संघ आणि लष्कर

Submitted by अँड. हरिदास on 15 February, 2018 - 02:25

mohan-bhagwat.jpg

संघ आणि लष्कर

वेळ पडल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय लष्करापेक्षा कमी दिवसांत सैन्य उभारेल या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. सरसंघचालकांनी लष्कराच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे विधान करून भारतीय सैन्याचा अवमान केल्याची टीका करत मोहन भागवत यांनी सैन्यदल व शहिदांची माफी मागावी, अशी मागणी विरोधकांनी केली, तर भागवत यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा खुलासा संघाकडून करण्यात आला. वास्तविक, एकादी संघटना देशाच्या सरंक्षणासाठी तप्तरता दाखवून वेळ पडल्यास सीमेवर लढण्यासाठी जाण्यास तयार असल्याचे वक्तव्य जर त्या संघटनेचा प्रमुख करत असेल, तर देशप्रेमाच्या मुद्दयांवर याला काही फारसे वावगे म्हणण्याचे कारण नाही. अर्थात, आपलं देशप्रेम व्यक्त करत असताना इतरांच्या भावनांना ठेच पोहचणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे असते. मात्र सध्या वादग्रस्त वक्तव्य करण्याचं उधाण आलं असून देशातील प्रमुख आणि अत्यंत जबाबदार व्यक्तींच्या मुखातून नाहकचा
वाद आणि गोंधळ निर्माण करणारे शब्द बाहेर पडत आहे. मुजफ्फरपूर मध्ये सरसंघचालकांनी मांडलेलं मतही याच श्रेणीतलं म्हणावे लागेल. काश्मीर खोऱ्यात भारतीय जवान दहशतवाद्यांशी जिकीरीचा लढा देत असताना त्यांच्याशी एकाद्या संघटनेच्या कार्यकर्त्यांची किंव्हा स्वयंसेवकांची तुलना करणे. किंबहुना, आपल्या संघटनेची तयारी लष्करापेक्षा चांगली आहे, अशा आशयाचे वक्तव्य करणे म्हणूनच अनेकांच्या पचनी पडलेलं नाही. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्पष्टीकरण येऊनही या मुद्द्यावरील वाद संपलेला नाही.

रविवारी बिहार मधील मुझफ्फरपुर येथील एका कार्यक्रमात संघाच्या शिस्तीबद्दल बोलत असताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'सैनिकांना देशसेवेसाठी तयार करण्यास 6 ते 7 महिने लागतात. देशाला गरज पडली आणि संविधान परवानगी देत असेल तर 3 दिवसांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसवेक सज्ज असतील. असे ते ओघात म्हणा कि मुद्दामहुन म्हणा, बोलून गेले. ज्या संघटनेला देशातील सत्ताधारी पक्षाचे रिमोट कंट्रोल समजल्या जाते, त्या संघटनेचा प्रमुख जर लष्कराबाबत असं वक्तव्य करत असेल तर त्याची दखल घेतली जाणे, त्यावर विवाद होणे साहजिकच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक संघटना आहे. ती कितीही शिस्तबद्ध असली, तिचा कारभार अगदी आर्मी हेडकॉर्टर सारखा चालत असला, तरी ते काही सैनिक निर्मितीचे प्रशिक्षण केंद्र नाही. त्यामुळे स्वयंसेवकांची सैनिकांशी तुलना करणे थोडेसे अवास्तवाचं. यावर संघाने भागवत यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचे स्पष्टीकरण दिले. भागवत संघाची तुलना लष्कराशी करत नव्हते तर सैनिक तयार करण्यासाठी लष्कराला सहा सात महिने लागतात, पण स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिल्या गेले तर ते तीन दिवसात लढायला तयार होतील, असे भागवत यांना म्हणायचे असल्याचा खुलासा संघाने केला आहे. म्हणजे सामान्य माणसाला जर सैनिक व्हायचे असेल तर त्याला सहा ते सात महिने लागतील. आणि संघाचा स्वयंसेवक अवघ्या तीन दिवसात सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करेल. याचाच अर्थ सैन्यामध्ये आणि स्वयंसेवकांमध्ये थोडासाच फरक आहे, असे संघाला म्हणायचे आहे का? कि हि बाब देशाच्या निदर्शनास आणून द्यायची आहे?

