डीएसके - एका तेजस्वी तार्‍याचा अस्त?

Submitted by बेफ़िकीर on 18 February, 2018 - 07:55

डीएसके - एका तेजस्वी तार्‍याचा अस्त? -

डीएसके व त्यांच्या पत्नीला अटक होण्यापर्यंत वेळ येण्याची काही महत्वाची कारणे:

१. फुरसुंगी येथे जमीन विकत घेऊन जे फ्लॅट बांधले ते अवाच्या सवा भावाने विकायला काढल्यामुळे नुकसान झाले.

२. स्वतः डीएसके ह्यांच्या गाडीला झालेल्या अपघातात त्यांच्या चालकाचे निधन झाले. डीएसके सहीसलामत वाचले असले तरीही डीएसके ह्या समुहाशी ह्या ना त्या प्रकारे (ग्राहक / गुंतवणूकदार / भागीदार / कर्मचारी / अर्थपुरवठादार) संबंधीत असलेल्या जनसमुदायात एक भावना वेगाने निर्माण झाली. ती अशी की उद्या स्वतः डीएसके ह्यांना काही झालेच तर समुहाचे व गुंतवणूकीचे काय होणार! ह्याचे कारण असे की डीएसके ह्यांना सुयोग्य वारसदार नाही. हा एकखांबी तंबू डीएसकेंनंतर कोसळेल हे भय सर्वत्र पसरले.

३. तिसर्‍या कारणाला एक प्रकारे दुसरा मुद्दाच कारणीभूत आहे. डीएसके समुहात गुंतवलेले पैसे परत मिळवण्यासाठी होणारी गर्दी वाढू लागली तसे पैसे त्वरीत परत मिळणे बंद झाले व पैसे परत मिळण्यात दोन, तीन महिन्यांचा कालावधी जाऊ लागला. ह्या दरम्यान सर्वत्र असुरक्षिततेची भावना वेगाने पसरली व गुंतवणूकदारांच्या रांगा लागणे, भांडणे होणे वगैरे प्रकार सुरू झाले. आजवर डीएसके समुहाने नित्यनेमाने चांगल्या दराने व्याज दिलेले होते. मात्र एकदम सगळेच गुंतवणूकदार दारात उभे राहिले तर एवढे पैसे एकदम परत करणे हे आव्हान ह्या समुहाला पेलवणे शक्य नव्हते. परिणामतः डीएसके समुह बदनामीच्या भोवर्‍यात अडकला व चोहीकडून कायद्याने घेरला गेला.

नेमके चुकले कोठे?

१. प्रत्येक प्रकल्प स्वतंत्र प्रॉफिट सेंटरप्रमाणे उभा करणे हा ट्रेंड भारतीय उद्योगविश्वात येऊन दशके लोटलेली आहेत. बांधकाम क्षेत्रात असलेली आव्हाने काहीशी वेगळी असली तरीही कटाक्षाने जिथला पैसा तिथेच वापरणे आणि प्रादेशिकतेनुसार अर्थकारण ठेवणे हे अतिशय महत्वाचे आहे. उद्या मॅरियट हे प्रतिष्ठित हॉटेल आहे म्हणून ते लोणंदला जाऊन फाईव्ह स्टारच्या भावात रूम्स भाड्याने देऊ शकणार नाहीत.

२. नेतृत्वाची दुसरी फळी निर्माण करण्यात आलेले अपयश हेही एक कारण आहे. तसे पाहायला गेले तर डीएसकेंच्या जवळचे असे खूप लोक होते. मात्र ते सगळे वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांची साथ सोडून गेले. डीएसके ह्यांचे एककल्ली व्यक्तीमत्व आणि त्या त्या लोकांच्या महत्वाकांक्षा अशी दोन्ही कारणे ह्यामागे होती.

३. संस्थेपेक्षा माणूस मोठा ठरणे / गणला जाणे हे संस्थेसाठी धोक्याचे ठरते.

४. ह्या क्षेत्राला असलेला राजकीय हस्तक्षेपाचा शापसुद्धा ह्या कोलमडीला कारणीभूत आहे. हा हस्तक्षेप नाकारता येत नाही ही चूक म्हणता येणार नाही. मात्र हा हस्तक्षेप कमीत कमी होईल असे प्रकल्पच हाती घेणे हे मात्र शक्य होते.

