संघ आणि लष्कर

Submitted by अँड. हरिदास on 15 February, 2018 - 02:25

mohan-bhagwat.jpg

संघ आणि लष्कर

वेळ पडल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय लष्करापेक्षा कमी दिवसांत सैन्य उभारेल या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. सरसंघचालकांनी लष्कराच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे विधान करून भारतीय सैन्याचा अवमान केल्याची टीका करत मोहन भागवत यांनी सैन्यदल व शहिदांची माफी मागावी, अशी मागणी विरोधकांनी केली, तर भागवत यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा खुलासा संघाकडून करण्यात आला. वास्तविक, एकादी संघटना देशाच्या सरंक्षणासाठी तप्तरता दाखवून वेळ पडल्यास सीमेवर लढण्यासाठी जाण्यास तयार असल्याचे वक्तव्य जर त्या संघटनेचा प्रमुख करत असेल, तर देशप्रेमाच्या मुद्दयांवर याला काही फारसे वावगे म्हणण्याचे कारण नाही. अर्थात, आपलं देशप्रेम व्यक्त करत असताना इतरांच्या भावनांना ठेच पोहचणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे असते. मात्र सध्या वादग्रस्त वक्तव्य करण्याचं उधाण आलं असून देशातील प्रमुख आणि अत्यंत जबाबदार व्यक्तींच्या मुखातून नाहकचा
वाद आणि गोंधळ निर्माण करणारे शब्द बाहेर पडत आहे. मुजफ्फरपूर मध्ये सरसंघचालकांनी मांडलेलं मतही याच श्रेणीतलं म्हणावे लागेल. काश्मीर खोऱ्यात भारतीय जवान दहशतवाद्यांशी जिकीरीचा लढा देत असताना त्यांच्याशी एकाद्या संघटनेच्या कार्यकर्त्यांची किंव्हा स्वयंसेवकांची तुलना करणे. किंबहुना, आपल्या संघटनेची तयारी लष्करापेक्षा चांगली आहे, अशा आशयाचे वक्तव्य करणे म्हणूनच अनेकांच्या पचनी पडलेलं नाही. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्पष्टीकरण येऊनही या मुद्द्यावरील वाद संपलेला नाही.

रविवारी बिहार मधील मुझफ्फरपुर येथील एका कार्यक्रमात संघाच्या शिस्तीबद्दल बोलत असताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'सैनिकांना देशसेवेसाठी तयार करण्यास 6 ते 7 महिने लागतात. देशाला गरज पडली आणि संविधान परवानगी देत असेल तर 3 दिवसांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसवेक सज्ज असतील. असे ते ओघात म्हणा कि मुद्दामहुन म्हणा, बोलून गेले. ज्या संघटनेला देशातील सत्ताधारी पक्षाचे रिमोट कंट्रोल समजल्या जाते, त्या संघटनेचा प्रमुख जर लष्कराबाबत असं वक्तव्य करत असेल तर त्याची दखल घेतली जाणे, त्यावर विवाद होणे साहजिकच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक संघटना आहे. ती कितीही शिस्तबद्ध असली, तिचा कारभार अगदी आर्मी हेडकॉर्टर सारखा चालत असला, तरी ते काही सैनिक निर्मितीचे प्रशिक्षण केंद्र नाही. त्यामुळे स्वयंसेवकांची सैनिकांशी तुलना करणे थोडेसे अवास्तवाचं. यावर संघाने भागवत यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचे स्पष्टीकरण दिले. भागवत संघाची तुलना लष्कराशी करत नव्हते तर सैनिक तयार करण्यासाठी लष्कराला सहा सात महिने लागतात, पण स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिल्या गेले तर ते तीन दिवसात लढायला तयार होतील, असे भागवत यांना म्हणायचे असल्याचा खुलासा संघाने केला आहे. म्हणजे सामान्य माणसाला जर सैनिक व्हायचे असेल तर त्याला सहा ते सात महिने लागतील. आणि संघाचा स्वयंसेवक अवघ्या तीन दिवसात सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करेल. याचाच अर्थ सैन्यामध्ये आणि स्वयंसेवकांमध्ये थोडासाच फरक आहे, असे संघाला म्हणायचे आहे का? कि हि बाब देशाच्या निदर्शनास आणून द्यायची आहे?

