शेजारी असलेल्या उद्दाम भाडेकर्‍याचा त्रास व घरमालकांची उदासीनता....

Submitted by यक्ष on 21 February, 2018 - 22:47

आमच्या इमारतीत बरेच घरमालक (इन्व्हेस्टर्स) परदेशी असतात.
माझ्यासारखे 'रहिवासी' असलेल्या बर्‍याच जणांन्ना इथे येणार्‍या काही (सर्वच नाही) Bachelor भाडेकर्‍यांचा त्रास व मनस्ताप झाला आणी होत राहतो.
इथे आय. टी. व कॉलेज सान्निध्यामुळे Bachelor भाडेकरुंचे प्रमाण ज्यास्त आहे . त्यांचा त्रासही लक्षणीय आहे व त्यासाठी आम्ही 'फक्त कुटुंबासाठी' फ्लँट भाड्याने द्यावा अशा सोसायटीने केलेल्या सुचनेला परदेशस्थ घरमालक कंपूने कडाडून विरोध केला व करतात.
बरं त्यांना त्यंच्याच भाडेकर्‍यांच्या त्रासाविषयी सांगितल्यास ते पोलिस तक्रार करा असे सांगून मोकळे होतात व फोन, मेल्स, मेसेजेस ला उत्तर देण्याचे टाळतात. हा त्रास दिवसेंदिवस वाढत चाललाय.
विषेश म्हणजे येणार्‍या Bachelor भाडेकर्‍यांतही उद्दामपणा पुरेपूर जाणवतो. पोलिसात बर्‍याच तक्रारी केल्या.पोलिसंन्नी तशी दखल घेउन मदत पण केली. पण हे नित्याचेच होत आलेय. इमारतीच्या सिक्युरिटी गार्ड्स ना तर मला वाटते आजकाल काही किंमतच राहिली नाही.
कालच माझ्या शेजारी असलेल्या फ्लॅट मधील स्टुडंट्स (हो ते विद्यार्थी म्हणण्याचा लायकिचे नाहीत!) नी त्यांच्या मित्रवर्गासोबत रात्री १ नंतर पिण्याचा कार्यक्रम व दंगा पुढे रात्रभर केला. सिक्युरिटी गार्ड्स सांगून थकले व हात हलवत परत आले. सोसायटीस कळवले आहे व ते पुन्हा घरमालकाला तसे कळवतीलच.
पण ह्या सर्व प्रकरणात एक प्रकारची हताशा येते. विशेषतः अशा तरून वर्गाकडून मुजोर वागणुकीचे प्रमाण आजकाल फार वाढलेय. स्टुडंट्स म्हणून मी त्यांन्ना दोनवेळा शांतपणे समजून सांगितले पण 'तुम्हाला काय करायचे ते करा' अशा शब्दात सांगितल्याने संताप व चीड आली. कुठल्याप्रकारे उत्तर द्यावे ते सुचत नाही. पोलिस तक्रार केल्यास तसा फायदा होइल पण पुनपुन्हा तेच तेच करून वैतागलोय. त्यांचा कुटुंबियांन्ना नंतर काही त्रास होइल का अशी एक उगाच शंकाही येते.
कुणास काही सुचवता अले तर मी त्याचा जरूर प्रयत्न करेन...
बाय द वे....Bachelor व foreigner ह्यांन्ना भाडेकरू म्हणून नाकारण्यासाठी सोसायटीला तसे काही कायदेशीर अधिकार मिळू शकतात कां?
अशा फिकीर नसलेल्या घरमालकांविरुद्ध तक्रार करता येइल कां?
जाणकारांकडून मार्गदर्शन झाल्यास तसे पर्याय उपयोजून पाहतो. धन्यवाद....

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यक्ष , भारतात फ्लॅट असलेल्या आमच्या सोसायटीमध्ये रुल केलेला आहे कि बॅचलर्स/विद्यार्थी अशांना भाड्याने फ्लॅट द्यायचा नाही. फक्त कुटुंबीयाना द्यायचा .तुमच्याप्रमाणे अन्य नॉन भाडेकरूंना त्रास होत असेल. तुम्ही सर्वजण एकत्र येवून असा रुल मतदान पद्धतीने करू शकाल का?

