मराठी भाषा दिन २०१८ - लहान मुलांसाठी उपक्रम घोषणा

Submitted by मभा दिन संयोजक on 21 February, 2018 - 01:52

मराठी भाषा दिन २०१८ - लहान मुलांसाठी उपक्रम घोषणा

ज्ञानपीठ विजेत्या कुसुमाग्रजांनी ‘माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, तिच्या संगती चालती द-याखो-यातील शिळा’, अशा शब्दांत मराठी भाषेचा गोडवा गायला आहे. मराठी भाषेचे इतके गर्भरेशमी वर्णन करणारे कुसुमाग्रज हे चिंतनशील लेखक, कवी, नाटककार होते. त्यांच्या मराठी भाषेसाठी दिलेल्या योगदानाची आठवण म्हणून त्यांच्या जन्मदिवशी आपण 'जागतिक मराठी भाषा दिवस' म्हणून साजरा करतो. आपल्या ह्या भाषेची गोडी पुढल्या पिढीपर्यंत पोचावी म्हणून हा उपक्रम.

माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।
-​संत ज्ञानेश्वर​

उपक्रम क्र. १. बोलबच्चन

मुलांनो, तुम्हाला काही विषय देत आहोत त्यावर तुम्हाला मराठीमधून बोलायचं आहे, अट एकचं - जास्तीत जास्त मराठी शब्द वापरायचा प्रयत्न करा Happy हे विषय आवडले नाहीत तर तुम्हाला उत्स्फूर्तपणे जे सांगायचं असेल ते आम्हाला ऐकवा.
विषय -
१. मी दिवाळी कशी साजरी केली
२. माझे आवडते पुस्तक
३. माझा आवडता खेळ
४. मी माझा वाढदिवस कसा साजरा केला
(यात कोणत्याही पुस्तकातील कविता किंवा उतारा वाचन नको Happy )

उपक्रम क्र. २. थँक यू पत्र

बऱ्याचदा आपण लहान मुलांना कोणी काही दिलं की थँक्स म्हणायला सांगतो. मुले सांगितल्या प्रमाणे म्हणतातही पण बऱ्याचदा काही गोष्टींसाठी थँक्स म्हणायचं राहून जातं. मग ते शाळेतल्या बाई असो की प्रेम करणारी आई. गिफ्ट देणारा सांता असो की मोदक देणारे बाप्पा. तर असंच मुलांना "थँक यू पत्र" लिहायच आहे.

नियम -

१. ह्या स्पर्धा नाहीत, उपक्रम आहेत.
२. हा उपक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलांसाठीच आहेत.
३. पालकांनी स्वता:च्या आयडीने मुलांनी लिहिलेल्या पत्राचे फोटो अपलोड करायचे आहेत.
४. प्रवेशिका देण्यासाठी मराठी भाषा दिन - २०१८ ह्या ग्रुपाचे सदस्यत्त्व घेऊन, त्यात 'लेखनाचा धागा' काढावा.
शीर्षक - थँक यू पत्र >> विषय >> पाल्याचे नाव>> मायबोली आयडी असे द्यावे.
४. बोलबच्चन ह्या उपक्रमात भाग घेणाऱ्या पाल्याचे ऑडिओ किंवा व्हिडीओ mabhadi@maayboli.com या इमेल पत्त्यावर पाठवाव्या. आम्ही त्या इथे प्रकाशीत करू
५. या उपक्रमासाठी वयोमर्यादा १२ वर्षांपर्यंत आहे.
६. एक पाल्य एका किंवा एकापेक्षा जास्त उपक्रमात भाग घेऊ शकतो. तसेच एका उपक्रमात एकापेक्षा जास्त प्रवेशिका पाठवू शकतो.
७. प्रवेशिका २७ फेब्रुवारी ते २ मार्च (11 pm IST) पर्यंत पाठवाव्या.

विषय: 
Groups audience: 
- Private group -
Group content visibility: 
Public - accessible to all site users