किती सांगायचय तरीही

Submitted by माउ on 21 February, 2018 - 19:48

किती सांगायचय तरीही सुरुवात होत नाही
नेमके बोलणे कसलेच तुझ्यामाझ्यात होत नाही

नुसताच खेळ चाले नजरेचा आपला जुना
दुरून पाहिले हलके तरी होतच राही गुन्हा

दाटून येते आभासांचे सावळे आकाश थोडे
तू सांग ना का अवेळी छळतात असे भास वेडे़

भरुन येते भावना पण बरसात होत नाही
नेमके बोलणे कसले तुझ्यामाझ्यात होत नाही..

-रसिका

Group content visibility: 
Use group defaults