एक आणखी वेगळा दृष्टिकोनः

आपला समाज सेन्टिमेन्ट्सवर चालतो हे दुर्दैव सर्वज्ञात आहे. आजवर नित्यनेमाने व आकर्षक दराने व्याज घेणार्‍या गुंतवणूकदारांनी पैसे परत मिळवताना जराही संयम दाखवला नाही. त्यांनी तो का दाखवावा हा प्रश्न अगदी रास्त असला तरीही जर समुहाला पैसे परत द्यायला थोडा अधिक अवधी मिळाला असता तर सगळ्यांचे पैसे हळूहळू मिळाले असते. हा अवधी कायद्याकडून मिळण्याबाबत मी म्हणत नसून गुंतवणूकदारांकडून मिळण्याबाबत म्हणत आहे. म्हणजे तक्रारींवर तक्रारी करण्यापूर्वी थोडा अधिक वेळ घेतला असता तर कदाचित बरेच काही सुरळीत झाले असते. पण एकदा प्रकरणात कायदा आल्यानंतर इतर कोणत्याच गोष्टीला महत्व राहत नाही.

हेही तितकेच खरे की अनेक ज्येष्ठ नागरीक, चढ्या व्याजाच्या आकर्षणाने आलेले अनेक मध्यमवर्गीय / कनिष्ठ मध्यमवर्गीय गुंतवणूकदार ह्यांचे मोठे नुकसान झाले. डीएसकेंच्या आज असलेल्या प्रॉपर्टीज आता पड्या भावात आल्या आहेत.

एक दहा वर्षांपूर्वीचा किस्सा - डीएसके समुह तेव्हा तुफान घोडदौड करत होता. एका नवीन प्रकल्पाचे हस्तांतरण करण्याचा मोठा समारंभ होता. त्यासाठी कोणी सुप्रसिद्ध व्यक्ती येणार होती. येण्याच्या रस्त्यावर दगडांचा मोठा ढीग पडला होता आणि त्यामुळे वाहनांना अडथळा होत होता. डीएसकेंनी कर्मचार्‍यांना विचारले की हा ढीग का हलवला नाही. कर्मचार्‍यांनी उत्तरे दिली की माणसे केव्हाची बोलावली आहेत पण अजून आलीच नाहीत. डीएसकेंनी स्वतः दगड उचलून मागे टाकायला सुरुवात केली. खडबडून सगळे कर्मचारी धावले व दगड स्वतः उचलू लागले.

लोकांचे टेलिफोन स्वच्छ करून पोट भरणारा एक कष्टाळु व अतिशय गरीब तरुण पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील एक तेजस्वी तारा झाला आणि अचानकच निस्तेजही झाला. अजूनही त्यांची सच्ची कमाई, म्हणजे त्यांच्यावर अपरिमित प्रेम करणारे त्यांचे कर्मचारी डोळ्यांत पाणी आणून आपल्या हिरोची अवस्था पेपरमध्ये वाचतात.

============

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

The bank’s CEO and MD, and its former CMD were arrested.
In a simultaneous crackdown across different cities, the Pune police on Wednesday arrested six persons, including Ravindra Marathe, the CEO and MD of Bank of Maharashtra (BoM) and the bank’s former CMD Sushil Muhnot, in connection with the ₹2000-crore D.S. Kulkarni fraud case.

http://www.thehindu.com/news/national/other-states/ds-kulkarni-scam-pune...

Whatsapp वर आलेला विषयाशी संबंधित एक मेसेज इथे चिकटवतोय

'काला' चित्रपटाचे परीक्षण वाचत होतो ...

'अभ्यंकर' आडनावाचे लँड माफिया (नाना पाटेकर) धारावी झोपडपट्टी गिळंकृत करणार असतात अशी स्टोरी लाईन वाचून तुफान हसलो, हिंदी वाल्याना आणि साऊथ वाल्याना मराठी आडनावे आणि त्यांच्याशी निगडित "धंदे" हे कोणीतरी नीट समजावून सांगण्याची खूप गरज आहे, जोशी-अभ्यंकर-देशपांडे-कुलकर्णी-बापट-गोखले अशी आडनावे जास्तीत जास्त सकाळी फिरायला जाताना कम्पाउंड वरील फुलझाडांची फुले घाबरत घाबरत ढापतील हो ... त्यांनी धारावी झोपडपट्टी ढापणे म्हणजे अतिशयोक्ती ची पण अतिशयोक्ती

☺... येन्न पास्कला !!!

व्यत्यय,
धारावीचा प्लॅन निवडणूक जवळ येते, तेव्हा फडणवीस लवकरच मांडतील पहा. आता ती नक्की कुणाच्या घशात कशी जाईल ती पुढची गम्मत.

