रिक्षा, रिक्षाचालक आणि मला आलेले वाईट अनुभव

Submitted by VB on 25 February, 2018 - 13:56

रिक्षा चालकांची मुजोरी, उद्दामपणा न अनुभवलेला अपवादाने सुद्धा सापडेल कि नाही माहित नाही.

तर बहुतांशी नोकरदारांप्रमाणे मीही रोज ट्रेन आणि रिक्षाने प्रवास करते , अन इतरांसारखी चांगलीच रुळलीसुद्धा आहे. पण तरी कधी कधी एखाद्या वेळी येतो वाईट अनुभव. असाच एक वाईट अनुभव गेल्या आठवड्यात आला. त्याबरोबर एक असाच खूप वर्षांपूर्वी आलेला आणि आता विस्मरणात गेलेला अनुभवही आठवला.

तर झाले काय , जवळपास दहा वर्षांपूर्वी, नवीन नवीन नोकरीला लागले होते. रोजची यायची, जायची वेळ ठरली होती पण एक दिवस ऊशीर झाला, ऊशीर म्हणजे खूप जास्तच, ऑफीसातच दहा वाजले रात्रीचे. खूप टेन्शन आले कारण त्याकाळी रात्री नऊ साडेनऊ नंतर बर्यापैकी वर्दळ शांत झालेली असायची.. म्हणून सरळ रिक्षा करून रेल्वे स्टेशनला आली अन तिथून ट्रेन ने ठाण्याला. यात अकरा वाजले होते. इतका ऊशीर झाल्यामुळे मी बसच्या ऐवजी रिक्षाने घरी जायचे ठरवले अन लगेच एक रिक्षासुद्धा मिळाली, त्यामुळे जरा बरे वाटले. पण हे समाधान क्षणिक निघाले. स्टेशन सोडल्यावर रिक्षा रोजचा मार्ग सोडुन दुसऱ्या भलत्याच रस्त्याला वळली. मी मनातून घाबरली पण वरवर तसे न दाखविता रिक्षावाल्याला जाब विचारून रिक्षा मेन रोड वर घ्यायला सांगितले तर त्याने त्यावर मलाच उद्धटपणे ऐकविले कि हा शॉर्टकट आहे अन तुम्हाला बरोबर सोडेन मी. मला माहित होते की हा शॉर्टकट नाहीये पण घाबरले होते त्यात माझ्याकडे तेव्हा मोबाइल हि नव्हता काय करावे काही सुचत नव्हते. थोड्यावेळाने रिक्षा एका बार समोर थांबली अन एक बाई रिक्षात येऊन बसली. मी अजूनच घाबरले पण शांत बसून होते काहीही न सुचल्यामुळे. मध्ये अजून थोडावेळ गेला पण तो थोडासा वेळ अगदी एका युगासारखा वाटत होता, त्यात ती बाई अन रिक्षावाला दोघांचे अगदी घाणेरड्या भाषेत बोलणे चालू होते, ते तर अगदी ऐकवत हि नव्हते. शेवटी रिक्षा त्या छोट्या गल्ल्या सोडून ओळखीच्या रस्त्यावर आली अन सोबत मला थोडा धीरही. रिक्षावाल्याला म्हटले मला इथेच उतरायचे आहे आधी तो नाही बोलला पण थांबला. मी जिथे उतरली होते तो रस्ताही सामसून होता, तशीच सरळ चालायला लागले. जवळपास दहा मिनिटे चालल्यावर एक बस दिसली जी माझ्या घरापर्यंत जाणारी होती, हात दाखविला अन थांबवली , कशीबशी पोहचली एकदाची घरी.
त्या दिवसापासून ठरविले होते की कधीही रिक्षा करायची नाही किमान एकटी असताना तर नाहीच नाही.
मधली खूप वर्षे ठरविल्याप्रमाणे टाळत आली रिक्षा, पण हळू हळू दुसरा पर्याय उपलब्ध नसल्याने परत एकदा रिक्षा प्रवास सुरु झाला.

