डीएसके - एका तेजस्वी तार्‍याचा अस्त?

Submitted by बेफ़िकीर on 18 February, 2018 - 07:55

डीएसके - एका तेजस्वी तार्‍याचा अस्त? -

डीएसके व त्यांच्या पत्नीला अटक होण्यापर्यंत वेळ येण्याची काही महत्वाची कारणे:

१. फुरसुंगी येथे जमीन विकत घेऊन जे फ्लॅट बांधले ते अवाच्या सवा भावाने विकायला काढल्यामुळे नुकसान झाले.

२. स्वतः डीएसके ह्यांच्या गाडीला झालेल्या अपघातात त्यांच्या चालकाचे निधन झाले. डीएसके सहीसलामत वाचले असले तरीही डीएसके ह्या समुहाशी ह्या ना त्या प्रकारे (ग्राहक / गुंतवणूकदार / भागीदार / कर्मचारी / अर्थपुरवठादार) संबंधीत असलेल्या जनसमुदायात एक भावना वेगाने निर्माण झाली. ती अशी की उद्या स्वतः डीएसके ह्यांना काही झालेच तर समुहाचे व गुंतवणूकीचे काय होणार! ह्याचे कारण असे की डीएसके ह्यांना सुयोग्य वारसदार नाही. हा एकखांबी तंबू डीएसकेंनंतर कोसळेल हे भय सर्वत्र पसरले.

३. तिसर्‍या कारणाला एक प्रकारे दुसरा मुद्दाच कारणीभूत आहे. डीएसके समुहात गुंतवलेले पैसे परत मिळवण्यासाठी होणारी गर्दी वाढू लागली तसे पैसे त्वरीत परत मिळणे बंद झाले व पैसे परत मिळण्यात दोन, तीन महिन्यांचा कालावधी जाऊ लागला. ह्या दरम्यान सर्वत्र असुरक्षिततेची भावना वेगाने पसरली व गुंतवणूकदारांच्या रांगा लागणे, भांडणे होणे वगैरे प्रकार सुरू झाले. आजवर डीएसके समुहाने नित्यनेमाने चांगल्या दराने व्याज दिलेले होते. मात्र एकदम सगळेच गुंतवणूकदार दारात उभे राहिले तर एवढे पैसे एकदम परत करणे हे आव्हान ह्या समुहाला पेलवणे शक्य नव्हते. परिणामतः डीएसके समुह बदनामीच्या भोवर्‍यात अडकला व चोहीकडून कायद्याने घेरला गेला.

नेमके चुकले कोठे?

१. प्रत्येक प्रकल्प स्वतंत्र प्रॉफिट सेंटरप्रमाणे उभा करणे हा ट्रेंड भारतीय उद्योगविश्वात येऊन दशके लोटलेली आहेत. बांधकाम क्षेत्रात असलेली आव्हाने काहीशी वेगळी असली तरीही कटाक्षाने जिथला पैसा तिथेच वापरणे आणि प्रादेशिकतेनुसार अर्थकारण ठेवणे हे अतिशय महत्वाचे आहे. उद्या मॅरियट हे प्रतिष्ठित हॉटेल आहे म्हणून ते लोणंदला जाऊन फाईव्ह स्टारच्या भावात रूम्स भाड्याने देऊ शकणार नाहीत.

२. नेतृत्वाची दुसरी फळी निर्माण करण्यात आलेले अपयश हेही एक कारण आहे. तसे पाहायला गेले तर डीएसकेंच्या जवळचे असे खूप लोक होते. मात्र ते सगळे वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांची साथ सोडून गेले. डीएसके ह्यांचे एककल्ली व्यक्तीमत्व आणि त्या त्या लोकांच्या महत्वाकांक्षा अशी दोन्ही कारणे ह्यामागे होती.

३. संस्थेपेक्षा माणूस मोठा ठरणे / गणला जाणे हे संस्थेसाठी धोक्याचे ठरते.

