संघ आणि लष्कर

Submitted by अँड. हरिदास on 15 February, 2018 - 02:25

mohan-bhagwat.jpg

संघ आणि लष्कर

वेळ पडल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय लष्करापेक्षा कमी दिवसांत सैन्य उभारेल या सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. सरसंघचालकांनी लष्कराच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे विधान करून भारतीय सैन्याचा अवमान केल्याची टीका करत मोहन भागवत यांनी सैन्यदल व शहिदांची माफी मागावी, अशी मागणी विरोधकांनी केली, तर भागवत यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचा खुलासा संघाकडून करण्यात आला. वास्तविक, एकादी संघटना देशाच्या सरंक्षणासाठी तप्तरता दाखवून वेळ पडल्यास सीमेवर लढण्यासाठी जाण्यास तयार असल्याचे वक्तव्य जर त्या संघटनेचा प्रमुख करत असेल, तर देशप्रेमाच्या मुद्दयांवर याला काही फारसे वावगे म्हणण्याचे कारण नाही. अर्थात, आपलं देशप्रेम व्यक्त करत असताना इतरांच्या भावनांना ठेच पोहचणार नाही, याची दक्षता घेणे गरजेचे असते. मात्र सध्या वादग्रस्त वक्तव्य करण्याचं उधाण आलं असून देशातील प्रमुख आणि अत्यंत जबाबदार व्यक्तींच्या मुखातून नाहकचा
वाद आणि गोंधळ निर्माण करणारे शब्द बाहेर पडत आहे. मुजफ्फरपूर मध्ये सरसंघचालकांनी मांडलेलं मतही याच श्रेणीतलं म्हणावे लागेल. काश्मीर खोऱ्यात भारतीय जवान दहशतवाद्यांशी जिकीरीचा लढा देत असताना त्यांच्याशी एकाद्या संघटनेच्या कार्यकर्त्यांची किंव्हा स्वयंसेवकांची तुलना करणे. किंबहुना, आपल्या संघटनेची तयारी लष्करापेक्षा चांगली आहे, अशा आशयाचे वक्तव्य करणे म्हणूनच अनेकांच्या पचनी पडलेलं नाही. त्यामुळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्पष्टीकरण येऊनही या मुद्द्यावरील वाद संपलेला नाही.

रविवारी बिहार मधील मुझफ्फरपुर येथील एका कार्यक्रमात संघाच्या शिस्तीबद्दल बोलत असताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी 'सैनिकांना देशसेवेसाठी तयार करण्यास 6 ते 7 महिने लागतात. देशाला गरज पडली आणि संविधान परवानगी देत असेल तर 3 दिवसांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसवेक सज्ज असतील. असे ते ओघात म्हणा कि मुद्दामहुन म्हणा, बोलून गेले. ज्या संघटनेला देशातील सत्ताधारी पक्षाचे रिमोट कंट्रोल समजल्या जाते, त्या संघटनेचा प्रमुख जर लष्कराबाबत असं वक्तव्य करत असेल तर त्याची दखल घेतली जाणे, त्यावर विवाद होणे साहजिकच. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक संघटना आहे. ती कितीही शिस्तबद्ध असली, तिचा कारभार अगदी आर्मी हेडकॉर्टर सारखा चालत असला, तरी ते काही सैनिक निर्मितीचे प्रशिक्षण केंद्र नाही. त्यामुळे स्वयंसेवकांची सैनिकांशी तुलना करणे थोडेसे अवास्तवाचं. यावर संघाने भागवत यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला असल्याचे स्पष्टीकरण दिले. भागवत संघाची तुलना लष्कराशी करत नव्हते तर सैनिक तयार करण्यासाठी लष्कराला सहा सात महिने लागतात, पण स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिल्या गेले तर ते तीन दिवसात लढायला तयार होतील, असे भागवत यांना म्हणायचे असल्याचा खुलासा संघाने केला आहे. म्हणजे सामान्य माणसाला जर सैनिक व्हायचे असेल तर त्याला सहा ते सात महिने लागतील. आणि संघाचा स्वयंसेवक अवघ्या तीन दिवसात सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करेल. याचाच अर्थ सैन्यामध्ये आणि स्वयंसेवकांमध्ये थोडासाच फरक आहे, असे संघाला म्हणायचे आहे का? कि हि बाब देशाच्या निदर्शनास आणून द्यायची आहे?

