संघ आणि लष्कर

Submitted by अँड. हरिदास on 15 February, 2018 - 02:25

mohan-bhagwat.jpg

संघ आणि लष्कर

वेळ पडल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय लष्करापेक्षा कमी दिवसांत सैन्य उभारेल या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. सरसंघचालकांनी लष्कराच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे विधान करून भारतीय सैन्याचा अवमान केल्याची टीका करत मोहन भागवत यांनी सैन्यदल व शहिदांची माफी मागावी, अशी मागणी विरोधकांनी केली, तर भागवत यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा खुलासा संघाकडून करण्यात आला. वास्तविक, एकादी संघटना देशाच्या सरंक्षणासाठी तप्तरता दाखवून वेळ पडल्यास सीमेवर लढण्यासाठी जाण्यास तयार असल्याचे वक्तव्य जर त्या संघटनेचा प्रमुख करत असेल, तर देशप्रेमाच्या मुद्दयांवर याला काही फारसे वावगे म्हणण्याचे कारण नाही. अर्थात, आपलं देशप्रेम व्यक्त करत असताना इतरांच्या भावनांना ठेच पोहचणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे असते. मात्र सध्या वादग्रस्त वक्तव्य करण्याचं उधाण आलं असून देशातील प्रमुख आणि अत्यंत जबाबदार व्यक्तींच्या मुखातून नाहकचा
वाद आणि गोंधळ निर्माण करणारे शब्द बाहेर पडत आहे. मुजफ्फरपूर मध्ये सरसंघचालकांनी मांडलेलं मतही याच श्रेणीतलं म्हणावे लागेल. काश्मीर खोऱ्यात भारतीय जवान दहशतवाद्यांशी जिकीरीचा लढा देत असताना त्यांच्याशी एकाद्या संघटनेच्या कार्यकर्त्यांची किंव्हा स्वयंसेवकांची तुलना करणे. किंबहुना, आपल्या संघटनेची तयारी लष्करापेक्षा चांगली आहे, अशा आशयाचे वक्तव्य करणे म्हणूनच अनेकांच्या पचनी पडलेलं नाही. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्पष्टीकरण येऊनही या मुद्द्यावरील वाद संपलेला नाही.

रविवारी बिहार मधील मुझफ्फरपुर येथील एका कार्यक्रमात संघाच्या शिस्तीबद्दल बोलत असताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'सैनिकांना देशसेवेसाठी तयार करण्यास 6 ते 7 महिने लागतात. देशाला गरज पडली आणि संविधान परवानगी देत असेल तर 3 दिवसांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसवेक सज्ज असतील. असे ते ओघात म्हणा कि मुद्दामहुन म्हणा, बोलून गेले. ज्या संघटनेला देशातील सत्ताधारी पक्षाचे रिमोट कंट्रोल समजल्या जाते, त्या संघटनेचा प्रमुख जर लष्कराबाबत असं वक्तव्य करत असेल तर त्याची दखल घेतली जाणे, त्यावर विवाद होणे साहजिकच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक संघटना आहे. ती कितीही शिस्तबद्ध असली, तिचा कारभार अगदी आर्मी हेडकॉर्टर सारखा चालत असला, तरी ते काही सैनिक निर्मितीचे प्रशिक्षण केंद्र नाही. त्यामुळे स्वयंसेवकांची सैनिकांशी तुलना करणे थोडेसे अवास्तवाचं. यावर संघाने भागवत यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचे स्पष्टीकरण दिले. भागवत संघाची तुलना लष्कराशी करत नव्हते तर सैनिक तयार करण्यासाठी लष्कराला सहा सात महिने लागतात, पण स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिल्या गेले तर ते तीन दिवसात लढायला तयार होतील, असे भागवत यांना म्हणायचे असल्याचा खुलासा संघाने केला आहे. म्हणजे सामान्य माणसाला जर सैनिक व्हायचे असेल तर त्याला सहा ते सात महिने लागतील. आणि संघाचा स्वयंसेवक अवघ्या तीन दिवसात सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करेल. याचाच अर्थ सैन्यामध्ये आणि स्वयंसेवकांमध्ये थोडासाच फरक आहे, असे संघाला म्हणायचे आहे का? कि हि बाब देशाच्या निदर्शनास आणून द्यायची आहे?