त्यांना दंड करा. तसा नियम नसेल तर तरतूद करता येते का ते पहा. आमच्या सोसायटीत असा त्रास एकदा-दोनदा झाला होता. पण घरमालक इथेच असल्यामुळे काम सोपे झाले.
इतर एका प्रकरणात नियमबाह्य वागणार्या रहिवाशांचे टप्प्याटप्प्याने इंटरकॉम, जनरेटर कनेक्शन, ( आणि अगदीच वेळ आली तर पाणी) तोडावे असा ठराव GBM मधे पास झाला होता. (पाणी बंद करायची वेळ आली नाही. )

धन्यवाद सीमा व वावे!
सीमा असा रुल कायदेशीर आहे कां? तो चॅलेंज होउ शकतो कां? पण अशा सोसायटीने केलेल्या सुचनेला परदेशस्थ घरमालक कंपूने कडाडून विरोध केल्याने ते थोडे मागे पडले. कायदेशीर असल्यास ते पुन्हा पुढे रेटतो....
वावे....हे अजून ट्राय केले नाही.....सोसायटीस तसे सुचवतो.....
धन्यवाद!

कायद्याने marital status वरुन discriminate नाही करु शकत. ज्या सोसायटी बॅचलर ना बंदी घालतात ते बेकायदेशीर आहे.
तुम्हाला खालील गोष्टी करता येउ शकतात
सोसायटीच्या जनरल बॉडी मिटिंग मधे दंडाची तरतुद करा. अशा मिटींग मधे प्रॉक्सी मतदानाची तरतुद नसल्याने परदेशी इन्व्हेस्टर्स अडथळा आणु शकणार नाहीत. मग हा दंड मेंटेनन्स चार्ज मधे वाढवुन घरमालकाला पाठवत जा. इन्व्हेस्टर्सना फक्त पैशाची भाषा कळते. त्यांच्याकडुन दंड वसुल करायला लागल्यावर ते वठणीवर येतात आणि भाडेकरुंना तडी देतात.
रात्री उशिरा होणारा दंगा/आवाज, सिक्युरिटी बरोबरचा उद्दामपणा हा रेकॉर्ड करत जा. फक्त रेकॉर्डींग होतंय एव्ह्ढं कळलं तरी बरेच जण नरमतात. हे रेकॉर्डींग घरमालकाला पाठवा.
अगदीच नाठाळपणा करायचा असेल तर आपल्या दिवसा, म्हणजे परदेशी घरमालकाच्या रात्री तक्रार करण्यासाठी फोन करा Happy

सगळ्यांनी मिळून त्यांना एकदा मनसोक्तपणे बदडून काढा.. आणि घराला भलेमोठे कुलूप लावून त्यांचे पानी कनेक्शन तोडून टाका..
बसतील बोंबलत.. त्याआधी त्यांच्या उद्दाम वागणुकिची चित्रफित काढून ठेवा..

बरं ते त्यांच्या घरात नंगानाच रात्रभर करू द्या.. फक्त आवाज बाहेर येऊ देत नसेल इतकी काळजी जर ते घेत असतील तर बोलायचे कारण नाही जर ते होत नसेल तर खुशाल हात सोडावा

सीमा असा रुल कायदेशीर आहे कां? >> naahee.. u cant discriminate by caste, religion, gender, marital status, physical/mental disabilities etc. It wont stand in d court.
Jabara dand ha upay changala vatatoy.
Amachya society madhe, kachara uchalat nasat, itar facility band karat asat maintenance dyayala usher zalyas. tase karata yeu shakate ka?

u used to need a license to drink alcohol earlier. Is that valid today?
If so, tumhee police case karu shakata.

त्यांच्या मेन दरवाज्याला खालुन फट असेल तर कुठुन तरी ढेकणं भाड्याने आणा. ( गंमत नाही, सिरीयसली) आणी त्या फटीतुन आत सोडा. नाय त्या ढेकणांनी त्यांची तारांबळ उडवली तर बघा. नाहीतर उंदीर, पाली वगैरे प्राणी सोडा. खरं सांगु का आजकाल बरेच लोक दुसर्‍याच्या सहनशक्तीचा अंत बघण्यासाठीच जन्माला आलेलेत की काय अशी स्थिती निर्माण झालीय आपल्या देशात.