राष्ट्र संकटात असेल तर त्याच्या संरक्षणार्थ समोर येणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. पण त्यासाठी लष्कर उभारण्याची परवानगी या देशाचे संविधान कुणालाही देत नाही. त्यामुळे 'घटनात्मक कायदा आणून परवानगी मिळाली तर संघ स्वयंसेवक देशाचे रक्षण करतील, या वाक्याला काही अर्थ उरत नाही. मुळात अंलबजावणीच्या पातळीववर सरसंघचालकांचे विधान म्हणजे अतिशयोक्ती अलंकार आहे. ऐक तर देशाचे संविधान असं काही करायला परवानगी देत नाही, दुसरं म्हणजे आजच्या आधुनिक काळात सीमेवर शत्रूशी दोन हात करण्यासाठी केवळ शिस्त आणि परंपरागत अस्त्र (काठी वैगरे) चालविण्याचं प्रशिक्षण पुरेसं नसतं, तर त्यासाठी आधुनिक शस्त्र चालविण्याचं ज्ञान आणि युद्धकला अवगत असावी लागते. आणि हे प्रशिक्षण तीन दिवसात आत्मसात करणे सहज शक्य वाटत नाही. त्यामुळे सरसंघचालकांचे वक्तव्य कोणत्याच पातळीवर प्रत्यक्षात येणे श्यक्य नाही. अर्थात याची जाण सरसंघचालकांनाही असावी. तरीही असलं अवाजवी विधान करून मोहन भागवत यांनी गोंधळ निर्माण केला आहे. यामागचा त्यांचा हेतू काय ? याचा शोध घेतला गेला पाहिजे. कुठल्याही परिणामांची तमा न बाळगता भारताचे शूर सैनिक सीमांचे रक्षण करत आहेत, दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी छातीवर गोळ्या झेलण्यासही ते मागे पुढे पाहत नाही. त्यामुळे सैनिकांच्या शौर्याबाबत शंका घेणे, किंव्हा त्यांच्या मनोबलाला ठेच पोहचेल असं वक्तव्य कोणत्याच नेत्याकडून करणे अपेक्षित नाही. आज देशात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. संघ हि भाजपाची मातृसंस्था असल्याने सरसंघचालकांचा प्रत्येक शब्द सरकारसाठी प्रमाण ठरू शकतो. सध्या दहशतवादी हल्ल्यांमुळे काश्मीर खोरे धगधगते आहे. या हल्ल्याना पाकिस्तानची फूस असल्याचे सर्वश्रुत आहे. अशा परिस्थितीत सरकारला ठोस भूमिका घेण्यासाठी मार्गदर्शन करणे भागवत यांच्याकडून अपेक्षित असताना सैन्यदलाबाबत वादग्रस्त वक्तव्य करून त्यांना काय साध्य करायचे आहे. किमान देश संरक्षणाच्या मुद्द्यावर तरी पक्ष संघटनांनी राजकारण न करता, आपसातील मतभेद विसरून सैन्याच्या पाठीशी उभे राहायला हवे. मात्र इथे एमआयमचे ओवेसी जवानांच्या बलिदानाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करतात, तर सरसंघचालक अवाजवी विधान करून गोंधळ निर्माण करत आहे. त्यामुळे देश बिकट परिस्थितीचा सामना करत असताना असा नाहकचा वाद निर्माण करणे गरजेचे आहे का?, याचे आत्मचिंतन या नेत्यांनी करण्याची गरज आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो ते मिशी वाले काका असेच काही बाही बोलत असतात, येडे आहेत म्हणायचं आणि सोडून द्यायचं

लोकांनी अशा non इस्श्यू वर बडबड करून शक्ती वाया घालवली कि बाकीच्या मुद्द्यांवर बोलायला वेळ/ शक्ती उरत नाही हे चांगलं कळलंय त्यांना, म्हणून अधून मधून त्या संघटनेतील लोक तोंड सोडतात.