राष्ट्र संकटात असेल तर त्याच्या संरक्षणार्थ समोर येणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. पण त्यासाठी लष्कर उभारण्याची परवानगी या देशाचे संविधान कुणालाही देत नाही. त्यामुळे 'घटनात्मक कायदा आणून परवानगी मिळाली तर संघ स्वयंसेवक देशाचे रक्षण करतील, या वाक्याला काही अर्थ उरत नाही. मुळात अंलबजावणीच्या पातळीववर सरसंघचालकांचे विधान म्हणजे अतिशयोक्ती अलंकार आहे. ऐक तर देशाचे संविधान असं काही करायला परवानगी देत नाही, दुसरं म्हणजे आजच्या आधुनिक काळात सीमेवर शत्रूशी दोन हात करण्यासाठी केवळ शिस्त आणि परंपरागत अस्त्र (काठी वैगरे) चालविण्याचं प्रशिक्षण पुरेसं नसतं, तर त्यासाठी आधुनिक शस्त्र चालविण्याचं ज्ञान आणि युद्धकला अवगत असावी लागते. आणि हे प्रशिक्षण तीन दिवसात आत्मसात करणे सहज शक्य वाटत नाही. त्यामुळे सरसंघचालकांचे वक्तव्य कोणत्याच पातळीवर प्रत्यक्षात येणे श्यक्य नाही. अर्थात याची जाण सरसंघचालकांनाही असावी. तरीही असलं अवाजवी विधान करून मोहन भागवत यांनी गोंधळ निर्माण केला आहे. यामागचा त्यांचा हेतू काय ? याचा शोध घेतला गेला पाहिजे. कुठल्याही परिणामांची तमा न बाळगता भारताचे शूर सैनिक सीमांचे रक्षण करत आहेत, दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी छातीवर गोळ्या झेलण्यासही ते मागे पुढे पाहत नाही. त्यामुळे सैनिकांच्या शौर्याबाबत शंका घेणे, किंव्हा त्यांच्या मनोबलाला ठेच पोहचेल असं वक्तव्य कोणत्याच नेत्याकडून करणे अपेक्षित नाही. आज देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. संघ हि भाजपाची मातृसंस्था असल्याने सरसंघचालकांचा प्रत्येक शब्द सरकारसाठी प्रमाण ठरू शकतो. सध्या दहशतवादी हल्ल्यांमुळे काश्मीर खोरे धगधगते आहे. या हल्ल्याना पाकिस्तानची फूस असल्याचे सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत सरकारला ठोस भूमिका घेण्यासाठी मार्गदर्शन करणे भागवत यांच्याकडून अपेक्षित असताना सैन्यदलाबाबत वादग्रस्त वक्तव्य करून त्यांना काय साध्य करायचे आहे. किमान देश संरक्षणाच्या मुद्द्यावर तरी पक्ष संघटनांनी राजकारण न करता, आपसातील मतभेद विसरून सैन्याच्या पाठीशी उभे राहायला हवे. मात्र इथे एमआयमचे ओवेसी जवानांच्या बलिदानाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करतात, तर सरसंघचालक अवाजवी विधान करून गोंधळ निर्माण करत आहे. त्यामुळे देश बिकट परिस्थितीचा सामना करत असताना असा नाहकचा वाद निर्माण करणे गरजेचे आहे का?, याचे आत्मचिंतन या नेत्यांनी करण्याची गरज आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आतापर्यंत देशाला जेव्हा जेव्हा मोठया नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला आहे तेव्हा तेव्हा आरएसएसने मृतदेह उचलण्यापासून ते जखमींची मदत करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. युद्धच्या वेळीही संघ मदत करण्यास तयार असतो. त्यामुळे कुणी कितीही विरोध केला तरी खरं बदलणार नाही.

युद्धच्या वेळीही संघ मदत करण्यास तयार असतो. >>>
फक्त तयारच असतो. करत मात्र नाही. Wink
स्वातंत्र्ययुध्दात शुन्य योगदान असणार्यांनी युध्दाच्या बाता करूच नये

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सामाजिक क्षेत्रातील कार्य नाकारण्याचे काहिच कारण नाही. मात्र मुद्दा मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा आहे.. त्यांनी लष्कराशी केलेल्या तुलनेचा आहे..कुणी सामाजिक कार्य करते म्हणून त्यांना काहीही बोलण्याचा आणि तसा दावा करण्याचा अधिकार मिळत नाही.

अर्थात.. आपण हाच युक्तिवाद करणार आहात.. नुकतीच एक बातमी वाचली व्हाट्स ऍप वर त्यात देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या काही दिवसांनंतर पाकिस्ताननं जम्मू-काश्मीरवर हल्ला केला होता. यावेळी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी पाकिस्तानविरोधात आरएसएसकडे मदतीची मागणी केली होती'', असा दावा उमा भारती यांनी केला आहे. आता याबद्दल आपण काय सांगाल ??