लातोके भूत बातोंसे नही मानते याप्रमाणे वर महेश यांनी सांगीतलेला उपाय करुन बघा, कदाचीत कामी येईल.

खरं सांगु का आजकाल बरेच लोक दुसर्‍याच्या सहनशक्तीचा अंत बघण्यासाठीच जन्माला आलेलेत की काय अशी स्थिती निर्माण झालीय आपल्या देशात.
>>
+१

Submitted by व्यत्यय on 22 February, 2018 - 11:44 >> +१ हाच बेस्ट उपाय आहे. घरमालकांकडून दंड वसूल करणे.

खरं सांगु का आजकाल बरेच लोक दुसर्‍याच्या सहनशक्तीचा अंत बघण्यासाठीच जन्माला आलेलेत की काय अशी स्थिती निर्माण झालीय आपल्या देशात.>>>++111

आमच्या कडे मांजरी पाळणं आणि त्यांनी जिन्यात घाण केली की हात वर करणं, गळणारे कपडे गॅलरीत वाळत घालून आमच्या गॅलरीच्या पुढ्यात अभिषेक करणं, कुंडीतल्या झाडांना कोकणातल्या सारख ट्युब लावून शिपण करून पाण्याची धार तासनतास गळत ठेवणं, कचरा बिन, चप्पल यांची जागाच मुळी कॉमन कॉरिडॉर करणं हे फार कॉमन आहे. बरं सांगितलं नका करू तर परिणाम शून्य. लेटर लिहिलं सोसायटीला आणि सोसायटीने ही सांगितल तरी त्यांचं ही नाही ऐकत .

आपल्या सोसायटी बाबत च आपण एवढे उदासीन असलो तर काय आपलं गाव आणि देश छान आणि स्वच्छ होणार ?

रश्मी - तुमचे उपाय ते लोक पण वापरु शकतात....

प्रेमाने समजावणे, चर्चा करणे, चर्चेतुन त्यान्च्या वर्तवणुकीचा आसपासच्या लोकान्ना त्रास होतो आहे हे त्यान्च्या पर्यन्त पोहोचवाणे... हाच कमी त्राचा उपाय आहे.

हा त्रास आमच्याही सोसायटीत सुरवातीला प्रचंड झाला होता. त्यामुळे आमच्या सोसायटीने फक्त कुटुंबासाठी सदनिका भाड्याने देण्याचा नियम केला. सुरवातीला त्याला विरोध वगैरे झाला. पण आता कोणाचा विरोध नाही. कोणी कोर्टात वगैरे जाऊन या नियमास आव्हान वगैरे दिल्याचे सुद्धा ऐकिवात नाही. कारण मागची काही वर्षे झाली अजूनही हा नियम लागू आहे.

सामान्यतः प्रत्यक्ष तिथे राहणाऱ्या ज्यांना त्रास होतोय त्यांनी एकी करून मिटिंग मध्ये असा नियम बनवला तर जे परदेशात राहतात ते फार काही करू शकत नाहीत. परदेशातून कोर्ट कचेऱ्या करणे केस हाताळणे त्यांना इतके सोपे नाही. ते सुद्धा या कारणासाठी. शिवाय स्थानिक लोकांच्यात एकी असेल तर बाहेरून आलेले भाडेकरू सुद्धा टरकून असतात. तुमच्या बाबत मात्र उलट कसे घडत आहे. बहुतेक तिथे राहणाऱ्या व त्रास होणाऱ्या सभासदांत एकी नसल्याने होत असेल.

आमच्याकडे असा त्रास झालेला, तेव्हा मी रात्री एक वाजता पोलिसांना बोलावलेलं.
ते मुलगे चौथ्या मजल्यावर. आमच्या शेजाऱ्यांच्यावर. तरी असह्य त्रास होत होता.(मधली भिंत कॉमन)
तिसऱ्या मजल्यावरचे लोक, चौथ्या मजल्यावरचे त्याचे शेजारी अफू खाऊन झोपले होते.
घरमालकाला नंतर कळलं पोलीस आल्याचं.
पोलिसांनी पैसेच उकळले असावेत चौघातल्या दोघांना जीपमधून घेऊन गेलेले. ते पहाटे चालत आले. . केसबिस नाही केली. पण तेवढा डोस पुरला..

