संघ आणि लष्कर

Submitted by अँड. हरिदास on 15 February, 2018 - 02:25

mohan-bhagwat.jpg

संघ आणि लष्कर

वेळ पडल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय लष्करापेक्षा कमी दिवसांत सैन्य उभारेल या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. सरसंघचालकांनी लष्कराच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे विधान करून भारतीय सैन्याचा अवमान केल्याची टीका करत मोहन भागवत यांनी सैन्यदल व शहिदांची माफी मागावी, अशी मागणी विरोधकांनी केली, तर भागवत यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा खुलासा संघाकडून करण्यात आला. वास्तविक, एकादी संघटना देशाच्या सरंक्षणासाठी तप्तरता दाखवून वेळ पडल्यास सीमेवर लढण्यासाठी जाण्यास तयार असल्याचे वक्तव्य जर त्या संघटनेचा प्रमुख करत असेल, तर देशप्रेमाच्या मुद्दयांवर याला काही फारसे वावगे म्हणण्याचे कारण नाही. अर्थात, आपलं देशप्रेम व्यक्त करत असताना इतरांच्या भावनांना ठेच पोहचणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे असते. मात्र सध्या वादग्रस्त वक्तव्य करण्याचं उधाण आलं असून देशातील प्रमुख आणि अत्यंत जबाबदार व्यक्तींच्या मुखातून नाहकचा
वाद आणि गोंधळ निर्माण करणारे शब्द बाहेर पडत आहे. मुजफ्फरपूर मध्ये सरसंघचालकांनी मांडलेलं मतही याच श्रेणीतलं म्हणावे लागेल. काश्मीर खोऱ्यात भारतीय जवान दहशतवाद्यांशी जिकीरीचा लढा देत असताना त्यांच्याशी एकाद्या संघटनेच्या कार्यकर्त्यांची किंव्हा स्वयंसेवकांची तुलना करणे. किंबहुना, आपल्या संघटनेची तयारी लष्करापेक्षा चांगली आहे, अशा आशयाचे वक्तव्य करणे म्हणूनच अनेकांच्या पचनी पडलेलं नाही. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्पष्टीकरण येऊनही या मुद्द्यावरील वाद संपलेला नाही.

रविवारी बिहार मधील मुझफ्फरपुर येथील एका कार्यक्रमात संघाच्या शिस्तीबद्दल बोलत असताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'सैनिकांना देशसेवेसाठी तयार करण्यास 6 ते 7 महिने लागतात. देशाला गरज पडली आणि संविधान परवानगी देत असेल तर 3 दिवसांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसवेक सज्ज असतील. असे ते ओघात म्हणा कि मुद्दामहुन म्हणा, बोलून गेले. ज्या संघटनेला देशातील सत्ताधारी पक्षाचे रिमोट कंट्रोल समजल्या जाते, त्या संघटनेचा प्रमुख जर लष्कराबाबत असं वक्तव्य करत असेल तर त्याची दखल घेतली जाणे, त्यावर विवाद होणे साहजिकच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक संघटना आहे. ती कितीही शिस्तबद्ध असली, तिचा कारभार अगदी आर्मी हेडकॉर्टर सारखा चालत असला, तरी ते काही सैनिक निर्मितीचे प्रशिक्षण केंद्र नाही. त्यामुळे स्वयंसेवकांची सैनिकांशी तुलना करणे थोडेसे अवास्तवाचं. यावर संघाने भागवत यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचे स्पष्टीकरण दिले. भागवत संघाची तुलना लष्कराशी करत नव्हते तर सैनिक तयार करण्यासाठी लष्कराला सहा सात महिने लागतात, पण स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिल्या गेले तर ते तीन दिवसात लढायला तयार होतील, असे भागवत यांना म्हणायचे असल्याचा खुलासा संघाने केला आहे. म्हणजे सामान्य माणसाला जर सैनिक व्हायचे असेल तर त्याला सहा ते सात महिने लागतील. आणि संघाचा स्वयंसेवक अवघ्या तीन दिवसात सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करेल. याचाच अर्थ सैन्यामध्ये आणि स्वयंसेवकांमध्ये थोडासाच फरक आहे, असे संघाला म्हणायचे आहे का? कि हि बाब देशाच्या निदर्शनास आणून द्यायची आहे?

