संघ आणि लष्कर

Submitted by अँड. हरिदास on 15 February, 2018 - 02:25

mohan-bhagwat.jpg

संघ आणि लष्कर

वेळ पडल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय लष्करापेक्षा कमी दिवसांत सैन्य उभारेल या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. सरसंघचालकांनी लष्कराच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे विधान करून भारतीय सैन्याचा अवमान केल्याची टीका करत मोहन भागवत यांनी सैन्यदल व शहिदांची माफी मागावी, अशी मागणी विरोधकांनी केली, तर भागवत यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा खुलासा संघाकडून करण्यात आला. वास्तविक, एकादी संघटना देशाच्या सरंक्षणासाठी तप्तरता दाखवून वेळ पडल्यास सीमेवर लढण्यासाठी जाण्यास तयार असल्याचे वक्तव्य जर त्या संघटनेचा प्रमुख करत असेल, तर देशप्रेमाच्या मुद्दयांवर याला काही फारसे वावगे म्हणण्याचे कारण नाही. अर्थात, आपलं देशप्रेम व्यक्त करत असताना इतरांच्या भावनांना ठेच पोहचणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे असते. मात्र सध्या वादग्रस्त वक्तव्य करण्याचं उधाण आलं असून देशातील प्रमुख आणि अत्यंत जबाबदार व्यक्तींच्या मुखातून नाहकचा
वाद आणि गोंधळ निर्माण करणारे शब्द बाहेर पडत आहे. मुजफ्फरपूर मध्ये सरसंघचालकांनी मांडलेलं मतही याच श्रेणीतलं म्हणावे लागेल. काश्मीर खोऱ्यात भारतीय जवान दहशतवाद्यांशी जिकीरीचा लढा देत असताना त्यांच्याशी एकाद्या संघटनेच्या कार्यकर्त्यांची किंव्हा स्वयंसेवकांची तुलना करणे. किंबहुना, आपल्या संघटनेची तयारी लष्करापेक्षा चांगली आहे, अशा आशयाचे वक्तव्य करणे म्हणूनच अनेकांच्या पचनी पडलेलं नाही. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्पष्टीकरण येऊनही या मुद्द्यावरील वाद संपलेला नाही.

रविवारी बिहार मधील मुझफ्फरपुर येथील एका कार्यक्रमात संघाच्या शिस्तीबद्दल बोलत असताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'सैनिकांना देशसेवेसाठी तयार करण्यास 6 ते 7 महिने लागतात. देशाला गरज पडली आणि संविधान परवानगी देत असेल तर 3 दिवसांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसवेक सज्ज असतील. असे ते ओघात म्हणा कि मुद्दामहुन म्हणा, बोलून गेले. ज्या संघटनेला देशातील सत्ताधारी पक्षाचे रिमोट कंट्रोल समजल्या जाते, त्या संघटनेचा प्रमुख जर लष्कराबाबत असं वक्तव्य करत असेल तर त्याची दखल घेतली जाणे, त्यावर विवाद होणे साहजिकच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक संघटना आहे. ती कितीही शिस्तबद्ध असली, तिचा कारभार अगदी आर्मी हेडकॉर्टर सारखा चालत असला, तरी ते काही सैनिक निर्मितीचे प्रशिक्षण केंद्र नाही. त्यामुळे स्वयंसेवकांची सैनिकांशी तुलना करणे थोडेसे अवास्तवाचं. यावर संघाने भागवत यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचे स्पष्टीकरण दिले. भागवत संघाची तुलना लष्कराशी करत नव्हते तर सैनिक तयार करण्यासाठी लष्कराला सहा सात महिने लागतात, पण स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिल्या गेले तर ते तीन दिवसात लढायला तयार होतील, असे भागवत यांना म्हणायचे असल्याचा खुलासा संघाने केला आहे. म्हणजे सामान्य माणसाला जर सैनिक व्हायचे असेल तर त्याला सहा ते सात महिने लागतील. आणि संघाचा स्वयंसेवक अवघ्या तीन दिवसात सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करेल. याचाच अर्थ सैन्यामध्ये आणि स्वयंसेवकांमध्ये थोडासाच फरक आहे, असे संघाला म्हणायचे आहे का? कि हि बाब देशाच्या निदर्शनास आणून द्यायची आहे?