४. ह्या क्षेत्राला असलेला राजकीय हस्तक्षेपाचा शापसुद्धा ह्या कोलमडीला कारणीभूत आहे. हा हस्तक्षेप नाकारता येत नाही ही चूक म्हणता येणार नाही. मात्र हा हस्तक्षेप कमीत कमी होईल असे प्रकल्पच हाती घेणे हे मात्र शक्य होते.

एक आणखी वेगळा दृष्टिकोनः

आपला समाज सेन्टिमेन्ट्सवर चालतो हे दुर्दैव सर्वज्ञात आहे. आजवर नित्यनेमाने व आकर्षक दराने व्याज घेणार्‍या गुंतवणूकदारांनी पैसे परत मिळवताना जराही संयम दाखवला नाही. त्यांनी तो का दाखवावा हा प्रश्न अगदी रास्त असला तरीही जर समुहाला पैसे परत द्यायला थोडा अधिक अवधी मिळाला असता तर सगळ्यांचे पैसे हळूहळू मिळाले असते. हा अवधी कायद्याकडून मिळण्याबाबत मी म्हणत नसून गुंतवणूकदारांकडून मिळण्याबाबत म्हणत आहे. म्हणजे तक्रारींवर तक्रारी करण्यापूर्वी थोडा अधिक वेळ घेतला असता तर कदाचित बरेच काही सुरळीत झाले असते. पण एकदा प्रकरणात कायदा आल्यानंतर इतर कोणत्याच गोष्टीला महत्व राहत नाही.

हेही तितकेच खरे की अनेक ज्येष्ठ नागरीक, चढ्या व्याजाच्या आकर्षणाने आलेले अनेक मध्यमवर्गीय / कनिष्ठ मध्यमवर्गीय गुंतवणूकदार ह्यांचे मोठे नुकसान झाले. डीएसकेंच्या आज असलेल्या प्रॉपर्टीज आता पड्या भावात आल्या आहेत.

एक दहा वर्षांपूर्वीचा किस्सा - डीएसके समुह तेव्हा तुफान घोडदौड करत होता. एका नवीन प्रकल्पाचे हस्तांतरण करण्याचा मोठा समारंभ होता. त्यासाठी कोणी सुप्रसिद्ध व्यक्ती येणार होती. येण्याच्या रस्त्यावर दगडांचा मोठा ढीग पडला होता आणि त्यामुळे वाहनांना अडथळा होत होता. डीएसकेंनी कर्मचार्‍यांना विचारले की हा ढीग का हलवला नाही. कर्मचार्‍यांनी उत्तरे दिली की माणसे केव्हाची बोलावली आहेत पण अजून आलीच नाहीत. डीएसकेंनी स्वतः दगड उचलून मागे टाकायला सुरुवात केली. खडबडून सगळे कर्मचारी धावले व दगड स्वतः उचलू लागले.

लोकांचे टेलिफोन स्वच्छ करून पोट भरणारा एक कष्टाळु व अतिशय गरीब तरुण पुण्यातील बांधकाम क्षेत्रातील एक तेजस्वी तारा झाला आणि अचानकच निस्तेजही झाला. अजूनही त्यांची सच्ची कमाई, म्हणजे त्यांच्यावर अपरिमित प्रेम करणारे त्यांचे कर्मचारी डोळ्यांत पाणी आणून आपल्या हिरोची अवस्था पेपरमध्ये वाचतात.

============

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुन्तवणूक करताना भावना, परत पैसे मिळतील हा विश्वास हे मोठी भूमिका निभावतात. तो विश्वास गमावल्यावर मोठ-मोठे तारे निखळणे हे नैसर्गिक आहे.

आज त्यान्चे आवाहन बघितले, मगरीचे आसवे वाटले. हे स्वत: ला लाखो तरुणान्चे (त्यान्च्या यशाचे) 'गुरु' कसे म्हणवतात?

