गारठलेला सूर्य

Submitted by राजेंद्र देवी on 6 March, 2018 - 13:54

गारठलेला सूर्य

हा सूर्य आता उजेड देतो आहे
पण आता तो तापत नाही

ही रात्र आता अंधारते
पण ती झोपत नाही

मनातले वादळ आता शमले
आता ते घोंघावत नाही

आठवणीचा हा साठा
झुरतो पण आटत नाही

रोज रोज तेच सारे
आता वयाला मन विटत नाही
गारठलेला सूर्य मावळत नाही

राजेंद्र देवी

Group content visibility: 
Public - accessible to all site users