राष्ट्र संकटात असेल तर त्याच्या संरक्षणार्थ समोर येणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. पण त्यासाठी लष्कर उभारण्याची परवानगी या देशाचे संविधान कुणालाही देत नाही. त्यामुळे 'घटनात्मक कायदा आणून परवानगी मिळाली तर संघ स्वयंसेवक देशाचे रक्षण करतील, या वाक्याला काही अर्थ उरत नाही. मुळात अंलबजावणीच्या पातळीववर सरसंघचालकांचे विधान म्हणजे अतिशयोक्ती अलंकार आहे. ऐक तर देशाचे संविधान असं काही करायला परवानगी देत नाही, दुसरं म्हणजे आजच्या आधुनिक काळात सीमेवर शत्रूशी दोन हात करण्यासाठी केवळ शिस्त आणि परंपरागत अस्त्र (काठी वैगरे) चालविण्याचं प्रशिक्षण पुरेसं नसतं, तर त्यासाठी आधुनिक शस्त्र चालविण्याचं ज्ञान आणि युद्धकला अवगत असावी लागते. आणि हे प्रशिक्षण तीन दिवसात आत्मसात करणे सहज शक्य वाटत नाही. त्यामुळे सरसंघचालकांचे वक्तव्य कोणत्याच पातळीवर प्रत्यक्षात येणे श्यक्य नाही. अर्थात याची जाण सरसंघचालकांनाही असावी. तरीही असलं अवाजवी विधान करून मोहन भागवत यांनी गोंधळ निर्माण केला आहे. यामागचा त्यांचा हेतू काय ? याचा शोध घेतला गेला पाहिजे. कुठल्याही परिणामांची तमा न बाळगता भारताचे शूर सैनिक सीमांचे रक्षण करत आहेत, दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी छातीवर गोळ्या झेलण्यासही ते मागे पुढे पाहत नाही. त्यामुळे सैनिकांच्या शौर्याबाबत शंका घेणे, किंव्हा त्यांच्या मनोबलाला ठेच पोहचेल असं वक्तव्य कोणत्याच नेत्याकडून करणे अपेक्षित नाही. आज देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. संघ हि भाजपाची मातृसंस्था असल्याने सरसंघचालकांचा प्रत्येक शब्द सरकारसाठी प्रमाण ठरू शकतो. सध्या दहशतवादी हल्ल्यांमुळे काश्मीर खोरे धगधगते आहे. या हल्ल्याना पाकिस्तानची फूस असल्याचे सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत सरकारला ठोस भूमिका घेण्यासाठी मार्गदर्शन करणे भागवत यांच्याकडून अपेक्षित असताना सैन्यदलाबाबत वादग्रस्त वक्तव्य करून त्यांना काय साध्य करायचे आहे. किमान देश संरक्षणाच्या मुद्द्यावर तरी पक्ष संघटनांनी राजकारण न करता, आपसातील मतभेद विसरून सैन्याच्या पाठीशी उभे राहायला हवे. मात्र इथे एमआयमचे ओवेसी जवानांच्या बलिदानाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करतात, तर सरसंघचालक अवाजवी विधान करून गोंधळ निर्माण करत आहे. त्यामुळे देश बिकट परिस्थितीचा सामना करत असताना असा नाहकचा वाद निर्माण करणे गरजेचे आहे का?, याचे आत्मचिंतन या नेत्यांनी करण्याची गरज आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो काँग्रेसनेच पाकिस्तानचे दोन तुकडे केले. बांग्लादेश मुक्ति विसरला असालच.>>> यावर Shendenaxatra यांचा सविस्तर प्रतिसाद छान आहे, त्याला +१११.
विषय आलाच आहे म्हणून अवांतर, पंडितजी, इंदिराजी अथवा राजीवजींच्या चांगल्या कार्याला नाकारता येणारच नाही. भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील एकमेव 'आयर्न लेडी' चा अभिमानच आहे. पण त्यांचे सर्वच निर्णय १००% बरोबर होते व त्याच पुण्याईवर अजूनही काँग्रेसकडे बघा असा साधारण युक्तीवाद दिसतो. सध्या तरी असंच वाटतंय की भक्त सगळीकडेच आहेत फक्त देव बदलतायेत. Happy

अजब

तुम्हाला आज पकोडेवाले शहा काय म्हणाला माहीती का? कर्नाटकात कार्यकर्त्यांना म्हणाला की उमेदवाराला विसरा मोदीकडे बघून मतदान करायला सांगा..

आता जर काही तुघलकी व वांझोटे निर्णयाच्या फुशारक्यांवर उडणार्या मोदीला बघून जर मतदान करायला आवाहन केले जात असेल त्याच्या 2014च्षा पुण्याईवर अजून भाजणे चालू आहे तर काँग्रेस नेत्यांने मोदीपेक्षा करोडोपटींनी कामे केली आहे मग तुम्हाला काय प्रोब्लेम आहे?

