मराठी भाषा दिन २०१८ - खेळ - वाक्य बनवा - २८ फेब्रुवारी

Submitted by मभा दिन संयोजक on 28 February, 2018 - 01:30

वाक्य बनवा

आपण लहानपणी शिकलो आहोत मराठी भाषेत वाक्य बनते - कर्ता कर्म क्रियापद ह्या क्रमाने. त्यातच विशेषण, सर्वनाम, क्रियाविशेषण ह्यांची लुडबुडही चालू असते.

ह्या खेळात आम्ही तुम्हाला अक्षरांचा संच देणार आहोत, त्यातील अक्षराने सुरू होणारे अर्थपूर्ण वाक्य तुम्हाला बनवायचं आहे.
उदा. अक्षरसंच - ह म र
हरी मुंबईमधे रहातो.

नियम -
१. दिलेल्या प्रत्येक संचाचे एक वाक्य लिहायचे आहे.
२. एक आयडी एकापेक्षा जास्त वाक्ये लिहू शकतो.
३. दिलेल्या अक्षराने सुरू होणारे जोडाक्षर चालेल.
४. वाक्य अर्थपूर्ण असायला हवे.

अक्षरसंच -

१. स र ट म प
२. ग ट य ओ प
३. च ब न ज क
४. ह ल स ब उ
५. व ड ध थ ल

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मायबोलीकरांनो, मोठ्या संख्येने खेळात सहभागी व्हा आणि खेळाचा आनंद लुटा Happy

१. स र ट म प
२. ग ट य ओ प
३. च ब न ज क
४. ह ल स ब उ
५. व ड ध थ ल
ह्या ५ संचांची वाक्ये करायची ना?

@ शोभा१, हो.

१. स र ट म प >>>>>>>>>> समिधाने रताळी, टरबूज मटार पाठविले.
२. ग ट य ओ प>>>>>>>>>गणेश टवाळांची योजना ओळखून पळाला.
३. च ब न ज क>>>>>>>>> चहा बनपाव नसल्याने जनार्दन कुरकुरला.
४. ह ल स ब उ>>>>>>>>> हसत ललिताने सासू बाईंना उठविले.
५. व ड ध थ ल>>>>>>>>> वहिनेने डाव धुवून थालिपिठ केले.

शोभा भारी जमलीयेत वाक्य

आजच्या दिवसासाठी दिलेल्या संचावर वाक्यं बनवायची आहेत, उद्या नवीन संच दिला जाईल.

१. स र ट म प
सीता रोज टमाटे माहेरी पाठवायची
२. ग ट य ओ प
गल्लीतल्या टवाळांना यशवंत ओकांनी पळवले.
३. च ब न ज क
चीनने बीजिंगला नाका जाम केलेला.
४. ह ल स ब उ
होळीला ललिताने सकाळी बटाटे उकळले.

छान! Happy

१. स र ट म प >> मीरने ताळ्याचा टो माळ्यावर पसरवला.

२. ग ट य ओ प >> ल्लितल्या ग्यांना यांनी रडून ळवले.

३. च ब न ज क >> चावी नवतानारेश जाकातावला.

४. ह ल स ब उ >> रिशने सूण सोलला, टाटे कडले.

५. व ड ध थ ल >> रतीबा रल्याने थोडा वंडला.

१. स र ट म प ---- सरळ रमतगमत टपोरी मंदार पळाला.

२. ग ट य ओ प ---- गवय्याच्या टप्प्याटप्याने येऊन ओव्या प्रकटल्या.

३. च ब न ज क ----- चमेलीने बारीक नजाकतीने जरीकाम केलं.

४. ह ल स ब उ ---- हळूहळू लयीत सुरांचा बहर उमलला.

५. व ड ध थ ल ---- वर्षाच्या डोळ्यात धरणीकंप थरथरायला लागला.

काहीही लिहिलंय माहितेय पण सहभाग माझा इतकंच Lol

दक्षे करेक्ट Lol

शोभा उगाच काहीतरी हा.

सचिन रत्नागिरीहून टेंम्पो मधवनगरला पाठवायचा.
गौरी टवाळ यांच्या ओमणीतून पळाली.
चित्रपट बघायला नानांनी जागा केली.
हनिसिंग लस्सी, सरबत बनवुनच उठला.
वैशालीच्या डोक्यावरची घागर थोडी लवंडली.