राष्ट्र संकटात असेल तर त्याच्या संरक्षणार्थ समोर येणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. पण त्यासाठी लष्कर उभारण्याची परवानगी या देशाचे संविधान कुणालाही देत नाही. त्यामुळे 'घटनात्मक कायदा आणून परवानगी मिळाली तर संघ स्वयंसेवक देशाचे रक्षण करतील, या वाक्याला काही अर्थ उरत नाही. मुळात अंलबजावणीच्या पातळीववर सरसंघचालकांचे विधान म्हणजे अतिशयोक्ती अलंकार आहे. ऐक तर देशाचे संविधान असं काही करायला परवानगी देत नाही, दुसरं म्हणजे आजच्या आधुनिक काळात सीमेवर शत्रूशी दोन हात करण्यासाठी केवळ शिस्त आणि परंपरागत अस्त्र (काठी वैगरे) चालविण्याचं प्रशिक्षण पुरेसं नसतं, तर त्यासाठी आधुनिक शस्त्र चालविण्याचं ज्ञान आणि युद्धकला अवगत असावी लागते. आणि हे प्रशिक्षण तीन दिवसात आत्मसात करणे सहज शक्य वाटत नाही. त्यामुळे सरसंघचालकांचे वक्तव्य कोणत्याच पातळीवर प्रत्यक्षात येणे श्यक्य नाही. अर्थात याची जाण सरसंघचालकांनाही असावी. तरीही असलं अवाजवी विधान करून मोहन भागवत यांनी गोंधळ निर्माण केला आहे. यामागचा त्यांचा हेतू काय ? याचा शोध घेतला गेला पाहिजे. कुठल्याही परिणामांची तमा न बाळगता भारताचे शूर सैनिक सीमांचे रक्षण करत आहेत, दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी छातीवर गोळ्या झेलण्यासही ते मागे पुढे पाहत नाही. त्यामुळे सैनिकांच्या शौर्याबाबत शंका घेणे, किंव्हा त्यांच्या मनोबलाला ठेच पोहचेल असं वक्तव्य कोणत्याच नेत्याकडून करणे अपेक्षित नाही. आज देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. संघ हि भाजपाची मातृसंस्था असल्याने सरसंघचालकांचा प्रत्येक शब्द सरकारसाठी प्रमाण ठरू शकतो. सध्या दहशतवादी हल्ल्यांमुळे काश्मीर खोरे धगधगते आहे. या हल्ल्याना पाकिस्तानची फूस असल्याचे सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत सरकारला ठोस भूमिका घेण्यासाठी मार्गदर्शन करणे भागवत यांच्याकडून अपेक्षित असताना सैन्यदलाबाबत वादग्रस्त वक्तव्य करून त्यांना काय साध्य करायचे आहे. किमान देश संरक्षणाच्या मुद्द्यावर तरी पक्ष संघटनांनी राजकारण न करता, आपसातील मतभेद विसरून सैन्याच्या पाठीशी उभे राहायला हवे. मात्र इथे एमआयमचे ओवेसी जवानांच्या बलिदानाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करतात, तर सरसंघचालक अवाजवी विधान करून गोंधळ निर्माण करत आहे. त्यामुळे देश बिकट परिस्थितीचा सामना करत असताना असा नाहकचा वाद निर्माण करणे गरजेचे आहे का?, याचे आत्मचिंतन या नेत्यांनी करण्याची गरज आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंदिरा गांधींबद्द्ल एकेरी उल्लेख केलेली लोक मोदींवर टिका केली की चिडुन अंगावर येतात - पंतप्रधानांवर टिका कसे करता म्हणुन!