Bachelor,इ. लोकांना बंदी घालण अन्याय्य आहे.
घरमालक लक्ष देऊ शकत नसतील, तर त्यांनी घर भाड्याने देऊ नये असा नियम करावा..

>>बरं ते त्यांच्या घरात नंगानाच रात्रभर करू द्या.. फक्त आवाज बाहेर येऊ देत नसेल इतकी काळजी जर ते घेत असतील तर बोलायचे कारण नाही

+१

घरमालकांची मानसिकता बदलत नाही तोवर कुटुंबाला भाड्याने देण्याची गोष्ट अंमलात येणार नाही. अविवाहीत विद्यार्थ्यांकडून्/नोकरदारांकडून मिळणारे भाडे हे कुटुंबाकडून मिळणार्‍या भाड्यापेक्षा जास्त असते हे एकच कारण घरमालकांसाठी पुरेसे आहे.

भाडेकरूंची पोलीस दप्तरी नोंद करणे सद्या बंधनकारक आहे तेव्हा तशी नोंद ह्या घरमालकांनी केली नसल्यास ते जवळच्या पो स्टे ला जाऊन सांगा.

वैयक्तिकरीत्या विशिष्ट वेळेनंतर शेजार्‍यांमुळे झालेल्या त्रासाची पोलीस तक्रारही करता येऊ शकत असावी. जर सार्वजनिक कार्यक्रमांवर रात्री अकरानंतर ध्वनीक्षेपक नको वगैरे नियम असतील तर सोसायटीसाठी सुद्धा काहीतरी तरतूद असावी.

आमच्या सोसायटीत सुद्धा बॅचलर्स रहात होते, दुर्दैवाने एकाच मजल्यावर समोरा समोरच्या दोन फ्लॅट मध्ये. एकात मुली आणि दुसर्‍यात मुलं Uhoh आणि विशेष म्हणजे मुलिंचा न्युसन्स जास्त होता. कालांतराने दोन्ही घरातल्यांची दोस्ती झाली आणि प्रकरण पुढे गेले . एक दिवस मुलांच्या घरी मोठ्याने स्पिकर्स वर गाणी लावून ही सगळी मंडळी मुलिंच्या फ्लॅटमध्ये धुडगुस घालत होती. सोसा. मॅनेजमेंट चे लोक भेटून थोडे शांत झाले पण दंगा सुरू राहिला. एक दिवस बिअर चे कॅन वरून खाली फेकण्यात आले तेव्हा नेमकी आमची मिटिंगच सुरू होती सोसायटीची. आम्ही सर्व गेलो तर मुलं टु व्हिलर वरून पळून गेली. मग पोलिसांना बोलावले तात्पुरते. प्रकरण मिटले. त्याची चिड ठेवली होती मुलांनी तर एकदा पार्किंग मध्ये त्यातल्या एका मुलाने सोसायटीतल्या आज्जीना मागून धडक दिली (स्पायनल कॉर्ड) ला धक्का लागला. या आजी त्या होत्या ज्यांच्या मुलाने हिरिरिने या मुलांविरूद्ध अ‍ॅक्शन घेण्याचा प्रयत्न केला होता. मग या प्रकरणाचे गांभिर्य कळले. सुदैवाने सर्व फ्लॅट ओनर नी मुद्दा उचलून धरला आणि बॅचलर्स रहात असलेले फ्लॅट्स सोसायटीला रिकामे करून दिले. काही ओनर ची मुले वगैरे पण राहतात पण त्यांचा काहीही त्रास नाही.

बॅचलर्स ना खरं जागा नाकारणे हे चूक आहे, पण दुसरीकडे त्यांचे उपद्रम मुल्य अधिक असले की सोसायटीला त्रास होतो हे नक्की. नळ सुरू राहणे, रात्री बेरात्री आवाज, कचरा बाहेर ठेवणे ( त्यात अंडी/चिकन ची हाडे असतील तर कुत्रे येऊन विस्कटून घाण करून जातात) किल्ल्या हरवणे, कुलुप वाला येऊन किल्लि करायचा प्रयत्न करतो पण ते होत नाही मग कुलुप्/लॅच चा भाग तोडावा लागणे (सोसायटीचे नुकसान) इ गोष्टी होतात. अर्थात हे सर्व मालकाकडून पण होउ शकते पण बेजबाबदारी ही भाडेकरू लोकांत मी जास्त पाहिली आहे.
सोसायटीतल्या सर्व रहिवाश्यांनी एकत्र येऊन मुद्दा उचलून धरणे जास्त गरजेचे आहे. दंडात्मक धोरणाने लोक धडा घेत नाहित. वर कुणितरी लोकल राजकारणी लोकांचा आधार घ्या म्हटले आहे ते योग्य वाटते.