गेल्या आठवड्यात सुद्धा एक दिवस असाच ऊशीर झाला ऑफिसमध्ये. साडेनऊ होत आले होते. हल्ली इतका ऊशीर होणार असेल तर सरळ कॅब बुक करते पण त्यादिवशी गडबडीत राहून गेले. म्हटले आधीच ऊशीर झालाय त्यात आता कॅब बुक करुन वाट बघत बसण्यापेक्षा सरळ जावे रिक्षाने स्टेशन पर्यंत. अन निघाली लगेच, ऑफिस समोर येताच लगेच एक रिक्षाही मिळाली . खरेतर लगेच रिक्षा मिळाली म्हणून मी खुष झाले पण तो आंनद काही फार काळ टिकला नाही. रिक्षात बसल्या बसल्या आधी घरी फोन करून मी निघाल्याचे आणि ऑफिसमध्ये फ्रेंडला मला रिक्षा मिळाल्याचे कळविले. अन मग इतका वेळ जे लक्षात आले नव्हते ते जाणविले कि रिक्षा वाला प्यायलाय अन आरश्यातून सारखा मागे बघतोय. एकदोनदा तर सरळ मागे वळून बघत होता.
आताही इथे मधेच उतरणे शक्य नव्हते कारण दुसरी रिक्षा मिळेल याची खात्री नाही अन तो रस्ताही इतका काही सेफ नाही म्हणून ठरविले कि जावे पुढे. पण मग लगेच माझ्या मित्राला मेसेज करून त्याला थोडा अंदाज दिला आणि फोन केला. त्यानंतर स्टेशन येई पर्यंत आम्ही ऊगाचच फोन वर गप्पा मारत होतो. त्यामुळे किमान मला थोडे बरे वाटले आणि, भीती, जी आधीच्या अनुभवामुळे मनात होती ती ही जरा कमी झाली. पूर्णवेळ मनात स्वतःला बजावत होते की बी अलर्ट अँड पोजिटीव्ह. शेवटी आले स्टेशन अन मी उतरले एकदाची.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनु छान पोस्ट. सनसिटी चा उल्लेख वाचून तु जवळ कुठेतरी राहतेस असा फिल आला मला एकदम Happy
कारण मी सनसिटीच्या खूप जवळ राहते. Happy

रिक्षावाला झाला की त्याला एक विशिष्ट अस दुर्गुणी व्यक्तीमत्व येत. काही अपवाद आहेत पण ते थोडेच.
कल्याणात पारनाक्यावर बसलेले रीक्षावाले काय करतात हा प्रश्ण पडतो. त्यांना कुठूनही कुठेही जायच नसतं. त्यांना लांबची भाडी हवी असतात , जी सतत मिळतीलच अस नाही. बरं विचारलं तर एकमेकांना तू जा तू जा करतात किंवा अव्वाच्यासव्वा भाडं सांगतात.
बिर्ला कॉलेजला जायच तर १८०, ८० काय वाट्टेल ते सांगणार मग बार्गेन करून साठ वर यायच हे नेहमीचचं . म्हणजे खर भाडं ६० च.
मग हाफ रीटर्नच रडगाण आणि तेही कुठे तर कॉलेजच्या वाहत्या रस्त्यावर.
अरे रीक्षा चालवतोस म्हणजे तुला कुठठूतरी कुठे जावच लागणार!!! पण नाही.
अर्थात काही दिवसांपर्यंत ६० रूपयात यायला तयार होणारा रीक्षावाला मला देवच वाटायचा.
पण ओला अ‍ॅप घेतलं आणि बिर्ला कॉलेजला जायचे फक्त २९ रूपये. माझा माझ्या कानांवर विश्वास बसत नव्हता.
त्याला विचारलं की कसं परवडतं तर त्याने सगळी कथा सांगितली कसे कंपनी इंसेंटीव्ह देते वगैरे . ४ किलोमिटर पर्यंत २९ रूपये आहेत.
कसला आनंद झाला होता एक रूपया मागून घेताना.

अच्छा म्हनजे उबर चुन चुन के रेपिस्ट् च निवडते त्यांच्या व्यवसायासाठी नाही का? ओलाची काय पॉलिसी आहे?