बाकी जोशी-अभ्यंकर म्हटलं की खून खटला आठवतो..

रच्याकने हिंजवडीच्या ब्लु-रिज सोसायटी मधे रहाणारा मित्र परांजपे बिल्डरना भर्भरुन शिव्या घालत होता. तिकडे ग्रामपंचायत आणि परांजपे दोघेही प्रॉपर्टी टॅक्स वसुल करताहेत. आणि परांजपे कशावरती किती खर्च केला हे सांगायला तयार नाही. मी सांगतो तितके पैसे मुकाट्याने द्या असा पवित्रा बिल्डरने घेतलाय. सोसायटीने विरोध केल्यावर रस्त्यावरची लाईट रात्री बंद करणे, पाणी बंद करणे, पाळलेल्या गुंडांकरवी कचरा सगळीकडे पसरवणे, धमक्या देणे असे प्रकार चालु केलेत.
त्या मित्राला हा व्हॉट्सअ‍ॅप मेसेज दाखवल्यावर कचकुन एक अस्सल शिवी हासडली त्याने. Happy

त्यांना ५० कोटी रक्कम भरायची आहे असं ऐकण्यात आलं. महाराष्ट्राची लोकसंख्या १० कोटी आहे. प्रत्येकाने फक्त पाच रूपये दिले तरी ५० कोटी रूपये भरून ते सुटू शकतात. कशाला एव्हढी डोकेफोड करायची ?

<< प्रत्येकाने फक्त पाच रूपये दिले तरी ५० कोटी रूपये भरून ते सुटू शकतात. >>
-------- अरे पण हे प्रत्येकाने का आणि कशासाठी करायचे?

म्हणजे ?
त्यांनी सुटू नये का ? मी एक हिशेब सांगितला. ज्यांना नाही द्यायचे त्यांनी नका देऊ ना. समजा निम्मे लोक विरोधात आहेत. तर निम्मे लोक दहा रूपये देतील. दहा टक्के लोकांनी प्रत्येकी ५० रूपये दिले तरी चालेल. अगदी पाच टक्के लोक १०० रुपये देतील. एक टक्का लोक प्रत्येकी ५०० रूपये देऊ शकतील.
एक टक्का लोक तरी देतीलच की नाही ?
अगदी अर्धा टक्का लोक असतील तरी १००० रूपये प्रत्येकी होतील. अशक्य नाही.
पण या पैशात हजारो लोकांना रोजगार मिळेल. त्यांच्या मुलांचे शिक्षण पूर्ण होईल. राज्याची अर्थव्यवस्था सावरेल. त्यावर अनेक छोटे उद्योग उभे राहतील. त्यांना दोन पैसे मिळतील.
लोकांना घरे मिळतील. त्यामुळे त्या भागाचा विकास होईल. विकासामुळे आजूबाजूच्या परीसरात लोकांना रोजगार मिळेल.
खुद्द डीसकेंच्या स्कीम मधे लोक रहायला आले की त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हजारो लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
त्यामुळे डीएसके पुन्हा सक्रीय व्हायला हवेत.

मला पण पाच रुपये द्या. त्यातून एक अंड घेईन. अंड्यातून एक कोंबडी येईल. तिला उजवायला शेजारच्यांचा कोंबडा घेईन. मग भरपूर अंडी. भरपूर अंड्यांमधून भरपूर कोंबडी. गोत्रातच संबंध नको म्हणून खूप कोंबड्यांना उजवायला खूप शेजाऱ्यांकडून खूप कोंबडे घेईन.

पिलू होईल असे फर्टाईल अंडे ५ रुपयांत मिळत नाही.
मिळाले तर त्याला उबवणार कोण?
अन उबवून त्यातून कोंबडाच निघाला, तर तो काय करायचा?
त्यापेक्षा ती वर सांगितलिय तशी दक्षिणा दिलेली बरी.

मधुरांबे,
आमच्या हम दो हमारे दो कुटुंबाच्या वतीने दक्षिणा द्या हं (तुमच्याच खिशातुन.. per head जास्त नसेल ना? Wink )
आणि हो, संकल्प सोडताना आम्हाला बोलवा आम्ही तुमच्या हाताला हात लावून मम म्हणू. पळीने हातावर पाणी अर्थातच तुम्ही सोडा. हाकानाका

तुम्ही भरत किंवा इतर तसले काही असाल तर कृपया माझ्या नावाने प्रतिसाद दिला नाही तर बरे होईल.

congrats राहुल,
वाळीत टाकलेल्यांच्या यादीत तुमचे नाव लिहिले गेले आहे Happy

मधुरांबे, उद्या दाऊदच्या इलाजासाठी पैसे द्या म्हणाल......तो बरा होऊ नये का? असे पण विचाराल

काय चाल्लय कळेना बुवा!!