राष्ट्र संकटात असेल तर त्याच्या संरक्षणार्थ समोर येणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. पण त्यासाठी लष्कर उभारण्याची परवानगी या देशाचे संविधान कुणालाही देत नाही.
>> मोहन भागवत यांनी लष्कर उभारण्याची घोषना केली नाही. आणि जर ते देशाच्या संकटात कर्तव्य म्हणून सहभाग घेन्याबाबत बोलत असतील त्याचा एव्हडा इस्शु करण्याची काय गरज.

खरं तर सीमेवर तैनात असलेल्या जवानांच्या जागी संघाच्या कार्यकर्त्यांना पाठवलं पाहिजे आणि हे कार्यकर्ते जर माघारी येऊ लागले तर त्यांना परत सीमेवर पाठवायला लष्कर तैनात करायला हवं

पण सांस्कृतिक संघटनेकडं लष्कर उभारायचे स्किल्स कसे काय आले? की सांस्कृतिक संघटना हे फक्त लागेल तेव्हा सांगण्यासाठी आहे?

देशाच्या संरक्षण मंत्रालयाने मंगळवारी शस्त्रास्त्र खरेदीच्या बहुप्रतिक्षित तब्बल १५ हजार ९३५ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. काश्मीर भागात पाकिस्तानकडून वाढलेल्या कुरापती आणि भारत-चीन सीमेवर वाढलेला चीनचा घुसखोरीचा प्रयत्न लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जाते. मात्र मूबलक प्रमाणात शस्त्रास्त्रे उपलब्ध झाली तरी तिन्ही सैन्यदलांत शतप्रतिशत अधिकारी, जवान नसल्याची माहिती खुद्द संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच लोकसभेत दिली होती. पाहा संरक्षणाच्या तिन्ही दलांमध्ये जवान आणि अधिकाऱ्यांच्या तुटवड्याचे प्रमाण

_20180215_195138.JPG

माझी नागपुरच्या मिशीवाल्या काकांना विनंती आहे की शाखेत असलेले 3 दिवसात तयार होणारे कथित सैन्याला त्वरित भारतीय लष्करात सामिल होण्यास आदेश द्यावे. आणि कथित पराक्रम देशासमोर दाखवण्याची सुवर्ण संधी घ्यावी

विकास वेडा झाला आहे. म्हणुन काहितरी विषय काढायचे हे चालु आहे . मला तर वाटते नीरव मोदीचे प्रकरण दाबण्यासाठीच चालले असावे. टाइमिंग थोडक्यात चुकले.

>>माझी नागपुरच्या मिशीवाल्या काकांना विनंती आहे की शाखेत असलेले 3 दिवसात तयार होणारे कथित सैन्याला त्वरित भारतीय लष्करात सामिल होण्यास आदेश द्यावे. आणि कथित पराक्रम देशासमोर दाखवण्याची सुवर्ण संधी घ्यावी
Lol मिशीतल्या मिशीत हसू आले Happy नशिब विनंती आणि आदेश शब्द जागच्या जागी आहेत Happy
गमतीने लिहितोय बर का, नाहीतर माझ्यावर सैन्य सोडाल एखादे Wink

#अन्वयार्थ

सीमेवर युद्ध चालू झालंय. बंदूका घेतलेले प्रशिक्षित सैन्य लढतंय. तोफगोळे फेकण्याचं प्रशिक्षण घेतलेले सैनिक तोफगोळे फेकत आहेत. वैमानिक विमानं चालवून हल्ला करत आहेत. सगळं सैन्य युद्धात गर्क आहे.

आता ही कामं करायची आहेत ज्याला खडतर प्रशिक्षणाची गरज लागत नाही.