ओला उबर दोन्ही चे चालक नॉर्मल मनुष्यप्राणी आहेत. त्यांच्यात चांगले वाईट दोन्ही नमुने आहेत.
मला परवा एक वाईट सहप्रवासी भेटला.ओला शेअर मध्ये बसले तर आधीपासून एक वेगळा मुलगा आणी वेगळी मुलगी (अनरिलेटेड) बसले होते.
दोघेही त्यांच्या पार्टनर्स शी अखंड फोन वर बोलत होते. (पूर्ण २५ आणि ३५ मिनीटे).माझ्या डोक्यात मुंग्या येत होत्या. मुलगा त्याच्या कोरेगाव पार्क ला राहणार्या गफ्रे शी फोनवर 'एकच रुम, दारु आणू न देणारा भाविक रुममेट, हिंजवडी गावठाण' याबाबत अखंड यातना कथन करत होता.मग मध्येच काहीतरी टिजिंग मोड मध्ये गप्पा गेल्या आणी 'फ' शब्द म्हणाला.
नंतर 'मै बोलूंगा, और बोलूंगा' म्हणून 'फ्,फ्,फ्,फ्,फ्,फ्,फ्,फ' असे ७-८ वेळा म्हणाला.(मी एक अक्षर लिहीलेय, पुढे मनात क लावून घ्या.)
मी मागून ३०० ग्राम चा मोबाईल जोरात त्याच्या खांद्यावर मारुन बिहेव्ह युवरसेल्फ सांगितले. शेजारची कन्या दुसर्‍या फोन वर बोलत असल्याने तिला पत्ताच लागला नाही.मग तिने फोन बंद केल्यावर आणि तो मुलगा उतरल्यावर तिने सर्व प्रकार जाणून घेतला आणि खरं आहे,बरोबर केलंस वगैरे म्हणाली. चालक 'मला इंग्रजी येत नाय, पण बाहेरुन आलेल्या लोकांनी परक्या लेडिज माणसा समोर नीट बोलायला पायजेल' म्हणाला.

@ mi_anu, मोबाईल जोरात त्याच्या खांद्यावर मारुन बिहेव्ह युवरसेल्फ सांगितले. >>> छान केलंत. आपले अभिनंदन!

ओला उबर दोन्ही चे चालक नॉर्मल मनुष्यप्राणी आहेत. त्यांच्यात चांगले वाईट दोन्ही नमुने आहेत.

--- कामदेव, मला हेच म्हणायचे होते. जसे पूर्वी आयटीत बलात्कार, आत्महत्या, इत्यादीच्या न्युज बनायच्या तशाच आता ओला उबर च्या बनतात.

सुखवस्तू (मीन्स पैशाने माजलेल्या) लोकांना कसा त्रास भोगायला लागतो हे वाचलं की आयुष्यात काही करु न शकलेल्या मध्यमवर्गीय वाचकांच्या विशिष्टवर्गमत्सरी भावनांचे उत्तेजन व शमन होते.

बलात्कार, विनयभंग ह्या गोष्टी समाजाचा भाग आहेत हे मान्य केलं तर कोणत्याही विशिष्ट आर्थिक-सामजिक गटात, विशिष्ट जातीत, विशिष्ट समाजात, विशिष्ट देशात, विशिष्ट धर्मात स्त्री-पुरुष पर्वर्ट असतात असे ब्लॅन्केट विधान करणे योग्य नव्हे.

वंदन छान पोस्ट.
खास करून >>
बलात्कार, विनयभंग ह्या गोष्टी समाजाचा भाग आहेत हे मान्य केलं तर कोणत्याही विशिष्ट आर्थिक-सामजिक गटात, विशिष्ट जातीत, विशिष्ट समाजात, विशिष्ट देशात, विशिष्ट धर्मात स्त्री-पुरुष पर्वर्ट असतात असे ब्लॅन्केट विधान करणे योग्य नव्हे. >> या ओळी.

