आयुष्य जगताना !!!

Submitted by प्रकाश साळवी on 16 February, 2018 - 03:18

TITLE: आयुष्य जगताना...!!
--------------------------------------------------------------------------------
आयुष्य जगताना !!!
---------------
आयुष्याचे चढ उतार पाहिले मी
जीवनाचे श्वास ऊश्वास पाहिले मी
**
जगताना दू:खाचे डोंगर पाहिले मी
आनंदाचे महा सागर पाहिले मी
**
शिषिरातिल पानगळ पाहिली मी
वसंतातील ते बहर पाहिले मी
**
वादळाचे ते भयाण तांडव पाहिले मी
शांततेने भरलेले आभाळ पाहिले मी
**
अर्ध वस्त्रातले नग्न दारिद्र्य पाहिले मी
भरजरी देहात शृंगारलेली गर्भ श्रीमंती पाहिली मी
**
काळ्या मातीला भेगाळलेला दुष्काळ पाहिला मी
धन धान्यानी भरून पावलेला सुकाळ पाहिला मी
**
झऱ्यांचे वाहते ओहोळ पाहिले मी
नद्यांचे सागराशी मिलन पाहिले मी
**
निर्जन ओसाड वाळवंट पाहिले मी
विविध तरूंचे विषाल कानन पाहिले मी
**
आयुष्य मोजताना विविध रंग पाहिले मी
आयुष्य सोडताना किती किती पहायचे मी ?
**
दगडा धोंड्यामधिल देव पाहिला मी
स्वकर्तुत्वावर जागणारे " नास्तिक " पाहिले मी
**
आयुष्य जगताना भरून पावलो मी
हे आयुष्य जगताना कृतार्थ जाहलो मी
**
प्रकाश साळवी
०५-०३-२०१७

Group content visibility: 
Use group defaults