सही मुलाखत आहे. भारी एकदम. राजीव, मनमोहन यांना पण कदाचित असा स्ट्रॉंग स्टँड घेऊन बोलता आलं असतं का कोण जाणे.

पण त्यांनी मिठ्या तरी नक्की मारलेल्या नाहित आणी बिर्याणी खायला आणी केक कापायला हि गेले नाहित

अहो, त्या ह्यांना इंटरव्ह्यू म्हणजे काय माहीत आहे का? ते असेच सरकारी खर्चाने केक कापायला जातात.

असो, तर संघ धागा. सगळ्यांनी आर एस एस मधे सामील व्हा का असे काहीतरी म्हटलेत ना ते? चला मग, उत्तीष्ट.

आग्रहच असेल तर इंदिरा गांधींचा अनेकवचनी उल्लेख करतो. पण हा आदरापोटी नाही. केवळ मारून मुटकुन. ज्या बाईंनी लोकशाहीचा गळा घोटायचा प्रयत्न केला. नालायक मुलाला नको इतक्या महत्त्व दिले. देशप्रेमी समजले जाणारे शीख लोक त्यांना फूस देऊन देश तोडण्याची प्रेरणा दिली. ह्या व्यक्तीला मी आदरणीय मानत नाही.

माझे ट्रंपबद्दलचे विचार आणि इंदिराबाईंबद्दलचे विचार ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. त्या त्या धाग्यांवर त्या त्या विषयावर चर्चा करावी. सरमिसळ करुन काही उपयोग नाही.

निव्व्वळ व्यक्तिगत हल्ले, कुणाच्या कुठल्या नातेवाईकांचे इंदिराबाईंचे नाव ऐकले की डोळे पाणावतात की चमकतात की पाझरतात की कान टवकारतात की नाक फेंदारते ह्याला चर्चेच्या दृष्टीने काही अर्थ नाही. माझ्या मुद्द्यांना कुणी उत्तर दिलेले नाही. त्यामुळे माझा मुद्दा सिध्द केल्याबद्दल आभार.

उरलेले पूर्ण जग पूर्व पाकिस्तानच्या बाजूने होते आणि तरी इंदिराबाईंनी धडाडीने काम केले हा दावा पूर्ण खोटा आणि बिनबुडाचा आहे. बहुतेक जगाला पूर्व पाकिस्तान, भारत आणि पाकिस्तानशी काहीही देणे घेणे नव्हते. अमेरिकेत राजकीय दबाव होता त्यामुळे इच्छा असूनही त्यांना फार काही करता येत नव्हते. आणि मुख्य पूर्व पाकिस्तानचे लोक पश्चिम पाकिस्तानच्या दडपशाहीला कंटाळले होते आणि त्यांना भारताने आपली सुटका करावी असे वाटत होते. आणि ते इंदिराबाईंनी केले. पण परिस्थिती त्यांच्या बाजूची होती हेही तितकेच खरे. असो. मी आता थांबतो.

शेण
नथुरामींनी पात्रता बघून बोलावे उगाच सुर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये. तुर्तास इतकेच सांगतो

ह्या व्यक्तीला मी आदरणीय मानत नाही.>>>
तुमचे आदर्श जर नथु सारखे अतिरेकी देशद्रोही समाजविघातक लोक असतील तर इंदिरांसारखे देशभक्तांबद्दल आदर कसा येईल.. तुम्ही माफीवीरांनांच पुजा

शेंड्यांची मानसिकता विखारी द्वेषमूलक आहे, द्वेषाचे संस्कार देणाऱ्या फॅक्ट्रीत बनलेले उत्पादन दिसते!