पुण्यात रात्री किंवा पहाटे आल्यावर खुप प्रॊब्लेम येतात. रिक्षाशिवाय पर्याय नसतो ( ओला,उबर कधी वापरल नाही.) एखाद्या मंत्री बसमधुन उतरल्यासारखा
रिक्षावाले घेराव घालतात. आणि जवळजवळ कैद्यासारखे फरफटतच रिक्षापर्यंत नेतात.त्यांना चुकवुन किंवा थापा मारुन् जाणे महा कठीण काम असते. बर जरी गेलो तरी कॅब मिळेल याची शाश्वती नसते.

र जरी गेलो तरी कॅब मिळेल याची शाश्वती नसते. >> गाडितून उतरल्या उतरल्या कॅब चे स्टेटस चेक करायचे. नसेल आसपास तर रिक्षाशिवाय पर्याय नाही.

पुस्तक लिहून होईल एवढे अनुभव आहेत.

१) आम्ही ३ मित्र वाशीवरून घरी जायला रिक्षात बसलो बसलो म्हटल चल मीटरने तर त्याने नकार दिला म्हणे ही रिक्शा सिट वरच जाते फक्त. अर्थातच त्याला सिट प्रमाणे जास्त पैसे मिळाले असते मीटर पेक्षा. मी म्हटले बाबा तू असा नकार नाही देऊ शकत, तरी तो धिम्म बसून होता, रिक्शाच्या मागे लिह्लेल्या rto च्या नंबरला फोन केला तर तो बंद. त्याची मग्रुरी वाढत होती, म्हटले ठीक आहे चल सिट वर .रस्त्यात आमच्या एरियातली पोलिस चौकी लागते तिथे रिक्शा थांबवायला सांगितली, रिक्षाची चावी काढली, त्याच्या बोकांडी धरून चौकीत घेउन गेलो तिथे अगदी शहाण्या मुलासारखा खाली मान घालून उभा होता, पोलिस म्हणाले याची तक्रार स्टेशन मधे जाऊं करावी लागेल ही फ़क्त चौकी आहे, मग तिथला एक हवालदार घेउन वरात पोलिस स्टेशन ला, घरून वडिल फोन करत होते कारण गावी जायचे होते अणि बसची वेळ जवळ आली होती, स्टेशन मधे फार गर्दी असल्याने वेळ लागणार होता म्हणून सोबतचा हवालदार म्हणाला दया त्याला सोडून तो परत नाही करणार, ठीक आहे म्हणून मग त्याला घरापर्यंत घेउन आलो, पैसे दिले अणि सगळ्या चाकातली हवा काढून टाकली, म्हटले इथेच राहतो मी, हे माझ नाव अन का्य उपटायची माझी ती कधीही उपट. नंतर वडील अणि मी बैग घेउन दुसरया रिक्षातून जाताना पाहिले की त्याने ती रिक्शा कशी बशी ढकलत थोड्या अंतरावर आणली होती अणि तिथे बसून रडत होता.

२) कोलेजला असताना दादरला सेनाभवनच्या इथून माटुंगा जायला टेक्सी वाल्याने नकार दिला म्हणे गैस संपलाय, तसाच राजासारखा त्या चाहाच्या बाकड्यावर बसून कान खाजवत होता, साले भैय्ये बहोत चर्बी चढ़ी है क्या? बाजु में शिवसेना भवन होकेभी तू भाडा नाकारता है, चल तू सेना भवनमें तेरे को दिखताय अस म्हणत त्याच्या हाताला धरून खेचू लागलो, तर तो हाताला झटका देऊन चप्पल अणि टेक्सी तिथेच ठेउन गल्लीतून धूम पळत अद्रुश्य झाला,नंतर ज्या टेक्सिचा नंबर होता त्याला विचारले तेरे गाड़ी में गैस है ना ? क्या भरू अभी? तो गप्प तयार झाला.

३) दादर ttवरून सायनला जायला बहुधा कुठलाच टेक्सीवाला तयार नसे , नंतर एक आयडिय करायचो, वाशी जाना है बोलूं बसायचो अणि सायन आल की थांबव् म्हणायचो अन उतराय्चो, ते म्हणायचे अरे आपने वाशी बोला था ? तो मेरा प्लान अभी चेंज हुआ है, क्या जबरदस्ती लेके जायेगा वाशी?