तुम्हाला आज पकोडेवाले शहा काय म्हणाला माहीती का? कर्नाटकात कार्यकर्त्यांना म्हणाला की उमेदवाराला विसरा मोदीकडे बघून मतदान करायला सांगा..>>> तोच तर प्रकार त्यांनी २०१४ मधे केला होता. नुस्ती एका माणसाच्या नावाची लाट आणली होती व त्यामुळे अक्षरशः लोकांनीकधीही नावही न ऐकलेल्या उमेदवाराला फक्त तो मोदींच्या पार्टीकडून आहे अथवा अपक्ष असला तरी 'बाहेरून' मोदींना पाठींबा देतोय एवढेच पाहून निवडून दिले होते. आता जर लोक शहाणे झाले असतील तर यातील चांगलं वाईट ठरवतीलच की! कोणाच्या म्हणण्याने काय फरक पडतो?
<<मग तुम्हाला काय प्रोब्लेम आहे?>> काही नाही. चालू द्या. Happy

नाही ते शेंडेना अनुमोदन दिले. म्हणून विचारले त्यांच्या मते तर इंदीरांनी काहीच विशेष केले नाही.. त्यांचा ट्र्ंप वेड्यासारखे काही बडबडला की लय भारी केल्यासारखे त्यांना वाटते Wink
कर्तृत्वशुन्य आणि नुसतेच झगामगा मला बघा टाईप असते Wink

शेण्डे - या विषयावर मधे बरेच वाचले, पाहिले आहे. एक दोन पुस्तके, निक्सन च्या वेळच्या मधे पब्लिश झालेल्या टेप्स, निक्सन, किसिंजर, याह्याखान यातल्या चर्चा, अमेरिकेचे रशियाला शह देण्याकरता चीन शी मैत्री, ती करायला पाक मदत करणार म्हणून भारताची बाजू न्याय्य असताना पाक ची बाजू घेणे - हे सगळे मधे खूप वाचले/ऐकले आहे. हे बघितलेत तर तुमचे मत बदलेल. इतर बाकी नाही, तरी "The Blood Telegram" ची अमेरिकन व्हर्जन वाचा. ते ज्याने लिहीले आहे त्याला भारतातील राजकारणाशी काही मतलब नसल्याने तो बायसही यात नाही.

इंदिरा गांधी व त्यावेळचे लष्करी सेनानी वगैरे लोकांनी जे घडवून आणले ते प्रचंड आव्हानात्मक परिस्थितीत व महासत्तांचा विरोध पत्करून होते. अमेरिका तर विरोधात होतीच, पण रशिया सुद्धा फार काही मदत करत होती असे नाही.

इंदिरा गांधी व त्यावेळचे लष्करी सेनानी वगैरे लोकांनी जे घडवून आणले ते प्रचंड आव्हानात्मक परिस्थितीत व महासत्तांचा विरोध पत्करून होते. अमेरिका तर विरोधात होतीच, पण रशिया सुद्धा फार काही मदत करत होती असे नाही. >> यालाच ते १०% समजत आहेत Happy शिवाय त्यावेळी ३च दिवसात लष्कराला संघानं मदत केली असेलच, त्यामुळं इंदिरा गांधींचं त्या युध्दातलं कर्तुत्व अजूनच कमी होइल Wink

इंदिरा गांधींनी सरसंघचालकांच्या सल्ल्यानुसारच ती लष्करी कारवाई केली, नाहीतर काँग्रेस नेत्यांत कुठे इतकी दूरदृष्टी आणि पांडित्य?

>>इंदिरा गांधींनी सरसंघचालकांच्या सल्ल्यानुसारच ती लष्करी कारवाई केली

खरा इतिहास लोकांपर्यंत पोचुच दिला नाही या खांग्रेसींनी गेली ७० वर्ष. पण प्रधानमंत्री " Happy " सत्तेत आल्यावर थोडा फरक पडतोय पण पुढची ३० वर्षे सत्ता हवी खरा इतिहास जनामनावर ठसवायला.

इंदिरा गांधी या लहानपणी शाखेत जात असत, त्यामुळेच त्या हे साहस दाखवु शकल्या. नाहीतर नेहरुंची कन्या असं काही करु शकली असती का?

वाजपेयी त्यांना दुर्गेचा अवतार म्हणाले ते उगीच नाही,
इंदिराच्या लहानपणीच्या " दुर्गा वाहिनी" कनेक्शन चा तो प्रत्यक्ष उल्लेख होता.