राष्ट्र संकटात असेल तर त्याच्या संरक्षणार्थ समोर येणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. पण त्यासाठी लष्कर उभारण्याची परवानगी या देशाचे संविधान कुणालाही देत नाही. त्यामुळे 'घटनात्मक कायदा आणून परवानगी मिळाली तर संघ स्वयंसेवक देशाचे रक्षण करतील, या वाक्याला काही अर्थ उरत नाही. मुळात अंलबजावणीच्या पातळीववर सरसंघचालकांचे विधान म्हणजे अतिशयोक्ती अलंकार आहे. ऐक तर देशाचे संविधान असं काही करायला परवानगी देत नाही, दुसरं म्हणजे आजच्या आधुनिक काळात सीमेवर शत्रूशी दोन हात करण्यासाठी केवळ शिस्त आणि परंपरागत अस्त्र (काठी वैगरे) चालविण्याचं प्रशिक्षण पुरेसं नसतं, तर त्यासाठी आधुनिक शस्त्र चालविण्याचं ज्ञान आणि युद्धकला अवगत असावी लागते. आणि हे प्रशिक्षण तीन दिवसात आत्मसात करणे सहज शक्य वाटत नाही. त्यामुळे सरसंघचालकांचे वक्तव्य कोणत्याच पातळीवर प्रत्यक्षात येणे श्यक्य नाही. अर्थात याची जाण सरसंघचालकांनाही असावी. तरीही असलं अवाजवी विधान करून मोहन भागवत यांनी गोंधळ निर्माण केला आहे. यामागचा त्यांचा हेतू काय ? याचा शोध घेतला गेला पाहिजे. कुठल्याही परिणामांची तमा न बाळगता भारताचे शूर सैनिक सीमांचे रक्षण करत आहेत, दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी छातीवर गोळ्या झेलण्यासही ते मागे पुढे पाहत नाही. त्यामुळे सैनिकांच्या शौर्याबाबत शंका घेणे, किंव्हा त्यांच्या मनोबलाला ठेच पोहचेल असं वक्तव्य कोणत्याच नेत्याकडून करणे अपेक्षित नाही. आज देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. संघ हि भाजपाची मातृसंस्था असल्याने सरसंघचालकांचा प्रत्येक शब्द सरकारसाठी प्रमाण ठरू शकतो. सध्या दहशतवादी हल्ल्यांमुळे काश्मीर खोरे धगधगते आहे. या हल्ल्याना पाकिस्तानची फूस असल्याचे सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत सरकारला ठोस भूमिका घेण्यासाठी मार्गदर्शन करणे भागवत यांच्याकडून अपेक्षित असताना सैन्यदलाबाबत वादग्रस्त वक्तव्य करून त्यांना काय साध्य करायचे आहे. किमान देश संरक्षणाच्या मुद्द्यावर तरी पक्ष संघटनांनी राजकारण न करता, आपसातील मतभेद विसरून सैन्याच्या पाठीशी उभे राहायला हवे. मात्र इथे एमआयमचे ओवेसी जवानांच्या बलिदानाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करतात, तर सरसंघचालक अवाजवी विधान करून गोंधळ निर्माण करत आहे. त्यामुळे देश बिकट परिस्थितीचा सामना करत असताना असा नाहकचा वाद निर्माण करणे गरजेचे आहे का?, याचे आत्मचिंतन या नेत्यांनी करण्याची गरज आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

{काश्मीर मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाच मुस्लीम जवान शहीद झाल्याचा दावा करून एमआयएमच्या असदुुद्दीन ओवेसी ने जवानांच्या बलिदानाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. त्यावर बोलण्यासाठी कोणीच पुढे आला नाही.}
हिमाचल प्रदेशातल्या निवडणुकांत साक्षात मोदीजींनी वक्तव्य केलेले, तुमच्या भागातून गेलेल्या सैनिकांवर काश्मिरात दगडफेक होते.
हा कोणता रंग? तो बरोबर की चूक? उत्तराची वाट पाहता पाहता पाच महिने गेले.

काश्मीर मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाच मुस्लीम जवान शहीद झाल्याचा दावा करून एमआयएमच्या असदुुद्दीन ओवेसी ने जवानांच्या बलिदानाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. त्यावर बोलण्यासाठी कोणीच पुढे आला नाही.>> तुम्ही लिहा यावर. येथे धागा काढा. तुमचे हात कोणी बान्धुन ठेवले आहेत?

हिंदू व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना शिव्या घालायला व त्यांच्यावर बिनबुडाची टिका करायला, इथल्या काही ट्रोल्स व हिंदू द्वेष्ट्यांना फुकटचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिल्याबद्दल श्री अँड. हरिदास यांचे "हार्दीक" अभिनंदन !

हिंदूंना कोणी शिव्या घातल्या इथे? संघाला तरी कुठे शिव्या घातल्या? शिव्या घातल्या असत्या तर आयडी उडाले असते.
तुम्ही नेहमी खोटे बोलता ह्याचा हा एक आणखी पुरावा.