तरी मुंबई ठाणे यांच्या मानाने नवी मुंबईमधले रिक्शा अणि टेक्सिवाले सहन करण्यासारखे आहेत. अपवाद घनसोली अणि महापे भागातले रिक्शावाले.
रिक्शा अणि टेक्सिवाल्यांचा जन्म प्रवाशांना लुटन्यासाठीच झालेला आहे, त्यांच्याशी सभ्य व्यक्ति प्रमाणे वागू नये, जश्यास तसे रहावे.

माफ करा, मला पहिल्या रिक्षावाल्याला दिलेली ट्रिटमेंट आवडली नाही.- मला पण.

बरेचदा लोक मनापासून वाईट नसतात. पण एकूण त्या फिल्डमधली स्टॅन्डर्ड प्रॅक्टीस (लीगल असो का इल्लीगल) करत असतात. ती प्रॅक्टीस योग्य-अयोग्य आहे का हे बघायचा विचार त्यांना कधी शिवलेला नसतो.

मला योग्य अयोग्य मध्ये शिरायचे नाही. कदाचित ती वेळेची गरज होती.
रिक्षावाले कधी कधी हद्द करतात आणि आपण पण संतापतो खूप
मला स्वतःला कित्येकदा त्यांच्याशी भांडावे वाटते, पण दरवेळी सभ्यपणा आड येतो आणि बाकी इतर महत्वाची कामे असल्याने असल्या फालतू गोष्टीत आपण वेळ घालवू नये असे वाटते.

रिक्शावाल्यांची संघटना आहे तशी रिक्शाप्रवाशांची आहे का?

सार्वजनिक वाहतूक हा नागरिक म्हणून आपला अधिकृत हक्क आहे हेच जनतेला ठावूक नाहीये. ती सुधारायची तर अ‍ॅक्टीव असावे लागेल. आपआपल्या भागातली वाहतूक सुधारण्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यावा.

पहिली पुडी असेल तर ठीक आहे, मला पण नाही आवडले आणि डेंजर पण आहे. समोरच्याची मनस्थिती काय आहे हे कोणालाच कळू शकत नाही.
यापुढे काळजी घ्या, निदान नाव घराचा पत्ता देऊ नका. यापेक्षा फालतू कारणाने घटना घडलेल्या वाचल्या आणि पहिल्या आहेत crime पेट्रोल मध्ये.

<<< माफ करा, मला पहिल्या रिक्षावाल्याला दिलेली ट्रिटमेंट आवडली नाही. >>>
मला तर फार आवडली. जशास तसे. युनियन असल्यामुळे एक प्रकारची मग्रूरी आली आहे आणि आजूबाजूला त्यांचे साथीदार असले तर अजूनच चेव येतो, हे वरचेवर दिसले आहे. पण च्रप्स यांनी म्हटल्याप्रमाणे जरा काळजी घ्या आणि खरे नाव/पत्ता सांगू नका. परिस्थेती खरंच चिघळू शकते.

<< माफ करा, मला पहिल्या रिक्षावाल्याला दिलेली ट्रिटमेंट आवडली नाही.>
------ मला वाईट Sad वाटले... , बळी तो कान पिळी. त्याने केलेला अडमुढेपणा आणि तुम्ही दिलेली ट्रिट्मेन्ट खुप विषम वाटली.

त्या क्षणाला तो कमजोर आहे म्हणुन तुम्ही असे करु धजला... जशास तसे उत्तर, अद्दल घडवायची याने त्याच्या वागण्यात सुधाराणा होणार नाही. तो रिक्षा स्टॅन्डवर गेल्यावर त्याची व्यथा चार मित्रान्ना सान्गणार. मग त्या चार लोकान्ना प्रवाशान्बद्दल काय आणि कसा आदर रहाणार ? दहशत, भितीयुक्त वातावराण नको आहे. उद्या त्याला "सन्धी" मिळाल्यावर तो या रागाचा/ अपमानाचा वचपा दुसर्‍या कुणावर काढायला नको.