नेहरु स्वतः मुसलमान होते. त्यांनी त्यांच्या मुलीचे लग्न फिरोझ नावाच्या मुसलमानाबरोबर करुन दिले. त्याने लोकांच्या डोळ्यात धुळ फेकण्यासाठी गांधी नाव घेतले. तर ही मुसलमान इंदिरा पाकिस्तान विरुद्ध पाउल उचलायला तयारच नव्हती. सरसंघचालकांनी त्यांच्या शिस्तप्रिय स्वयंसेवकांच्या जोरावर बांगलादेशचे मुक्तियुद्ध जिंकले.
Happy पंतप्रधान लवकरच खरा इतिहास जनतेसमोर आणतील.

कारगिल/डोकलाम येथे देखिल भारतीय सैन्याचा वेश घालुन स्वयंसेवक गेले होते.

या स्वयंसेवकांबाबत एक प्रश्न नेहमी पडतो - चेन्नईलाच पाऊस पडला की हे नेमके कसे पोचतात?? मुंबईत हाहाकार उडतो तेव्हा हे नक्की कुठल्या बिळात असतांत?

इंदिरा गांधींनी सरसंघचालकांच्या सल्ल्यानुसारच ती लष्करी कारवाई केली, नाहीतर काँग्रेस नेत्यांत कुठे इतकी दूरदृष्टी आणि पांडित्य?

वावा आता आता कोठे लोक खरं बोलू लागले 2014 पर्यंत भाटगिरी चालू होती

आम्हि उमेदवार कसेही देउ - करप्ट, दगेखोर, मर्डर केलेले, रेपिस्ट. तुम्हि फक्त मोदीच्या नावावर निवडुन द्या.
भक्त - वा अमित शाह , काय मास्टर स्टोक आहे!

दयनीय अवस्था आहे भक्तांची!

>>
तरी "The Blood Telegram" ची अमेरिकन व्हर्जन वाचा. ते ज्याने लिहीले आहे त्याला भारतातील राजकारणाशी काही मतलब नसल्याने तो बायसही यात नाही.

इंदिरा गांधी व त्यावेळचे लष्करी सेनानी वगैरे लोकांनी जे घडवून आणले ते प्रचंड आव्हानात्मक परिस्थितीत व महासत्तांचा विरोध पत्करून होते. अमेरिका तर विरोधात होतीच, पण रशिया सुद्धा फार काही मदत करत होती असे नाही.
<<
इंदिरा गांधीला परिस्थितीचा चांगलाच फायदा झाला. तुम्ही सांगितलेले पुस्तक वाचायचा प्रयत्न करीनच. पण हे मुद्दे दुर्लक्षिण्यासारखे नाहीत,
१. पश्चिम आणि पूर्व पाकिस्तान ही सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत वेगळे आहेत आणि होते. निव्वळ इस्लाम हा धागा त्यांना जोडायला पुरेसा नव्हता. त्यामुळे पूर्व पाकिस्तानात असंतोष होता आणि तो चिरडण्याकरता पश्चिम पाकिस्तानातील लष्कराने अनेक अत्याचार केले. त्यामुळे बांगलादेश वेगळा करण्याकरता फार प्रयत्न लागले नाहीत. आग पेटलेली होतीच त्यात आणखी पेट्रोल ओतून ती भडकवली.

२. नुकतेच व्हिएटनाम युद्धात नाक कापले गेल्यामुळे पुन्हा एक नवे युद्ध करण्याकरता अमेरिकेत उत्साह नव्हता. लोकांचा आधार नव्हता. हाही एक महत्त्वाचा घटक इथे आहे. त्यामुळे अमेरिका काहीशी तटस्थ राहिली.

हे दोन्ही घटक हे इंदिरा गांधीच्या कर्तृत्त्वामुळे नाही तर परिस्थितीमुळे उद्भवलेले होते. आणि त्याचा बाईंनी फायदा करुन घेतला.

(अर्थात ह्याचा अर्थ बाई ज्याला हात लावत त्याचे सोने करत असा नाही. नंतर आणीबाणी, खालिस्तानवादी अतिरेकी, आसाममधील बांगलादेशी घुसखोर ह्या सगळ्या डोकेदुखीला बाईंची धोरणेच जबाबदार आहेत. )

१९७१ च्या बांगलादेश युद्धानंतर एक संतापजनक गोष्ट घडली ती म्हणजे भारतीय सैन्याने जे पाकिस्तानी सैनिक, उच्च अधिकारी पकडले त्यांना कुठलीही कारवाई न करता सोडून दिले. वास्तविक ह्या सैन्याने बांगला देशी लोकांविरुद्ध खून, बलात्कार, अत्याचार अशी मानवतेला काळिमा फासणारी कृत्ये केली होती ज्यात लाखो लोक बळी पडले होते. पण ह्याचे कुठलेही उत्तरदायित्व न देता त्यांना सोडून दिले. ह्यातले काही अधिकारी इंग्रजांच्या काळात एकाच सैन्यात होते त्यामुळे त्यांना त्याचेच कौतुक. बांगला देशातील लोकांना हे शल्य आजही बोचते. इंदिरा बाईंनी इथेही काही हस्तक्षेप करुन दोषी लोकांना पुरेशी शिक्षा देण्याचा आग्रह धरला नव्हता.

