आगकाडी

Submitted by राजेंद्र देवी on 7 March, 2018 - 06:15

शुष्क मी थोडीच उरले
समया उजळता जळुन गेले
आयुष्य उरले चिमटी एवढे
जळता जगणेच निसटून गेले

इवलेसे घर माझे
मुखीं आगीचे घास
पेटण्या करी संघर्ष
उजळणे हाच ध्यास

राजेंद्र देवी

Group content visibility: 
Public - accessible to all site users