उरलेले पूर्ण जग पूर्व पाकिस्तानच्या बाजूने होते आणि तरी इंदिराबाईंनी धडाडीने काम केले हा दावा पूर्ण खोटा आणि बिनबुडाचा आहे >>>>>>>>. नवी खोटा इतिहास निर्माण करण्याचा जोरदार प्रयत्न चालु आहे. काहि दिवस यश येइलही, पण खोटे जास्त टिकत नाहि. दुर्देव आहे की तुमच्या सारख्या लोकांमुळे साठ वर्ष टिकलेली लोकशाहि धुळीला मिळत आहे

नवी खोटा इतिहास निर्माण करण्याचा जोरदार प्रयत्न चालु आहे. काहि दिवस यश येइलही, पण खोटे जास्त टिकत नाहि. दुर्देव आहे की तुमच्या सारख्या लोकांमुळे साठ वर्ष टिकलेली लोकशाहि धुळीला मिळत आहे.

<<

अगदी सहमत !
हिंदुस्थानला स्वातंत्र्य फक्त 'बिना खडग, बिना ढाल'वाल्यांमुळेच मिळाले, बाकिचे सर्व सशस्त्र क्रांतीकारक हे आतंकवादी होते, हे गेली सत्तर वर्षे खरा इतिहास सांगणार्‍या सव्वासो साल पुरान्या पार्टीचे बिंग आता हळू हळू फुटत चालले आहे व त्या पार्टीचे अस्तित्वच आता धूळीस मिळत आहे.

आपली शाळेतील पुस्तके वाचुन पहा. भगतसिंग, राजगुरु, आझाद यांच्यावर धडेच्या धडे आहेत. इंग्रजाना मुजरे घालुन ज्या संघाने देशद्रोह केला त्यांना आता ग्लोरिफाय करणे चालु आहे मोदी आणी संघी देशदोर्ह्यांचे.

दुर्देव आहे की तुमच्या सारख्या लोकांमुळे साठ वर्ष टिकलेली लोकशाहि धुळीला मिळत आहे
Submitted by राहुलका on 4 March, 2018 - 09:58

---
लोकशाही म्हणजेच तीच ना, जीच्यावर स्वत:च्या राजकिय फायद्यासाठी व सत्ताहव्यासापोटी आणिबाणी लादून जीचा गळा घोटला होता तीच ती लोकशाही ना. किंव्हा "एक पेड गिरता है तो धरती थोडीसी हिलती है' असे म्हणत लाखो निरपराध शीखांची कत्तल दिवसाढवळ्या ज्या पार्टीने केली तीलाच लोकशाही असे म्हणतात का ?

लोकशाही म्हणजेच तीच ना, जीच्यावर स्वत:च्या राजकिय फायद्यासाठी व सत्ताहव्यासापोटी आणिबाणी लादून जीचा गळा घोटला होता तीच ती लोकशाही ना >>>> एवढे सगळे असुन एक भक्त बीएआरसी वर लेख लिहितो जे गेल्या ६० वर्षात फक्त प्रगतीच करत आहे. तेव्हा कोणी लोकशाहि टिकवली आणी कोण लोकशाहि संपवते आहे ते स्पष्ट दिसतेच आहे.
लोया सारख्या जज्ज ना ज्या पध्धतीने मारले ती ठोकशाहि. ती फक्त संघीना जमते

Hitler hated communism because it was a system which emphasized class struggle over caste, religious and racial struggle - आज इशान्येकडील कम्युनिस्ट सत्ता भाजपाकदे जाणे हे सर्वाथाने फैसिझम फास्ट फोरवर्ड झाल्याची खुण आहे.

स्वातंत्र्य फक्त स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मारलेल्या उडीतून व शिक्षेला घाबरून लिहीलेल्या माफिनाम्यातून मिळाले नाही..

त्यासाठी पुज्यनिय गांधीजी व त्यांच्या सहकार्यांनी व स्वातंत्र्यवीर शहीद भगत सिंग सारख्या लाखो क्रांतीकारकांनी ब्रिटीशांविरूध्द लढा दिलेला होता.

Pages