कारण कभी कभी घी सिधी उंगली से नही निकलता.

माझ्या पण फ्लॅटच्या खाली एक कुटुंब रहात होते कानडी, त्यात एक वयस्कर काका होते
ते त्यांच्या हॉल च्या बाल्कनीत सकाळी सकाळी कुणाशी तरी मोठ्या मोठ्याने याडगुडयाडगुड करायचे. मग रात्रीही सुरु झाले एक दिवस मी रात्री बेल वाजवून गप्प केले. कारण त्यांची बाल्कनी माझ्या बेडरूम च्या बरोब्बर खाली झोपेचे खोबरे. नन्तर याच फ्लॅट मध्ये मुले आली. रात्री बाल्कनीचा धुराडा नुसता जोडिला गप्पा आणि हिहिहूहू
इतका की माझ्या बेडरूम मध्ये सिगरेट चा भयन्कर वास यायचा, ती ही मी तिथे बसून नुकतीच ओढली असावी असा.
त्या पोरांना ही मी दम दिला, आता शान्ती आहे पण.

बॅचलर लोकांना भाड्याने घर नाकारणे हे अयोग्य असले तरीही सर्वात जास्त त्रास त्यांच्यामुळेच होतो. भरमसाठ दंड बसवा. त्याआधी सोसायटीतल्या निवासितांची एकी बांधा. पार्किंग करायला देऊ नका.
एका फ्लॅटमध्ये ४ जण राहतात, त्या ४ जणांच्या बाईक्स. सगळी पार्किंग फुल करुन टाकतात.

अतिच त्रास झाला तर सरळ बाहेरुन कडी लावा.(जर त्यांच्या फ्लॅटला सेफ्टी डोर नसल्यास आणि तुमच्या फ्लॅटला असल्यास) Wink

सारांशाने:
१. बॅचलर्स/विद्यार्थी अशांना भाड्याने फ्लॅट द्यायचा असा रूल कायद्यात बसत नाही. त्यमुळे रूल करून कायमचा फायदा नाही.
२. जबरी दंड करावा - हे कदाचित होउ शकेल - पण दंडाची वसुली हा एक अत्यंत कटकटीचा व वेळखाउ प्रकार आहे कारण घरमालक'मी देणार नाही. जा तुम्हाला काय करायचे ते करा' अशा अविर्भावात असतात . माझ्या पुर्वीच्या सोसायटीमध्ये अस्साच एक घरमालक - जो की एक वकील होता. ( हे मला बर्‍याच ठिकाणी असहकार करणारे आढ्ळले) त्याच्याकडून सोसायटी मेंटेनन्स (जो तो नेह्मीच उशिरा द्यायचा) बद्दल दंड सुमारे २ वर्षे carry forward केला. शेवटी तो वसूल केलाच.
३. सुविधा देण्यास प्रतिबंध - मला वाटते की हे ही कायद्यात बसत नाही. अधिक महिती मिळाल्यास उत्तम.
४. लोकल राजकारणी. - ह्या लोकांपासून मी अजून दूर आहे. पण मला वाटते की हा प्रयत्न करून बघावयास हरकत नाही.
५. होणार्‍या त्रासाचे रेकॉर्डिंग करून ठेवले आहे. घरमालकास पाठवेले आहे. प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.
६. घरमालकाला रात्री-बेरात्री फोन. - मला स्वतःला रात्री घरी फोने करून त्रास देणे तेवढे पटत नाही कारण एका आडमुठ्या व्यक्तिमुळे आ़ख्ख्या घरातल्या व्यक्तिंन्ना त्रास देण्यासारखे होइल. अगदीच शेवटचा उपाय म्हणून विचार करेन.
७. बदडून काढणे - ह्यात माझाच वेळ - एनर्जी वाया जाइल...प्रकरणाने वेगळे वळण घेतले तर? - अशी (कुटुंबासाठी) भिती आहे.त्यामुळे कायदा हातात घेण्याचा विचार नाही करू शकत.
८. लायसन्स चेक बद्दल तेवढी महिती नाही....पण काढतो.
९. ढेकण., उंदीर, पाली....ह्या माझ्यासाठिही त्रासदायक ठरतील (शेजारी आहे) म्हणून बाद.
१०. प्रेमाने समजवणे - दोन वेळा केले - पण त्याचा उलट परिणाम झाला. 'तुम्हाला काय करायचे ते करा...' हे उत्तर मिळाले. म्हणुनच उद्विग्न झालो.
११. त्यांचामोठा आवाज हा रात्री सुमारे ११-१२ नंतर सुरू होतो. जो की माझ्या पूर्ण घरात स्पष्टपणे ऐकु येतो.