आदर मोड फक्त Happy साठी ऑन होतो.

आम्ही फार मोठे ज्ञानी, अन काँग्रेसच्या डार्क एजेस दरम्यान देशाला कसेबसे वाचवून धरणारे तारणहार असा आव आणत लिहिणे, ही छुप्या अन उघड संघोट्याची हॉलमार्क लक्षणे आहेत.

तेव्हा भ्राता भरत, तुम्ही शांत रहा.

ट्रम्प सारख्या शेखच्ल्लीचे समर्थक युध्दात इंदीरा गांधींनी काय काय करायला हवे हे अमेरिकेत बसून सांगत आहे..

सक्काळी सक्काळी करमणूक Rofl

१९७१ च्या युद्धाचा मागोवा आर एन काऊ यांच्या "काऊ बाउज इन इंडिया " या पुस्तकात उत्तम रीतीने घेतला आहे . इंदिरा गांधींपुढे किती दबाव होते , त्या दबावाला कश्या प्रकारे सामोऱ्या गेल्या , रॉ ची निर्मिती ते रॉ चा बांगला देश युद्धातील वापर यावर चांगला प्रकाश टाकला आहे. अमेरिकेचा दबाव असताना तुलनेने परक्या भूमीवर प्रवेश करून तिथल्या नागरिकांचा विश्वास संपादन करून जय मिळवणं, त्याच बरोबर देशांतर्गत परिस्थितीला तोंड देणं किती कठीण होतं त्याचा प्रत्यय पुस्तक वाचून येतं . शी इज ट्रु आर्यन लेडी .

इंदिरा गांधीला परिस्थितीचा चांगलाच फायदा झाला. तुम्ही सांगितलेले पुस्तक वाचायचा प्रयत्न करीनच. पण हे मुद्दे दुर्लक्षिण्यासारखे नाहीत,

>> इंदिरा गांधीं बद्दल बरच काही वडिलाकडून अन त्याही पेक्षा आजीकडून ऐकलय . तिचे डोळे चमकायचे त्यांच्याबद्द्ल बोलताना . प्रचंड आदर होता तिला त्यांच्याबद्द्ल. अन दोघांचा ही काँग्रेसशी काही संबंध नाही , आजकाल सांगाव लागत Sad
कशाही असल्या तरी एकेरी उल्लेख करण्यासारख्या तरी नक्की नव्हत्या अस वाटत .
तुम्हाला अस का वाटत असेल हे जाणून घ्यायला आवडेल

२ कि मी सिमा पार करुन, सर्जिकल स्ट्राईक केले म्हणुन मोदी सरकार कौतुकास पात्र, प्रचन्ड धाडसी ठरत असतील तर सम्पुर्ण जगाचा विरोध पत्करुन, १९७१ साली बान्ग्ला देशाला पाकपासुन स्वातन्त्र्य करणार्‍या इन्दिरा गान्धी यान्च्या धाडसाचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत.

त्यान्ची एक छोटी मुलाखत बघितली, प्रत्येक शब्दात आत्मविश्वास जाणवतो.
https://www.youtube.com/watch?v=pRMblVII-sY

त्यान्चे कर्तुत्व % मधे कसे मोजणार? इन्दिरा गान्धी यान्नी धाडस दाखवले नसते तर बान्ग्ला देश निर्माण झाला नसता.

२ कि मी सिमा पार करुन, सर्जिकल स्ट्राईक केले म्हणुन मोदी सरकार कौतुकास पात्र, प्रचन्ड धाडसी ठरत असतील तर सम्पुर्ण जगाचा विरोध पत्करुन, १९७१ साली बान्ग्ला देशाला पाकपासुन स्वातन्त्र्य करणार्‍या इन्दिरा गान्धी यान्च्या धाडसाचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. >> How anti-national you are Uday.. you should be sent to Pakistan.. सर्जिकल स्ट्राइकमागं राष्ट्रवाद होता.. Wink

Pages