राष्ट्र संकटात असेल तर त्याच्या संरक्षणार्थ समोर येणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. पण त्यासाठी लष्कर उभारण्याची परवानगी या देशाचे संविधान कुणालाही देत नाही. त्यामुळे 'घटनात्मक कायदा आणून परवानगी मिळाली तर संघ स्वयंसेवक देशाचे रक्षण करतील, या वाक्याला काही अर्थ उरत नाही. मुळात अंलबजावणीच्या पातळीववर सरसंघचालकांचे विधान म्हणजे अतिशयोक्ती अलंकार आहे. ऐक तर देशाचे संविधान असं काही करायला परवानगी देत नाही, दुसरं म्हणजे आजच्या आधुनिक काळात सीमेवर शत्रूशी दोन हात करण्यासाठी केवळ शिस्त आणि परंपरागत अस्त्र (काठी वैगरे) चालविण्याचं प्रशिक्षण पुरेसं नसतं, तर त्यासाठी आधुनिक शस्त्र चालविण्याचं ज्ञान आणि युद्धकला अवगत असावी लागते. आणि हे प्रशिक्षण तीन दिवसात आत्मसात करणे सहज शक्य वाटत नाही. त्यामुळे सरसंघचालकांचे वक्तव्य कोणत्याच पातळीवर प्रत्यक्षात येणे श्यक्य नाही. अर्थात याची जाण सरसंघचालकांनाही असावी. तरीही असलं अवाजवी विधान करून मोहन भागवत यांनी गोंधळ निर्माण केला आहे. यामागचा त्यांचा हेतू काय ? याचा शोध घेतला गेला पाहिजे. कुठल्याही परिणामांची तमा न बाळगता भारताचे शूर सैनिक सीमांचे रक्षण करत आहेत, दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी छातीवर गोळ्या झेलण्यासही ते मागे पुढे पाहत नाही. त्यामुळे सैनिकांच्या शौर्याबाबत शंका घेणे, किंव्हा त्यांच्या मनोबलाला ठेच पोहचेल असं वक्तव्य कोणत्याच नेत्याकडून करणे अपेक्षित नाही. आज देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. संघ हि भाजपाची मातृसंस्था असल्याने सरसंघचालकांचा प्रत्येक शब्द सरकारसाठी प्रमाण ठरू शकतो. सध्या दहशतवादी हल्ल्यांमुळे काश्मीर खोरे धगधगते आहे. या हल्ल्याना पाकिस्तानची फूस असल्याचे सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत सरकारला ठोस भूमिका घेण्यासाठी मार्गदर्शन करणे भागवत यांच्याकडून अपेक्षित असताना सैन्यदलाबाबत वादग्रस्त वक्तव्य करून त्यांना काय साध्य करायचे आहे. किमान देश संरक्षणाच्या मुद्द्यावर तरी पक्ष संघटनांनी राजकारण न करता, आपसातील मतभेद विसरून सैन्याच्या पाठीशी उभे राहायला हवे. मात्र इथे एमआयमचे ओवेसी जवानांच्या बलिदानाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करतात, तर सरसंघचालक अवाजवी विधान करून गोंधळ निर्माण करत आहे. त्यामुळे देश बिकट परिस्थितीचा सामना करत असताना असा नाहकचा वाद निर्माण करणे गरजेचे आहे का?, याचे आत्मचिंतन या नेत्यांनी करण्याची गरज आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या अंदाजानुसार कोणताही गझलकार वरील चर्चेत सहभागी नसताना एका 26 वेळा मेलेल्या कोंबड्याने उगीचच गझलकार हा शब्दप्रयोग येथे केलेला आहे Lol हे कोंबडं सत्तावीसाव्या वेळेला आगीला घाबरेल अशी शक्यताच नाही

त्याशिवाय, कैद्यांवर शाब्दिक आणि प्रत्यक्ष आसूड ओढण्याच्या आवेशात बाकीचे टोळके माबोवर दादागिरी करताना गेले कैक दिवस दिसते आहेच

एक बरे आहे की जनता ह्यांचे अजिबात ऐकत नाही, अन्यथा पुन्हा भ्रष्ट सरकारे आली असती

बाकी मोहन भागवत ह्यांच्याबद्दल मला काडीची आस्था नाही। संघाने आपत्ती प्रसंगी कामे केली आहेत असे ऐकून आहे। तेव्हढ्यापुरताच काय आदर वाटतो तो वाटतो

२६वेळा मेलेला कोंबडं: "पण तुम्हाला कशावरुन वाटले की इथे कोणीच गझलकार चर्चेत नाही म्हणून.?"
फिकरबॉट: "कारण समस्त जगात एकच गझलकार आहेत आणि ते आम्हीच आहोत असे आम्ही समजतो म्हणून."

