त्यान्ना ते नक्कीच आवडले नसते. कुठल्याही वडिलान्ना त्यान्च्या मुला/ मुलीने सेवा करण्यासाठी वेळ मिळावा म्हणुन नोकरी सोडली हे चान्गलेच खटकले असते, जास्त त्रासदायक वाटले असते. भावनिक गुन्तवणूक अधिक झाल्यामुळे त्रास पण अधिक झाला असता.

गिल्ट मानण्यापेक्षा त्यान्च्या सोबत घालवलेल्या चान्गल्या आठवणीन्ना लक्षात ठेवायचे.

वडीलांप्रती तुमची जी जबाबदारी होती ती तुम्ही पूर्ण केली आहे.आपल्यापश्चात मुलाने किंवा मुलीने आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी असच आईवडीलांना वाटत असत.गरजेच्या काळात पैसे कमवून तुम्ही एक प्रकारे कुटुंबाच्या कर्तापुरूष झालात.यातच तुमच्या वडीलांना खरा आनंद मिळाला असेल.त्यामुळे इन्डायरेक्टली तुम्ही वडीलांची सेवाच केली आहे .मग या बाबतीत गिल्टी वाटून घ्यायच काहीच कारण नाही.

तुमच्या भावना मला समजतात. मध्यंतरी माझ्या जवळचे एक नातेवाइक पण कॅन्सरने वारले. त्यांच्या आजाराची गंभीरता त्यांच्या कुटुंबाने आम्हाला नीट कळवली नाही. आणि आम्ही पण बिझी होतो. माझ्या नोकरीतूनही मला रजा घेणे फार अवघड असते त्यामुले मला त्यांना शेवटचे भेटता आलेच नाही. गिव्ह युअर्सेल्फ टाइम व गिल्टी वाटून घेउ नका.

सोनाली, तुम्ही वडलांना भेटून सॉरी म्हणणार व त्याने तुम्हाला बरे वाटणार ही कविकल्पना आहे.

या कविकल्पनेवर विश्वास ठेवायचा असेल तर वडील जिथे आहेत तिथून तुम्हाला पाहताहेत, तुमचे भले चिंतीत आहेत, तुम्ही त्यांना भेटायला निघालात तर त्यांना ते अजिबात आवडणार नाही. त्यापुढे तुमचे सॉरी बोलणे वगैरे तर ते ऐकूनही घेणार नाही यावरही विश्वास ठेवा.

तुम्हाला बहिणींना सांगवत नसेल तर हे पान त्यांना दाखवा. तुमच्या बहिणी समजुतदार आहेत, तुम्हाला समजून घेतील.

वडील जाताना त्यांच्याजवळ कुणीही नव्हते याचे वाईट वाटून घेऊन उपयोग नाही. माझे वडील हॉस्पिटलात गेले, आम्ही बाहेर बसून होतो. तीन महिन्यांपूर्वी माझें काका असेच हॉस्पिटलात गेले. डॉक्टरने आधी सांगितले होते तरी आम्हाला त्यांच्या शेजारी बसून राहायची परवानगी नव्हती. ते बेशुद्धीत गेले, आम्ही तिथे असतो, नसतो तरी त्यांना काही फरक पडला नसता. ही दोन्ही माणसे जाण्याने माझे कायमचे नुकसान झालेले आहे. त्यांचा मृत्यू, त्या आधी घडलेले व त्यानंतर घडलेले प्रसंग कितीही प्रयत्न केले तरी कधीही विस्मरणात जाणार नाही. दुसऱ्या मृत्यूत मी स्वतःला दोषी समजते, घरच्यांनी खूप समजावलेय मला. तरीही ही भावना माझ्या मनातून कधीही जाणार नाही हे मला माहित आहे. पण आयुष्य पुढे चालत राहते, ते तसेच चालू ठेवण्यातच आपले भले असते. आपले आयुष्य भिरकावून द्यायचा आपल्याला काहीही अधिकार नाही.

म्हणून डोक्यातून सगळे काढून टाका. शांत डोक्याने पुढील आयुष्याला सामोरे जा. तुमच्या वडिलांची इच्छा तुम्ही सुखात राहाव्यात ही असणार, तुम्ही दुःखी राहाव्यात ही नाही. त्यांच्या इच्छेचा मान ठेवा.

गिल्ट काढून टाका मनातून. यात तुमचा काही दोष नाहीये. स्वतःची काळजी घ्या. तुमचे वडील तुमच्या मनात आहेत, तुमच्या जवळच आहेत ते. त्यांच्याबरोबर घालवलेले चांगले क्षण आठवा. बाकी सर्वांनी वरती चांगलं सांगितलं आहेच.

सगळयाना धन्यवाद. मला खूप बरं वाटलं इथें मन मोकळे़ करुन. सगळयाचि मतं पटलि आता हलकं वाटतय आणि पॉजिटिव विचार करतेय.. धन्यवाद परत....