फेरफटका तुमची मागच्या पानावरची पोस्ट मस्त आहे.
बाकी मला या सर्व प्रकारात फार गती नाही त्यामुळे मी फक्त वाचनमात्र.

<<<स्वतः रिसर्च करण्याची, माहिती काढण्याची आणी स्वतः निर्णय घेण्याची तयारी कुठे दिसत नाही आणी म्हणून गल्लो-गल्ली तथाकथित तज्ञांचं पेव फुटतं.>>>
हे अगदी बरोबर.
मुळात दुसरा कुणि आपल्यावर उपकार करणार आहे की स्वतःच्या भल्या साठी काही करतो आहे, हे समजायला शिकले पाहिजे. गुंतवणुकीत पैसे बुडायची शक्यता असते, ते बुडले तर चालेल का याचा विचार करूनच पैसे गुंतवावे. मग मागून रडारड, राग, शिव्या काहीहि केलेत तरी त्याचा काही उपयोग नाही. शिवाय सरकार, पोलीस यांनी काहीतरी करावे नाहीतर त्यांनाहि शिव्या यातच सगळे मग्न असतात.

हे सगळे अवघड आहे हो. फार अक्कल लागते त्याला. आणि फार फार थोड्या लोकांना तेव्हढी अक्कल असते. बहुतेक जण काहीतरी चुकीचे करून बसतात नि गावभर शिव्या देत, दुसर्‍याची बदनामी करत हिंडत असतात!

बरोबर फार फार थोड्यांना अक्कल असते जे आतल्या गोटातून बातमी आल्यावर स्वतःचे पैसे काढून घेतात आणि इतरांना सबूरीचा सल्ला देत फिरतात

>><<स्वतः रिसर्च करण्याची, माहिती काढण्याची आणी स्वतः निर्णय घेण्याची तयारी कुठे दिसत नाही आणी म्हणून गल्लो-गल्ली तथाकथित तज्ञांचं पेव फुटतं.>>>
हे अगदी बरोबर.
there are more studio experts than studious experts! Happy

विषयाकडे -
दिसके ने लोकांकडून पैसे न घेता बँकेकडून कर्ज घेतले असते तर वाचला असता. बँकेने नक्कीच मुदत वाढवून दिली असती.

<<>>
मायबोली एक studio च आहे. अगदी सिनेमाच्या studio सारखा! इथले काही खरे नाही! उगीच आपले काहीतरी खरडायचे - त्याचा काही उपयोग नाही. कुणाचीहि मते बदलत नाहीत, की सरकार आपली धोरणे मायबोली वाचून बदलत नाहीत.
खरे studious experts हे जाणून मायबोलीवर आपला वेळ घालवत नाहीत. कधी अब्दुल कलाम, इ. लोक इथे लिहिताना आढळतात का?

इथे येऊन काही वेळ हास्य मौज करावी, गाणी लिहावी (त्याला काव्य असे म्हणावे, किंवा "तरहि" गझल असे नाव द्यावे) गोष्टी लिहाव्या, विनोद लिहावे. परदेशी गेलेल्या मायबोलीकरांशी संवाद साधावेत. काय उगाच आप आपसात हमरीतुमरी वर येऊन भांडणे करायची?

>>काय उगाच आप आपसात हमरीतुमरी वर येऊन भांडणे करायची?
काय राव ऊगाच ट.डो.पा. प्रश्ण विचारता? Happy

>>दिसके ने लोकांकडून पैसे न घेता बँकेकडून कर्ज घेतले असते तर वाचला असता. बँकेने नक्कीच मुदत वाढवून दिली असती.
बॅकेने बरच काही वाढवून दिलं असतं .. Happy अजून हजार एक करोड चा खड्डा खणून मग बोंबाबोंब झाली असती. किंबहुना ईथे लोकांनी केस केली म्हणूनच साहेब 'आतली' हवा खात आहेत.