हिंदूंना कोणी शिव्या घातल्या इथे? संघाला तरी कुठे शिव्या घातल्या? शिव्या घातल्या असत्या तर आयडी उडाले असते.
तुम्ही नेहमी खोटे बोलता ह्याचा हा एक आणखी पुरावा.
नवीन Submitted by वंदन on 16 February, 2018 - 13:46

<<

अगदी ! Lol

या व इतर दोनचार धाग्याच्या निमात्ताने, गेल्या दोन-तीन दिवसात 'आठवडा-दोन आठवडे व दोन-चार दिवस मायबोली वय असलेले अनेक आयडी' अगदी हिरहिरीने भांडताना दिसत आहेत. Proud

प्रश्नाचे उत्तर देता येत नाही मग विषय बदला. आपले किती अवतार झालेत माबोवर? मरु दे. मला काय.

या धाग्यावर हिंदूंना शिव्या कुठे दिल्या ते सांगता येईल का खोटारड्या अनिरुद्धकाकांना?

या धाग्यावर हिंदूंना शिव्या कुठे दिल्या ते सांगता येईल का खोटारड्या अनिरुद्धकाकांना?
नवीन Submitted by वंदन on 16 February, 2018 - 14:01
<<

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ हि एक हिंदूची संघटना आहे तेंव्हा त्या संघटनेला व त्या संघटनेच्या प्रमुखाला शिव्या घातल्या की, समस्त हिंदू जनतेला शिव्या घातल्या असे आम्ही समजतो. अर्थात काही बाटगे हिंदू व तथाकथित फुरोगामी ह्याला अपवाद आहेत ती गोष्ट निराळी.

संघप्रमुख = समस्त हिंदू जनता असे तुम्ही समजता. संघप्रमुख = आपले जन्मदाते वडील असेही समजाल. तुम्हाला काय तुम्ही काहीही समजू शकता.
Rofl

संघप्रमुख = समस्त हिंदू जनता असे तुम्ही समजता. संघप्रमुख = आपले जन्मदाते वडील असेही समजाल. तुम्हाला काय तुम्ही काहीही समजू शकता.
Rofl
नवीन Submitted by वंदन on 16 February, 2018 - 14:14

<<

तसे नाही, आजकाल भारतातील बर्‍याचश्या कॉंग्रेसी, कॉंग्रेसी समर्थक व फुरोगामी लोकांना, अफजल गुरु, ओसामा बिन लादेन, हाफीज सईद व इतर दहशतवादी आपले जन्मदाते वडील असल्यासारखे वाटतात ! त्या पेक्षा हे बरे नाही का ?

म्हणजे तुम्ही कबुली देत आहात तर की
१. संघप्रमुख = आपले जन्मदाते वडील.
२. संघप्रमुख =अफजल गुरु, ओसामा बिन लादेन, हाफीज सईद व इतर दहशतवादी

अर्थात काही बाटगे हिंदू व तथाकथित फुरोगामी ह्याला अपवाद आहेत ती गोष्ट निराळी.
<<
हिंदू धर्माचा मालकी हक्क कि़ंवा वहिवाटीचा ठेका तुम्हाला कुणी दिला?
काही शंकराचार्यांकडून मिळालेला ताम्रपट वगैरे?
उठसूट फतवे काढणारे हिंदूं मधले स्वयंघोषित मुल्ले दिसता तुम्ही.

कॉंग्रेसी, कॉंग्रेसी समर्थक व फुरोगामी लोकांना, अफजल गुरु, ओसामा बिन लादेन, हाफीज सईद व इतर दहशतवादी आपले जन्मदाते वडील असल्यासारखे वाटतात !
<<
असे कुणाकुणाला वाटते, याची यादी, प्लस हे असे वाटते याचा काही पुरावा वगैरे?
की हेही नेहेमीप्रमाणे कसल्यातरी "औषधाच्या" अंमलाखाली केलेलं वक्तव्य?

अरेरे,
मग्रुर व असभ्य ट्रोल्सची बाजू सावरायला, साक्षात "ट्रोल्स सम्राटां"ना यावे लागले ? आश्चर्यच आहे !

अनिरुद्ध बाळ,

बाजू सावरली गेलिये हे दिसलं ना? आता अपली लंगडी बाजू सावरून दाखव पाहू?

मग्रुर व असभ्य ट्रोल्सची बाजू सावरायला, साक्षात "ट्रोल्स सम्राटां"ना यावे लागले ? आश्चर्यच आहे ! >>>> तुम्हि मुद्दय्यावर कधी ब्बोलणार ?

राहूल त्यांना माबोशुक्राचार्यांनी मुद्द्यावर कधीच बोलू नये हे सांगितले आहे त्यानुसार चालू आहे मुळात यांच्याकडे मुद्दे असतात कुठे? Wink

नक्की ठरवा रे बाबा! फार कन्फ्युज करता तुम्ही
तेच शुक्राचार्य आहेत की शुक्राचार्यांचा चेला आहे, (खरेतर इकडे एक बेफाट फिट्ट बसणारा शब्द सुचला होता, पण जाऊ दे....उग्गीच लोक पर्सनल अटॅक म्हणून ओरडातील

Pages