रिक्षेने प्रवास करणारेही चान्गली माणसे असतात याची एक सन्धी आपण सोडली.

अशी ट्रीटमेंट द्यायची तर प्रत्येक रिक्षावाल्याला देत बसायला लागेल आणि परिस्थितीत तर ढिम्म फरक पडणार नाही. लक्षात घ्या हा मध्यमवर्गीय शेपुटघालेपणा नाही. पण प्रॅक्टीकॅलिटीचा विचार केला पाहिजे.

पहिल्या किस्श्यातील वागणूकीबद्दल काही म्हणायचे नाही तुर्तास,
पण शेअर रिक्षावाल्याने मीटर प्रमाणे यायला नकार दिला याबाबत कायदा काय बोलतो?
म्हणजे शेअर रिक्षा कि मीटर रिक्षा हे ठरवायचा अधिकार रिक्षावाल्याला नसतो का?
कि मुळातच शेअर रिक्षा हा बेकायदेशीर प्रकार आहे??

शेअर रिक्शा ह्या ठराविक मार्गावरच आणि अलाउड असतात.एस टी महामंडळ व सिटी बस वगळता स्टेज (टप्पा) निहाय वाहतुकीची अन्य कोणाला परवानगी नाही.धी प्रवासी वाहतूक वाहने पॉइन्ट टू पॉइन्ट पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट पध्तीनेच चालवावी लागतात.उदा. काजगी वाहतूक कोल्हापूर ते मुम्बै परवाना असेल तर कोल्हापूर ते मुम्बैच प्रवासी घेतले पाहिजेत. कोल्हापूर पुणे पुने लोणावळा असे करता येत नाही. तसेच टॅक्सी व रिक्शाचे आहे.तुम्ही ठरवाल त्या दोन पोइन्ट्स वरच भाडे घेतले पाहिजे. काही ठिकाणी उदा मित्तल चेम्बर ते चर्च गेट , अथवा नाशिक रोडवर नाशिक रोड ते शालिमार असे शेअर परवाने आहेत. त्याचे मार्ग जिल्हा वाहतूक कमिटी ठरवते.त्यात प्रशासन, पोलीस, आर्टीओ, वाहन संघटना असे सदस्य असतात, मात्र शेअर मार्गावर च्कॉन्ट्रॅक्ट रिक्शाला यायला बंदी असण्याचे कारण नाही.कारण कॉट्रॅक्ट हा नियम आहे आणि शेअर ही सवलत आहे.....

माझ्या माहितीप्रमाणे बरेच ठिकाणी शेअर रिक्षा आणि मीटर रिक्षाची लाईन वेगळी असते. वाशीलाही तसेच आहे. तुम्ही शेअर रिक्षाच्या लाईनीत शिरून त्याला चल मीटरने म्हणून सक्ती करू शकता का?

अशी ट्रीटमेंट द्यायची तर प्रत्येक रिक्षावाल्याला देत बसायला लागेल आणि परिस्थितीत तर ढिम्म फरक पडणार नाही.
>>>
प्रत्येक रिक्षावाल्याला अशी ट्रीटमेंट एकानेच द्यायची गरज नाही.
शंभर रिक्षावाले असतील आणि चार हजार प्रवासी, तर त्या चार हजार प्रवाश्यांपैकी चारशे प्रवाशी फक्त एकदाच एका रिक्षावाल्याना धडा शिकवायच्या हेतूने कठोर वागले तर प्रत्येक रिक्षावाल्याला किमान चार वेळा हे झेलावे लागेल आणि तो सुधारेल.
हे लॉजिक सांगितलेय. वरील किश्यातील वागण्याचे समर्थन नाही. त्यावर माझे नो कॉमेंटस वर नोंदवलेत.

दुसर्‍या दिवशीपासून संप पुकारून सर्व रिक्षा बंद पडतील आणि हे जे चार हजारपैकी तीन हजार सहाशे प्रवाशी असतील ते त्या चारशेंना खंडीभर शिव्या घालतील.

Pages