<<दिसके ने लोकांकडून पैसे न घेता बँकेकडून कर्ज घेतले असते तर वाचला असता. बँकेने नक्कीच मुदत वाढवून दिली असती.>> याबाबतीत पण त्यांच्या अटकेपूर्वी एक बातमी होती, त्यांना बुलडाणा का कोणत्यातरी बँकेकडून कोर्टात भरायच्या रकमेसाठी कर्ज मिळणार होते म्हणे. परंतू त्यासाठी त्यांनी जी मालमत्ता तारण दाखवली ती पण आधीच कोणाकडे तरी तारण होती. कोर्टाने त्या बँकेलाही झापले म्हणे व त्यांच्या अटकेवर शिक्कामोर्तब केले. Uhoh

>>त्यांना बुलडाणा का कोणत्यातरी बँकेकडून
बुलडाण्याला बँक पण आहे? कमाल आहे!

बुलडाण्याला बँक पण आहे? कमाल आहे!>>
बुलडाण्याला आहे की नाही माहीत नाही पण कोठेतरी बुलडाणा अर्बन बँक आहे. Wink
https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/pune-pol...

>>कोठेतरी बुलडाणा अर्बन बँक
हे बाकी भारी असतं... मला नेहेमीच आश्चर्य वाटायचं की ही बॅक ओफ 'बरोडा' ठाण्यात काय करते? Happy बँक ऑफ 'कॅनरा' तर कहरच होता.. Wink
आयुष्यात असे 'बी' प्रश्ण पडत असत.. त्यात गंमत होती खरं.! आता 'आईने गुगल' मूळे सगळच सगळ्यांना माहित असतं. not fair!

बँक ऑफ 'कॅनरा' तर कहरच होता.. >>>> मी कधी माहीती काढली नाही पण मला अजूनही वाटतं की ग्लोबलायझेशन मुळे कॅनडाची बँक खरंच भरतात आलीये. Wink मी तर गुगळून पण नाही पाहिलं अजून. Uhoh

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्यावर चार हजार पंचेचाळीस कोटी रुपयांची देणी असल्याची माहिती आतापर्यंतच्या तपासात पुढे आली आहे. यातील अठ्ठावीसशे ब्यान्नव कोटी रुपये हे विविध बँकांची कर्जे आहेत. तर, अकराशे त्रेपन्न कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. डीएसकेंनी वेगवेगळ्या नावांनी 59 कंपन्या उभारल्या आहेत. त्या मार्फत डीएसकेंनी आर्थिक व्यवहार केले असल्याची माहितीदेखील तपासात पुढे आली आहे.
https://goo.gl/vWvcL2

4 हजार कोटी? मग 2 कोटी लोकांनी फक्त 2000 ते 3000 रुपये द्यायचे आहे. जर पिझ्झा- चित्रपट तिकीटांवर जर 1000 रुपये खर्च करू शकतात तर एका पुणेकरला वाचवण्यासाठी नक्कीच करता येईल. शेवटी देशभक्तीचे काम आहे.
तिकड् सियाचीनवर -20 डिग्रीमध्ये सैनिक उभे राहू शकतात तर डिएसके साठी तुम्हाला 2000 फक्त द्यायला हवेच..

चला शनिवारवाड्यासमोर बाकडे टाकून पैसे गोळा करायला सुरूवात करा

छान माहिती येत आहे.

जर बेफी यांचा हेतू डीएसकेना सॉफ्ट कॉर्नर मिळावा असा असेल तर नीरव मोदी प्रकरण पाहता असे वाटते की धागा चुकीच्या टाईमावर आला Happy

अरे आयता ट्रंपचा मुलगा भारतात आला आहे. तोहित्याच धंद्यातला. असे पैसे बुडवणारे लोक म्हणजे एकदम त्यांचे सख्खे भाऊच जणू. खरे तर बिल्डिगा बांधणे यापेक्षा लोकांचे पैसे बुडवणे हाच खरा ट्रंपचा धंदा. डी एस के नी एकदाच पैसे बुडवले, ट्रंप तर गेली कित्येक वर्षे हाच धंदा करत आले आहेत!
एकदम जमेल त्यांचे. मग एकदम डी एस के पंतप्रधान होतील बघा!