मदत मागितली की नाही माहीत नाही पण त्यावेळी संघाकडून ठिकठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आली होती. पण तीही तुम्हाला कबूल नसणार

मदत मागितली की नाही माहीत नाही पण त्यावेळी संघाकडून ठिकठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आली होती. पण तीही तुम्हाला कबूल नसणार<<
>>मी कशाला नाकबूल असेल... चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्याची माझी सवय आहे. पणआता तुम्हीच बघा संघाने घेतली रक्तदान शिबिरे आणि दावा केला जातोय कि नेहरूंनी संघाला मदत मागितली होती.. यात कुठेतरी उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय असे नाही का वाटत.

कसली मदत कोणी केली जी लोक झेंडावंदन करत नव्हती तिरंग्याला अपशकूनी मीनत होती त्यांच्याकडून प्रखर देशभक्त नेहरू मदत मागतील? शक्यच नाही

मग ओवेसी काय म्हणाले ते ऐकू आला नाही वाटते>>>>>
ओवेसी साठी वेगळा धागा काढा तिकडे बोलू
संघ खोटे दावे करतो आहे हे तुम्हाला मान्य आहे का?

राहुल का भन्नाट शोध >>>> भन्नाट काय त्यात ! अर्धी खाकी चड्डी आणी पांधरा शर्ट हा १००% शाळांचा गणवेष होता त्या काळात. जे मी फोटो टाकले आहेत ते १९६३ च्या परेड मधील आहेत.
पहिला फोटो (मागचा जथा पहा) जवळुन काढला असल्यामुळे मुले स्वप्ष्ट दिसत आहेत. दुसरा फोटो (मागचा जथा पहा) थोडा लांबुन काढला असल्यामुळे थोडे आरेएसएस सारखे वाटतात. पण पुढच्या रथामुळे कोणाचे संचलन आहे ते समजते. आता दुसरा फोटो अजुन लाबुन घ्या आणी पुढचा रथ काढुन टाका.

सर्वात महत्वाचे म्हणजे - ज्या फोटोचा दावा केला जात आहे त्या फोटोत खुप चुकीच्या गोष्टी सहज नजरेस येतात
१. खाल्यच्या बाजुला अजुन एक झेंडा दिसतो आहे. तो कोणता आहे ?
२. माणसांच्या सावल्यांची लांबी एकसारखी नाहि
३. लोक कुठेहि कसेहि उभे आहेत
४. फोटोच्या मागील बाजु ब्लर करण्यार आली असावी
५. हिंदुस्तान टाइम्स मधील १९६३ जा फोटो आहे परेडचा त्यातील रस्ता आणी या फोटोतील रस्ता हे पुर्ण वेगळे आहेत.

काहिहि फेकाफेकी करण्यापेक्षा , पुर्वी आपले काहिहि योगदान नव्व्हते ( ना सामाजिक सुधारणा ना स्वातंत्र्य लढा) हे मान्य करुन निदान आता तरी धार्मीक आणी जातीय फुट पाडणे सोडुन देउन काहितरी विधायक कार्य करावे संघाने.

रक्तदान शिबिरं की दुसर्‍याचं रक्त सांडण्याचे कार्यक्रम?
४ फेब्रुवारी १९४८ रोजी संघावर बंदी घातली गेली, तेव्हाचा सरकारचा खुलासा (नोटः तेव्हा गृहमंत्री होते सरदार वल्लभभाई पटेल)
..to root out the forces of hate and violence that are at work in our country and imperil the freedom of the nation.. the Government of India have decided to declare unlawful the Rashtriya Swayamsevak Sangh.. [I]n several parts of the country, individual members of Rashtriya Swayamsevak Sangh have indulged in acts of violence involving arson, robbery, dacoity, and murder and have collected illicit arms and ammunitions. They have been found circulating leaflets exhorting people to resort to terrorist methods, to collect fire arms….the cult of violence sponsored and inspired by the activities of the Sangh has claimed many victims. The latest and the most precious to fall was Gandhiji himself. In these circumstances it is the bounden duty of the government to take effective measures to curb this re-appearance of violence in a virulent form and as a first step to this end, they have decided to declare the Sangh as an unlawful association.”
हिंसा आणि द्वेष पसरवून देशाचं स्वातंत्र्य धोक्यात आणू पाहणार्‍या शक्तींचा बिमोड करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात येत आहे. देशाच्या अनेक भागांत संघस्वयंसेवकांनी शस्त्रास्त्रे गोळा केली आहेत. ते जाळपोळ, लूटमार, खून यांसारखी हिंसक कृत्ये करीत आहेत. लोकांना हिंसाचार करण्यास उद्युक्त करणारी पत्रके वाटीत आहेत.....

