चौकट

Submitted by माउ on 28 February, 2018 - 20:08

त्यांनी आखली एक चौकट तिच्याभोवती..

तिच्या रंगांवर त्याच्या हसण्याची
तिच्या शब्दांवर त्याच्या नसण्याची
तिच्या श्वासांवर त्याच्या सावलीची
तिच्या जगण्यावर त्याच्या असण्याची..

पण त्यांना हे कळलंच नाही..
की रंग, श्वास्, शब्द मावत नाहीत चौकटीत कधी..
ते झिरपतात बाहेर चौकटीच्या रेषा तोडून..
आणि तसंच तिचं अस्तित्व ...
उरतं त्याच्या चराचरावर
आणि व्यापून घेतं सारं जग...

आणि चौकट उरते रिकामी..
त्यांचे उरले सुरले श्वास घेउन..
दुस-या 'ती' ची वाट बघत...

-रसिका

Group content visibility: 
Use group defaults