बेफिकीर, +१११. इग्नोरास्त्रासारखा रामबाण उपाय नाही. Happy

>>>>>इग्नोरास्त्रासारखा रामबाण उपाय नाही>>>>>
तेच तर ते करू शकत नाहीत.
एखाद्यावर डु आई असण्याचा आरोप झाल्यावर तो मी नव्हेच हे मुद्दामहून येऊन सांगायची 2नच कारणे असतात,

1)माबो वर नवीन आहात आणि पहिल्यांदाच असा आरोप झालाय
2) खाई त्याला खवखवे,
चोर की दाढी मे तिनका,
चो म चा

धागा संघावर आहे म्हणून
तो नगरचा संघ स्वयंसेवक उप महापौर पाद नावाचा कोण प्राणी आहे त्याने शिवाजी महाराजांविषयी काही अपशब्द वापरले म्हणे.
हीच का ती शिकवण?

हा प्राणी श्रीपाद छिन्दम अहमदनगरचा भाजपचा उपमहापौर आहे. त्याने शिवाजी महाराजाना अश्लील शिविगाळ केली . त्याची ऑडिओ क्लिप उपलब्ध आहे. नगरच्या भाजप खासदार गांधी चा हा उजवा हात आहे. ह्या गांधीबाबाने तंबाखूने पचन क्रिया सुधारते असा अहवाल संसदेला दिला होता. शिक्शण एस एस सी. अभिमानाची गोष्ट म्हणजे हा उपमहापौर आर एस एस चा स्वयंसेवकही आहे. अर्धचड्डिकेतला त्याचा संचलनातला फोटोही उपलब्ध आहे. छत्रपतीका आशिर्वाद भाजपके साथ हा चुनावी जुमलाच होता. बौद्धिकात घोटवलेले ओठावर आले त्याच्या हाकानाका.

<<बाकी मोहन भागवत ह्यांच्याबद्दल मला काडीची आस्था नाही। संघाने आपत्ती प्रसंगी कामे केली आहेत असे ऐकून आहे। तेव्हढ्यापुरताच काय आदर वाटतो तो वाटतो>>
-------- आपत्ती प्रसन्गी काम केले म्हणुन बेताल वक्तव्य करण्याचा परवाना मिळत नाही.

याच फुटपट्टीने मोजायचे झाले तर पाक व्याप्त काश्मीर मधे नैसर्गिक आपत्ती प्रसन्गी जमात-उद-दवा ( JuD) सन्घटनेने खुप मोठे मानवतावादी कार्य केले. २००० हुन जास्त स्वयमसेवकान्नी भूकम्प प्रभावीत क्षेत्रात मदत केली. याच सन्घटनेचा मुम्बई हल्ल्यात सहभाग होता...

२००० हुन जास्त स्वयमसेवकान्नी भूकम्प प्रभावीत क्षेत्रात मदत केली. याच सन्घटनेचा मुम्बई हल्ल्यात सहभाग होता... >>> Lol

हिंदू व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना शिव्या घालायला व त्यांच्यावर बिनबुडाची टिका करायला, इथल्या काही ट्रोल्स व हिंदू द्वेष्ट्यांना फुकटचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिल्याबद्दल श्री अँड. हरिदास यांचे "हार्दीक" अभिनंदन !
नवीन Submitted by अनिरुध्द.. on 16 February, 2018 - 13:4
>>
अनिरुद्ध जी, हा धागा कुणालाही शिव्या शाप देण्यासाठी नाही.. संघ प्रमुख काय बोलले त्याच विश्लेषण करण्यासाठी आहे.. आपण संघ प्रमुखांच्या वक्तव्याचे समर्थन करत असाल तर कृपया त्यांच्या विधानांचा अनव्यार्थ इथे मांडू शकता.. किंबहुना तेच याठिकाणी अपेक्षित आहे..

ते एकदा
3500 स्वयंसेवकांनी लष्कराच्या खांद्याला खांदा लावून 26 jan ला संचलन केले, (ते पण 1962 च्या युद्धात आमच्या सहभागाचा सत्कार करायला नेहरूंनी आग्रहाने बोलावले म्हणून हो, नाहीतर आम्हाला सोस नाही प्रसिद्धीचा)
त्या बद्दल बोला कुणीतरी,

सरकार ला RTI केली तर 26 jan 1963मध्ये सहभागी पथकांची माहिती मिळू शकेल का?