संघावरील बंदी उठवण्याची विनंती करणार्‍या गोळवलकरांच्या पत्राला सरदार पटेलांनी लिहिलेल्या उत्तराचा अंश
The objectionable part arose when they (RSS), burning with revenge, began attacking Mussalmans. All their speeches were full of communal poison … As a final result of that poison, the country had to suffer the sacrifice of Gandhiji … RSS men expressed joy and distributed sweets after Gandhiji’s death. It became inevitable for the government to take action against the RSS.”
प्रत्यक्ष भेटीत पटेलांनी गोळवलकरांना संघाने विध्वसंक मार्ग सोडून विधायक कार्याकडे वळा, असे स्पष्टपणे सांगितले होते.

प्रत्यक्ष भेटीत पटेलांनी गोळवलकरांना संघाने विध्वसंक मार्ग सोडून विधायक कार्याकडे वळा, असे स्पष्टपणे सांगितले होते. >>> ते अजुनहि झालेले नाहि.

<< आतापर्यंत देशाला जेव्हा जेव्हा मोठया नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला आहे तेव्हा तेव्हा आरएसएसने मृतदेह उचलण्यापासून ते जखमींची मदत करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. युद्धच्या वेळीही संघ मदत करण्यास तयार असतो. त्यामुळे कुणी कितीही विरोध केला तरी खरं बदलणार नाही. >>
-------- नैसर्गिक आपत्ती मधे मदत केली हे मान्य केले तरी अशा प्रकारची मदत केल्याने वरिल बेताल वक्तव्य करण्याचा परवाना मिळत नाही.

भारतीय लष्करापेक्षा कमी दिवसांत सैन्य उभारेल, कमी वेळात लढण्याची तयारी, केवळ सन्विधान हा अडथळा हे कशासाठी ? भारताच्या लष्कराला आणि त्याच्या कामगिरीवर नकळतपणे आपण प्रश्न निर्माण करत आहोत. याची काही अवशक्ता नव्हती.

समाजासाठी काही चान्गली कामे करत असाल तर आदर आहेच पण.... बेताल वक्तव्याला आळा घाला अन्यथा मदत नको पण बेतालपणा आवरा असे म्हणावे लागेल.

स्वातंत्र्य मिळाल्याच्या काही दिवसांनंतर पाकिस्ताननं जम्मू-काश्मीरवर हल्ला केला होता. यावेळी तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी पाकिस्तानविरोधात आरएसएसकडे मदतीची मागणी केली होती'', असा दावा उमा भारती यांनी केला आहे. आता याबद्दल आपण काय सांगाल ??
<<
काही दिवसांनी,

"श्रीगुरुजींनी सांगितलं म्हणून नेहरूंनी काश्मिर प्रश्न युनोत नेला." असा दावा मी करणार आहे. फोटोशॉप केलेलं नेहरूंचं पत्र मजकडे पुराव्यादाखल उपलब्ध आहे. या कोण पुरावे मागायला येताय ते. शिवाय हा रेफ्रन्स देणारी एक वेबसाईटही तयार करून ठेवली आहे, विकीपेडिया मधे रेफरन्ससाठीही वापरली आहे ती साईट. तर असो. नेहरू म्हणजे अगदी सरसंघचालकांच्या ऐकण्यातला माणुस हो. पण मेला कृतघ्न निघाला.. ~सुस्कारा~

त्याच वेळी ६२ च्या हारलेल्या युद्धात संघाने केलेल्या मुडदे उचलायच्या मदतीबद्दल कृतज्ञता पुरेशी व्यक्त झाली नाही असाही दावा करणार आहे. खरं तर मुडदे उचलायच्या ऐवजी संघ स्वयंसेवकांनी त्या युद्धात चिन्यांचे मुडदे पाडून युद्धच का नाही जिंकले असा शीशू स्वयंस्वेवक लेवलचा प्रश्न मला पडतो आहे. कारण नैका, स्वतः मा... सरसंघचालकांनीच सांगितलंय ना, लष्करी बणून देश वाचवायला आम्ही पट्कन पावरफुल बनू शक्तो. ते युद्ध नक्किच ३ दिवसापेक्षा जास्त चाल्लं होतं. नैका? पण अस्लं काय विचारलं तर बौद्धिक घेणार्‍या 'सरां'चे वटारलेले डोळे आठवून नंतर खाकी चड्डीला डाग का पडला असे घरी विचारल्याचेही आठवतेय..