मधुरांबे, उद्या दाऊदच्या इलाजासाठी पैसे द्या म्हणाल......तो बरा होऊ नये का? असे पण विचाराल >>>

दाऊद आणि डीएसके तुम्हाला एकच वाटत असतील तर तुम्ही विचारा तसे. मी का विचारू ?

खरंच किती तर्कशुद्ध विचार करता हो तुम्ही भरत ? पण असा तर्कशुद्ध प्रतिसाद दुस-याने केलेला चालत नाही तुम्हाला. लगेच कंटाळा येतो. का बरें ?

चला हे पण सुरू झाले. काल मिळालेल्या माहीतीनुसार यांचे हे ओरिजिनल आणि एकच एक प्रोफाईल आहे म्हणे.. तर यांना इतरांना वाट्टेल तसे बोलायचा अधिकार मायबोलीने दिलेला असणारच.

मागे त्या हरीनामे बाई सांगायच्या असे, माझ्या इनबॉक्स मध्ये स्क्रीन शॉट आले , अन्नोन id वरून मेल आले वगैरे सांगायच्या.
आता तुम्ही माहिती मिळाली वगैरे सांगतायतुम्हाला अशा महित्या देते कोण हो?
माबो इन्फो सर्व्हिस वगैरे "सुरू" झालीये का?

तो आयडी तुमचाच होता असे त्या बेबनाव झालेल्या धाग्यावर वाचले. आणि गेलेला आयडी देखील. तेव्हां हे थांबवा उद्योग. नव्या आलेल्या आयडीला आपल्याच आयडींवरून त्रास द्यायचा जेणेकरून तो काही उद्धट बोलेले हा तुमचा व्यवसाय आहे असे दिसतेय.

माबो इन्फो सर्व्हिस सुरू झाली का वगैरे माझ्याच चौकशा करण्याऐवजी तुम्ही कोण आहात, नाव गाव काय हे लोकांना समजेल असे प्रोफाईल ठेवा आणि चौकशा करा. तुमच्याच मित्राने हे तुम्हाला सांगितले होते. स्वतः अनामिक राहून दुस-यांच्या फालतू चौकशा का करत फिरता ?

कदाचित तुम्ही जुने असल्याने तुमच्यावर कारवाई होणार नाही. पण मी नवीन असल्याने तुमच्या अवांतर पोस्टींना प्रतिसाद दिला म्हणून कारवाई होईल यामुळे तुम्हाला उत्तर देण्याचे टाळले होते. पण मला वाटतंय तुम्ही पातळ्या सोडूनच प्रतिसाद देताय. अर्थात पातळी असेल तर

<< लोकांचे टेलिफोन स्वच्छ करून पोट भरणारा एक कष्टाळु व अतिशय गरीब तरुण पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील एक तेजस्वी तारा झाला आणि अचानकच निस्तेजही झाला. अजूनही त्यांची सच्ची कमाई, म्हणजे त्यांच्यावर अपरिमित प्रेम करणारे त्यांचे कर्मचारी डोळ्यांत पाणी आणून आपल्या हिरोची अवस्था पेपरमध्ये वाचतात. >>

-------- प्रेम आन्धळे असते....

सच्ची कमाई कशाला म्हणायचे याची व्याख्याच बदलावी लागेल. चुकीचे वर्तन, गैरकृत्य असेल तर त्याला चुकच म्हणायचे... आपल्या माणसाने केले तर त्याचा त्रास जास्तच होतो.

दाऊदचं फॅमिली नेम कासकर आहे ना? म्हणजे त्याची इनिशियल्स पण डीXके अशीच होतील.

नवीन Submitted by भरत. on 24 June, 2018 - 10:22

दाऊद इब्राहीम कासकर (DIK) Happy

डीएसके यांचे बंधू मकरंद कुलकर्णी यांना मुंबई विमानतळावर अटक.
अमेरिकेला जाण्याच्या बेतात असतांना पोलिसांची कारवाई

अरेरे Sad

In his letter, describing his struggles with raising four daughters he scoffed at the Union government’s campaign – “Beti Bachao, Beti Padhao”. “It is very easy for politicians to make tall claims from the dais, but they should ask parents of girls, how difficult it is to raise daughters,” he wrote.

Is it very easy to raise sons? Do they get raised without attributing any resources for them..

Just asked...

Pages