असो. सुचविलेल्या उपायांबद्दल धन्यवाद. आता एकेक सुरू करतो.

ते बचलर्स नॉर्थ इंडियन्स आहेत का? असे असेल तर राजकारणी स्वतःहून मदत करतील.

बाकी मला वाटते सगळेच या फेज मधून जातात. करू दे एन्जॉय भाऊ. जोपर्यंत त्यांच्या घरात करतायत.

एखाद्या दिवशी एखाद्या पोलिसाला चहापाण्याला बोलवा..... (नसला कोणी ओळखीचा तर मित्र असतातच की आणि पोलिसांचे ड्रेस पण भाड्याने मिळतात Wink )..... त्या दंगेखोर शेजाऱ्यांना दिसेल अश्या बेताने दार उघडे टाकून दिवाणखान्यात गप्पा मारत बसा..... झालच तर निघताना जरा सलगीचे दोनचार डायलॉग्स मारा मोठ्याने!
नुसत्या एव्हढ्यानेही जरब बसते काहींना Wink

पोलिसांकडून काही होत नसेल तर लोकल राजकारण्यांना सांगून पाहिले तर
नवीन Submitted by महेश on 22 February, 2018 - 11:30
<<
वा
कायद्याचं राज्य व अच्छे दिन ते हेच का?

पोलिसांत एकदा तक्रार करून झालीय. त्यांन्नी तत्परतेने दखल घेउन ह्या मुलांन्ना पो. स्टे. ला घेउन पण गेले होते. पण मीच त्यांन्ना 'मुले विद्यर्थी आहेत व त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही अशी कारवाई करा' अशी विनंती केली होती.
ती माझी चूक होती असे माझ्या आता लक्षात येतेय कारण ती मुले बेमुर्वत आहेत हे आत्ता (उशिराच) उमजले आहे. पुन्हा एकदा तक्रार कणार आहे. घरमालकाच्या प्रतिसदाची एक दिवस वाट पाहत आहे.

अजुन थोड़ी सबुर धरा
अच्छे दिन येणार ! हे नक्की

ह्या अश्या कैटेगरी मधील मुले मूली वर्षभर धिंगाना आणि परिक्षेआधी फूल नाइट मध्ये सिलेबस अश्या प्रकारची बहुतांश असतात तेव्हा त्या रात्री तुम्ही व्याजासकट सगळा राग उणिदुनि वसूल करा रात्रभर त्यांच्या भिंती जवळ मोठ्याने स्पीकर्स लावून ( तेहि धींच्याक म्युझिक नाही तर आरती भजन टाइप वाली गाणी― ज्याचा ह्या मंडलीना नॉशिया असतो Proud )... एका रात्रीत असर मिळेल आणि पुढील टर्म तरी सुखात /साखर झोपेत जाईल ही अपेक्षा

राहणारे बहुसंख्य नाहीत याचा फायदा उठवतात. तुमची सोसायटी सेकंड होमवाल्यांची झाली आहे, तिथून बाहेर पडणेच फायद्याचे आहे. तुम्हीही भाड्याने देऊन दुसरीकडे जा. चारपाच वर्षांत परिस्थिती बदलू शकते.

Discrimination on the basis of marital status is illegal. You cant and must not do that.