ते एक भाजपायी आमदार म्हणाले - जो शाखेत जात नाही, तो हिंदू नाही.
हे एक म्हणताहेत - संघावर टीका म्हणजे हिंदू धर्मावर टीका. म्हणजे हिंदुद्वेष्टा.
लॉजिकच्या नावाने चांगभलं.

श्रीपाद छिन्दम अहमदनगरचा भाजपचा उपमहापौर आहे. त्याने शिवाजी महाराजाना अश्लील शिविगाळ केली . त्याची ऑडिओ क्लिप उपलब्ध आहे. <<
>> ऑडियो क्लिप ऐकली.. सत्ता काहींच्या कशा डोक्यात गेली आहे हे यावरून लक्षत येते.. काहीही करण नसताना आपल्या मनातील गरळ ओकून छिदम ने आपली लायकी दाखवून दिली आहे.. त्याचा निषेध.
विषयांतर झाल्याबद्दल क्षमस्व.. मात्र या वृत्तीचा निषेध केल्यावाचून राहवले नाही.

मला वाटते RSS ह्या संघटनेला वाजवी पेक्षा जास्त महत्त्व त्यांचे विरोधक हेतुपुरस्सर देत आहेत
कदाचित विरोधी मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी असावे

मला वाटते RSS ह्या संघटनेला वाजवी पेक्षा जास्त महत्त्व त्यांचे विरोधक हेतुपुरस्सर देत आहेत
कदाचित विरोधी मतांचे ध्रुवीकरण करण्यासाठी असावे<<
>>सगळा खटाटोप राजकारणासाठीच

3500 स्वयंसेवकांनी लष्कराच्या खांद्याला खांदा लावून 26 jan ला संचलन केले, (ते पण 1962 च्या युद्धात आमच्या सहभागाचा सत्कार करायला नेहरूंनी आग्रहाने बोलावले म्हणून हो, नाहीतर आम्हाला सोस नाही प्रसिद्धीचा)
त्या बद्दल बोला कुणीतरी,
>>1962 च्या युद्धात सैन्याला मोठी मदत केल्यामुळे पंडित नेहरू यांना संघाला 26 जानेवारीच्या परेड मध्ये बोलवावे लागले होते. त्यावेळीही अगदी वेळवर संघाला आमंत्रण देण्यात आले आणि दोन दिवसात 3500 स्वयंसेवक गणवेशात परेड साठी हजर झाले होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ और 1962 का युद्ध http://www.shiveshpratap.com/rss-and-1962-china-war/ @shiveshpratap_द्वारे

दोन दिवसात 3500 स्वयंसेवक गणवेशात परेड साठी हजर झाले होते. >>>>>>>>>> काहिहि फेकाफेकी चालली आहे.

४ वर्षात इथेपर्यत आले. अजुन ४ वर्षे गेली की म्हणतील आर एस एस नेच पाकिस्तान विरुद्ध युद्द जिंकले. हे मी फक्त खिल्ली उडवण्यासाठी म्हणत नाहिये. फार व्यवस्थित वीष पेरलेले जात आहे.

RSS नागपुर मधून बाहेर पडले नाही
संचालनात भाग घेणे तर दूरच राहीले. आणि हो देशाचे संचलन आहे त्यात पुर्ण पोशाख सुसंकृतपणे लागतो असे हाफ चड्ड्या घालून पोरं एकवेळ चालतात बाप्ये माणसांना परेड कोणी करू देईल का? Wink यांना नसेल हो पण देशाच्या इज्जतीचा सवाल आहे. Biggrin
आणिबाणीत इंदीरा यांना पाठींबा दिलेला म्हणे असे असते तर मोदी वाजपेयी अडवाणी भुमिगत होऊन लपुन का बसले असते? काहीही विदूषकी पुड्या सोडल्या आहे Wink

काँग्रेस सेवादलाच्या गणतंत्रदिवसाच्या संचलनाचे फोटो संघाचे आहेत असे बिनदिक्कत खोटेच बोलून संघाचा खोटा प्रचार सुरु आहे. त्याला बळी पडतात अनामिकसारखे भोळेभाबडे लोक. आयजीच्या जीवावर बायजी उदार. उद्या भारताचे पहिले पंतप्रधान गोळवलकरच होणार होते असाही प्रचार होईल याची खात्री आहे.

Pages