>>एकदम जमेल त्यांचे. मग एकदम डी एस के पंतप्रधान होतील बघा!
नको रे बाबा... मग ते ही डोक्यावर पडल्यागत विधाने करत फिरतील..
ऊदा: शाळेत पोरं बंदुका घेऊन येत असतील तर शिक्षकांनी पण ए के 47 घेऊन यावे..
https://www.ft.com/content/0738d2f4-1757-11e8-9376-4a6390addb44
पेक्षा डीएसके व त्यांचे 47 घोटाळे परवडले..!

तेजस्वीं तार्‍याने तोडलेले तारे. तरीही त्याना संधी द्यायला हवी . कारण ते ' आपले ' आहेत ना !!
अहाराष्ट्र टाइम्स दि. २३ फेब २०१८.मुंबई:

पुण्यातील बांधकाम व्यावसायिक दीपक सखाराम कुलकर्णी अर्थात डीएसके यांच्या अटकेनंतर आता त्यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी याच्यावरही अटकेची टांगती तलवार आहे. शिरीषच्या बँक खात्यात गुंतवणूकदारांचे १६३ कोटी रुपये जमा करून कुलकर्णी कुटुंबीयांनी त्याचा उपयोग मनमानी पद्धतीने आणि वैयक्तिक मालमत्ता खरेदीसाठी केल्याचा दावा करत पोलिसांनी गुरुवारी त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जाला तीव्र विरोध दर्शवला.

गुंतवणूकदारांच्या दोनशे कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी डीएसके व त्यांच्या पत्नी हेमंती यांच्याविरोधात पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. त्याच एफआयआरमध्ये शिरीषही आरोपी असल्याने त्याने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. याविषयी न्या. साधना जाधव यांच्यासमोर सुनावणीस झाली. गुंतवणूकदारांकडून घेतलेल्या रकमेपैकी १६३ कोटी रुपये हेमंती यांच्या बँक खात्यातून शिरीषच्या खात्यात वळवण्यात आले. त्यापैकी ३४ कोटी रुपयांचा उपयोग करून पुण्यातील हवेली तालुक्यातील टाकवी येथे जमीन खरेदी करण्यात आली आणि नंतर तीच जागा डीसके यांच्या ‘डीएसके मोटर्स’ कंपनीला प्रतिमहा ४८ लाख रुपये भाड्याने देण्यात आली, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या पैशांचा मनमानी पद्धतीने गैरवापर करण्याच्या कारस्थानात शिरीषही सहभागी असल्याने त्यांना जामीन देऊ नये, अशी विनंती पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतर्फे विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांनी केली

2 कोटी लोक आणणार कुठून >>>>>>>>>

फक्त २ कोटी हो! ६०० कोटी मतदार आहेत भारतात (भाजपाला वोट देणारे - पंप्र च्या गणितानुसार). ३० टक्के वोट (व्होट केलेल्यांपैकी) भाजपाला मिळाली पकडले तर १८०० कोटी लोकांनी वोट केले असे होते. ६०% लोकांनी वोट केले ( एकुण व्होटरपैकी) तर २४०० कोटी लोक होतात भारतात. २/४ कोटी लोक इकडे तिकडे. हेच २/४ कोटी जमवायचे.

पूर्वी सरकारमधील घोटाळ्याच्या रकम एकूण चक्कर यायची आता बँकेतील आणि इतर गैरव्हाराच्या आकडे एकूण घेरी येते. पैसे कमविण्यासाठी चा हा नवा मार्ग असावा का?

पूर्वी सरकारमधील घोटाळ्याच्या रकम एकूण चक्कर यायची >>>>>>> राजा सुटला तेव्हा कळले की उगाचच चक्कर आणवली. आता मोदी आणी कप्मनीचे घोटाळे पाहुन हार्ट ऐटैक येतो का काय असे वाटते.

Pages