एकंदरीत भाडेकरू बॅचलर आणि परदेशस्थ घरमालक यांची मेजॉरीटी दिसतेय तुमच्याकडे.. त्यामुळे जे कराल ते जपून.. तुमच्या शेजारची पोरं किती वाह्यात आहेत याची कल्पना नाही, मात्र सुरुवाती पासून बॅचल मुलांशी हटकून वागण्याऐवजी चांगले वागून राहिले तर अश्यावेळी आवाज कमी करा वगैरे विनंती करता येते आणि ते देखील विनंतीला मान देतात..

>>बियर सिक्स पॅक किंवा स्कॉच चा खंबा देऊन बघा विनंती ऐकतायत का. Lol
आधीच मर्कट तशात मद्य प्यायला अशी अवस्था होईल, Wink
आणि नंतर सारखीच अपेक्षा राहील असली Sad

>>वा
>>कायद्याचं राज्य व अच्छे दिन ते हेच का?
हो हेच, म्हणुन तर राजकारण्यांना सांगा असे म्हणालो.
अजुन एक म्हणजे पोलिस, सोशल मिडिया मधे निनावी तक्रार करा की तिकडे भलत्याच (रेव की काय असतात त्या) पार्ट्या चालू आहेत.
अर्थात हे सगळे फुकटचे सल्ले आहेत, तुम्हाला जो योग्य वाटेल आणि जमेल तो करा.
असे काही अनुभव पाहिले आहेत की पोलिस, राजकारणी कोणीच काही करू शकत नव्हते,
लोकांना अखेर नाईलाजाने घर बदलावे लागले Sad

{अजुन एक म्हणजे पोलिस, सोशल मिडिया मधे निनावी तक्रार करा की तिकडे भलत्याच (रेव की काय असतात त्या) पार्ट्या चालू आहेत.}

बापरे म्हणजे जो गुन्हा त्यांनी केलाच नाही त्यासाठी त्यांचं आयुष्य बरबाद करायचं? साध्या पाकिटमारावर खुनाचा खटला दाखल करायचा? Uhoh

आजूबाजूला लोकांना त्रास होतोय, ते ओरडताहेत हे सांगूनही जे लोक उद्दामपणे गोंधळ सुरूच ठेवताहेत त्यांना थोडा त्रास झाला तर ते वठणीवर येतील की.... रेव्ह पार्ट्या म्हणून वेगळे काय असते? हे लोक एवढा गोंगाट करत आत काय करताहेत ते कुणी पाहिलंय?

>>लोक एवढा गोंगाट करत आत काय करताहेत ते कुणी पाहिलंय?
खरंय, कल्पनाशक्तीचा वारू मोकाट उधळला की बरंच काही सुचतंय.

महेश आणि साधना यांच्या विचारसरणीचा म.सा.वि काय हे गणित करणारी बाहुली.

महेश आणि साधना यांच्या विचारसरणीचा म.सा.वि काय हे गणित करणारी बाहुली.>> >

धटासी आणावा धट | उद्धटासी पाहिजे उद्धट |

<अजुन एक म्हणजे पोलिस, सोशल मिडिया मधे निनावी तक्रार करा की तिकडे भलत्याच (रेव की काय असतात त्या) पार्ट्या चालू आहेत.>
निनावी का बरं? खोटं बोलायचंय म्हणून? आणि हे असले लोक दुसर्‍यांना नीतिमत्तेचे धडे देणार!

धटासी आणावा धट | उद्धटासी पाहिजे उद्धट |>>>+१
माझी बहिण राहते त्यांच्या समोरच्या इमारतीमधे असाच दंगा चालायचा. सरळ सांगून, पोलीस तक्रार करुन काही उपयोग नाही झाला. शेवटी कोणीतरी बॅट घेऊन गेले आणि त्यांना जाम दम भरला तेव्हा शांत झाले.

>>धटासी आणावा धट | उद्धटासी पाहिजे उद्धट |
नाहीतर काय !
एक खुप चांगला चित्रपट आहे, साधारण अशा टाईपचा "खोसला का घोसला"

>>शेवटी कोणीतरी बॅट घेऊन गेले आणि त्यांना जाम दम भरला तेव्हा शांत झाले.