- जखमी सैनिकांना दवाखान्या पर्यंत पोहचवायचं आहे.
- जखमी सैनिकांची शुश्रूषा करायची आहे.
- भटारखान्यात भाज्या कापायच्या, पोळ्या करायच्या आहेत, भात शिजवायचा आहे.
- केलेला स्वयंपाक लढणा-या सैनिकांपर्यंत पोहचवायचा आहे.
- लढणा-या सैनिकांचे कपडे धुवायचे आहेत.
- दारूगोळ्याच्या गाड्या सैन्यापर्यंत पोहचवायच्या आहेत.
-कॅम्पवरचे संडास बाथरूम साफ करायचे आहेत.

अशी बरीचशी कामं आहेत जी करावी लागतात, ती कामं संघाचे शिस्तबद्ध स्वयंसेवक करू शकतात त्या प्रकारचं प्रशिक्षण त्यांना मिळतच असतं. नैसर्गिक आपत्तींच्या वेळी ते वारंवार दिसून येतंय.

आदरणीय मोहन भागवत जे बोलले त्याचा अन्वयार्थ हाच आहे. हे ज्याला समजुन घेण्याची ईच्छा आहे त्याला बरोबर समजतं.

बाकी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे तीन शब्द ऐकले कीं ज्यांना मळमळ होते त्यांनी खुशाल उलट्या काढत बसावं.

अनामिक. शाखेच्या बौद्धिकातून बाहेर या. खरं जग फार वेगळं असतं. आता आपण शंभर वर्षे आधीच्या जगात नाही राहत. संघ राहत असला तरी. भागवत उगाच फुशारक्या मारत होते. त्यांच्या फुशारक्यांचं सोडा पण ह्या सफाई देणार्‍यांची केविलवाणी अवस्था बघवत नाहीये. सोडा ते सांभाळणं.

अहो ते मिशी वाले काका असेच काही बाही बोलत असतात, येडे आहेत म्हणायचं आणि सोडून द्यायचं<<
>>अहो सोडून कस देता येईल.. भारतीय सैन्याच्या क्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण करताय ते.. इकडे सैनिक आपले प्राण पणाला लावून देशाच्या सीमेचे रक्षण करत आहे आणि हे आपण सैन्य दलापेक्षा सरस असल्याच्या फुशारक्या मारत आहे, यामागचा नेमका हेतू इतका सहज सोपा आहे असं वाटत नाही.

मोहन भागवत यांनी लष्कर उभारण्याची घोषना केली नाही. आणि जर ते देशाच्या संकटात कर्तव्य म्हणून सहभाग घेन्याबाबत बोलत असतील त्याचा एव्हडा इस्शु करण्याची काय गरज.<<
>>मग सैन्याशी तुलना करण्याचे कारण काय???लष्कर उभारण्याची घोषणा केली नाही तरी आम्ही लष्करापेक्षा सरस आहोत असाच अर्थ यातून निघत नाही का??

Submitted by अनामिक १ on 15 February, 2018 - 22:37<<
>>ही नवी भानगड...नवा युक्तिवाद...आपण मांडलेल्या सर्व कृत्याला मदत असे म्हणतात.. अस काहीच भागवत यांच्या वक्तव्यात नव्हतं. सैन्याला मदत करण्यासाठी संघ सज्ज असेल असं भागवत यांनी म्हटलं नाही तर लढाईच्या फुशारक्या त्यांनी मारल्या आहेत.

ही सफाई नाही तर सत्यता आहे.

..तेच म्हणतोय मी. तुम्ही देत असलेल्या कारणांत सत्यता असली तरी ती हास्यास्पद आहे.
दोन प्रश्नः
१. संघ अजून पहिल्या महायुद्धाच्या काळात आहे का? वरील कामे करायला आता लष्कराला सामान्य लोकांमधून थेट सैनिक भरतीची गरज नाही.
२. वरची सर्व कामे करायची शिकायला बिगरसंघवाल्याला सहा-सात महिने कशासाठी लागतील बरे? (आम्ही एनसीसीच्या दहा दिवसाच्या लष्करी शिबिरात ही सगळी कामे शिस्तीने व वेगात करायला फक्त तीन दिवसांत शिकलो होतो. )

ज्यांना कधी लष्करी शिस्तीत जगायचा अनुभवच नसेल त्यांना असल्या फुशारक्यांनी मनात गुदगुदल्या होत असतील की बघा आपण कसे सामान्य कद्रू नागरिकांपेक्षा वरचढ आहोत. तेवढ्याच वेळात ते स्वप्नांच्या राज्यात जाऊन लष्कराच्या खांद्याशी खांदा लावून काल्पनिक युद्ध लढून आले, देशभक्ती गाजवून आले. हे मनोरंजन जे आहे तेवढीच भागवतांच्या विधानांची किंमत आहे. फार लोड घेऊ नका.