तसाच एक प्रश्न : "तिकडून" येणार्‍या आझाद हिंद फौजेला मिळण्यासाठी इकडून शतसह्स्त्रावधि स्वयंसेवक प्राण तळहाती घेऊन सज्ज होते, तर माशी कुठे शिंकली होती हा आहे. तेव्हाच एकदाचं हिंसक पद्धतीने ब्रिटिशांचं काटुक मोडलं असतं तर आज आसिंधूसिंधूहिंदुस्थानाची "मागणी" करायची ही लाजिरवाणी वेळ आलीच नसती.

गझलकार" शब्द कुठेही लिहिला गेला की त्यांना नोटिफिकेशन जाते, मग ते डोकावतात
>>> बाप रे काय हसलो मी.

एवढा ह्यांच्या ह्याच्यात एवढा दम आहे तर कसाब सारखा पाकीस्तानात जाउन गोळीबार करून तरी दाखवा.... नाही तर बॉम्ब स्फोट तरी करून दाखवा. (ते शिव सेनेचेही तसलेच. वांद्र्याच्या बाहेर आवाज देखील जात नाही. पाकिस्तानात जाउन काहीतरी अतिरेकी कारवाया करा 'सामन्या'त बोरू घासण्यापेक्षा...)

(ते शिव सेनेचेही तसलेच. वांद्र्याच्या बाहेर आवाज देखील जात नाही. पाकिस्तानात जाउन काहीतरी अतिरेकी कारवाया करा 'सामन्या'त बोरू घासण्यापेक्षा...

सही पकडे हो

म्हणजे पाकिस्तानचे एक घाव दोन तुकडे करण्याची धमक फक्त काँग्रेसमध्ये आहे. RSS BJP SHIVSENA.यांच्या केवळ पोकळ बाता चालू असतात

काँग्रेसने पाकिस्तानचे तुकडे केले असे म्हणणे उथळपणाचे आहे. जेव्हा पाकिस्तान बनला तेव्हाच त्याचे तुकडे होण्याची बीजे पेरली गेली होती. उर्दू भाषेची दडपशाही, पंजाबी लोकांची दडपशाही, पूर्व पाकिस्तानच्या बंगाली, काळ्या, छोट्या चणीच्या लोकांना पंजाबच्या गोर्‍यापान धिप्पाड लोकांपुढे तुच्छ मानणे हे सगळे सुरू होते. शिवाय भौगोलिक दृष्ट्याही दोन वेगळे तुकडे, मग त्यातील दळणवळण हेही अडचणीचे ठरत होते. त्यामुळे सांस्कृतिक दृष्ट्या वेगळे असणारे हे दोन तुकडे एका देशात रहाणे शक्य नाही हे लवकरच स्पष्ट झाले होते. १९७१ च्या सुमारास काँग्रेस सोडून अन्य कुठल्या पक्षाला फारसे अस्तित्त्वही नव्हते. त्यामुळे ह्या घटनेचे सगळे श्रेय कॉंग्रेसला देणे चूक आहे. ९०% परिस्थिती तशी होतीच. १०% इंदिरा गांधींचा पुढाकार होता म्हणून घडले. शिवाय शीतयुद्धामुळे ह्या लढ्याला अमेरिका-सोव्हियत असेही एक परिमाण होते. पाकिस्तान अमेरिकेचे बाहुले तर भारत सोव्हियतची कळसूत्री बाहुली. त्यामुळे तीही प्रेरणा इथे कार्यरत होती.
निव्वळ काँग्रेसची (म्हणजेच इंदिरा गांधींची) इच्छाशक्ती कितपत कारणीभूत ठरली हा वादाचा मुद्दा आहे.

शेंडी
10% पैकी छटाकभर तरी हिंमत मोदी आणि ट्रंम्प मध्ये नाही यात आम्हाला देखील शंका नाही आहे हे लक्षात ठेवा.
दोघांच्या निव्वळ तोंडातच फुकाचा दम आहे.

काँग्रेसने पाकिस्तानचे तुकडे केले असे म्हणणे उथळपणाचे आहे >>> अहो वाजपेयीच असे म्हणाले आहेत. अजुन मोदींनी वाजपेयीना कोपर्यात केले नाहिये. तेव्हा जरा जपुन कोमेंट करा.

Pages