बॅट घेऊन जाणे, त्यांच्या अभ्यासाच्या वेळी आपण गाणी लावणे, त्यांच्या घराला बाहेरुन कडी लावणे, त्यांच्या घरात ढेकुण सोडणे, त्यांचा कचरा न उचलणे, त्यांचे पाणी बंद करणे हे उपाय आधी सुचवले गेले आहेत आणि त्याला मी आक्षेप घेतला नाही कारण हे सगळे "जशास तसे" प्रकार एकवेळ ठीक आहेत. पण रेव्ह पार्टीज (जिथे सर्रास ड्रग्ज घेतली जातात) ची निनावी तक्रार करणे यात मला फरक जाणवतो. उद्या ती मुलं ISIS शी संबंधित आहेत किंवा बीफ खातात म्हणुन खोटी तक्रार कराल. कोणी मला उगाचच चिमटा काढला म्हणुन मी त्याचा हात तोडायचा? काही लिमिट हवं की नको?

त्या मुलांनी घर बदलले की बाकीच्या त्रासापासुन त्यांची सुटका होईल. पण ड्रग्जचा क्रिमिनल आरोप त्यांच्यावर लागला की कुठेही गेले तरी त्यांना प्रॉब्लेम येणार.

व्यत्यय, तुम्ही मुद्दा किती ताणताय? रेव्ह पार्टी चालते म्हणून पोलीस आले, झडती घेतली आणि काहीच सापडले नाही तरी गुन्हा दाखल होणार का? उलट पोलीस आले म्हणून हे लोक थोडे शहाणे तरी होतील. आणि खरेच ड्रग सापडले तर प्रश्न कायमचाच सुटला. दोन्ही बाजूने चांगल्या गोष्टीचाच विजय होतोय. यात तुम्हाला वाईट काय दिसतेय?

बाकी ड्रग वगैरे काहीही नसून हे लोक रात्री साईबाबा आरती करण्यात वेळ घालवत असूनही यक्ष यांच्या तक्रारींमुळे पोलिसांनी त्या भक्तांना ड्रगच्या खोट्या आरोपाखाली गजाआड करून गुन्हेगार म्हणून शिक्का मारण्याइतके यक्ष पॉवरफुल असते तर इथे धागा उघडायची वेळ आली नसती.

>>पोलीस आले म्हणून हे लोक थोडे शहाणे तरी होतील

मग खरी तक्रार करा ना की यांच्या आवाजाचा त्रास होतो. खोट्या तक्रारी का करता? पोलिसांच्या हाती कोलित मिळाल्यावर काय होते त्याचे एक उदाहरण माझ्या पहाण्यात आहे. पोलिसांची उपद्रव क्षमता प्रचंड आहे.

तक्रार खऱ्या नावानेच करायला हवी. मीही एकदा शेजारी सुनेला होणाऱ्या मारहाणीबद्दल तक्रार केली होती. पोलिसांनी माझे नाव व फोन नंबर लिहून घेतलेला करण मी संगीतलेल्या जागी पोहोचण्यासाठी त्यांना त्याची गरज होती. पण ज्यांच्याविरुद्ध तक्रार होती त्यांना ही माहिती त्यांनी दिली नाही.

मग खरी तक्रार करा ना की यांच्या आवाजाचा त्रास होतो. खोट्या तक्रारी का करता? पोलिसांच्या हाती कोलित मिळाल्यावर काय होते त्याचे एक उदाहरण माझ्या पहाण्यात आहे. पोलिसांची उपद्रव क्षमता प्रचंड आहे.+११११
पोलीस आणि राजकारणीही त्यात आले.

आपल्या प्रतिसादांबद्दल आणि मदतीबद्दल मनःपुर्वक धन्यवाद!
रेकॉर्ड केलेली clip पठवली होती so it worked!!!
घरमालक (actually मालकिण) हिने लगेच तिच्या भावाला पाठवून भाडेकर्‍यांना तंबी दिली. तसेच तिने त्यांना तातडिने घर सोडावयास सांगितले.
आत्तापर्यंत ती response देत नव्हती, पण एक पोलिस complaint व ही रेकॉर्ड केलेली clip ह्याने काम झाल्याचे प्रथमदर्शनी तरी वाटते.
आता ते लोकं केन्व्हा जातात त्याकडे लक्ष ठेउन आहे....
पुन्हा एकदा मनःपुर्वक धन्यवाद!

Pages