सगळं सैन्य युद्धात गर्क आहे.
ह्या वाक्याकडे आता लक्ष गेले. फारच म्हणजे फारच हास्यास्पद हो. खरंच एकतर भागवतांना सैन्य म्हणजे काय याची काही कल्पना नाही किंवा तुम्हालाही. वर बोललो तेच. अगदी तेच. "संघस्वयंसेवकाच्या देशभक्तीचे स्वप्नरंजन" म्हणून झकास आहे हो हे सगळं.

देशाच्या संकटात कर्तव्य म्हणून >>>

अनामिका ताई, वर एक तक्ता दिला आहे त्यानुसार लष्करात सैन्याचा तुटवडा भयंकर आहे तुमच्या आदरणीय भागवत यांना सांगून स्वयंसेवक भरती करू शकाल का? देश संकटात आहे म्हणून काळजी

विकास वेडा झाला आहे. म्हणुन काहितरी विषय काढायचे हे चालु आहे . मला तर वाटते नीरव मोदीचे प्रकरण दाबण्यासाठीच चालले असावे. <<
>>राहुल का आपला अंदाज खरा म्हणवा लागेल.. आजच्या एकंदर परिस्थीती त अस वक्तव्य करणे म्हणजे दिशाभूल करून राजकारण करण्याचाच एक प्रकार आहे. जनतेचे लक्ष मूळ मुद्द्यावरून विचलित करण्यासाठीचा हा डाव असल्याची श्यक्यता नाकारता येत नाही

संघाबद्दल जन्मतः डोक्यात पेरलेला द्वेष हा काही जणांना संघाचे कार्य आणि भूमिका समजावून घेण्यात अडथळा निर्माण करतो. म्हणून एका वाक्याचे अनेक आणि आपल्या सोयीचे अर्थ काढले जातात

संघाबद्दल जन्मतः डोक्यात पेरलेला द्वेष
>>> हे जे तुम्ही लिहिलंय ह्याला द्वेष म्हणतात. ह्याचं बाळकडू संघातच मिळतं. बंच ऑफ थॉट्स मधून.

कोणता द्वेष?? राष्ट्रगौरवाच्या बाता मारत संघ थेट सैन्यदलाच्या क्षमतेवर सवाल उठवत असेल तर याला सोयीचा अर्थ काढणे कसे म्हणता येईल?

वरची सर्व कामे करायची शिकायला बिगरसंघवाल्याला सहा-सात महिने कशासाठी लागतील बरे? (आम्ही एनसीसीच्या दहा दिवसाच्या लष्करी शिबिरात ही सगळी कामे शिस्तीने व वेगात करायला फक्त तीन दिवसांत शिकलो होतो. )<<
>> वंदन जी मुळात संघ आणि स्वयंसेवक हे सामान्य माणसांपेक्षा वेगळे आहेत..अगदी लष्कर आणि संघ स्वयंसेवकांमध्ये फार थोडंस अंतर आहे, हे लोकांवर बिंबविण्या साठीचा हा खटाटोप आहे. किंव्हा राहुल का म्हणतात तसे, मूळ मुद्द्यापासून लक्ष भरकटविण्यासाठी काही कारण नसताना हा वाद उकरून काढला असावा.

काश्मीर मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमध्ये पाच मुस्लीम जवान शहीद झाल्याचा दावा करून एमआयएमच्या असदुुद्दीन ओवेसी ने जवानांच्या बलिदानाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. त्यावर बोलण्यासाठी कोणीच पुढे आला नाही.

Pages