मार खाता खाता वाचलो ..

Submitted by ऋन्मेऽऽष on 13 February, 2018 - 15:53

तुम्हा प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ एकदा तरी आली असेलच. जेव्हा तुम्ही मार खाता खाता वाचला असाल.
माझ्या आयुष्यात अश्या वेळा, कैक वेळा आल्या आहेत.
तेच किस्से लिहायला हा धागा ...

या सोमवारी अशीच एक वेळ आली आणि हा धागा सुचला. सुरुवात त्यानेच करतो.

किस्सा १ -

सोमवारची दुपार मी मी म्हणत होती. ऑफिसचा लंच टाईम झाला होता. मी आणि माझा मित्र, आम्हा दोघांकडे जेवणाचा डबा नसल्याने आम्ही ऑफिसच्या कॅंटीनमध्ये उसळी आणि कडधान्ये खाण्याऐवजी, बाहेर काहीतरी हादडायला जायचा प्लान बनवला. एका नव्यानेच उघडलेल्या हॉटेलमधील चिकन बिर्याणीबद्दल ऐकून होतो. मी कुठलाच सणवार पाळत नसल्याने आणि तो फक्त श्रावणी सोमवार पाळणारा असल्याने आमची पावले साहजिकपणे तिथेच वळली. त्याची थोडी जड झाली होती, पण आदल्या दिवशीच्या मच्छीला चिकनचा उतारा चांगला, असे सांगताच ती सुद्धा झपाझप चालू लागली. नुसतीच बिर्याणी खायची आमच्यात पद्धत नसल्याने सोबत चिकन तंदूरी, चिकन दो प्याजा आणि एकेक रुमाली रोटी हादडून झाल्यावर आणि त्यावर दोघांत एक मलाई लस्सी रिचवून झाल्यावर आम्ही बिलाचे पैसे काऊंटरवरच देऊया म्हणून उठलो. कारण टेबलावरच बिलाचे पैसे ठेवले की उगाच पाच दहा रुपये टिप सुद्धा ठेवावी लागते. ती वाचावी हा त्यामागचा हेतू. जेव्हा ऑफिसमधील कोणी महिला सहकर्मचारी सोबत नसतात तेव्हा टिपचे पैसे आम्ही असेच वाचवतो. आणि त्याच वाचवलेल्या पैश्यांचा सदुपयोग करत जेव्हा कोणी महिला सहकर्मचारी सोबत असते तेव्हा डबल टिप ठेवून इम्प्रेशन जमवतो. हा आमचा फंडा.

असो, तर मित्र बिलाची सेटलमेंट करू लागला, आणि मी काऊंटरवरच्या बडीशेपच्या बाटलीला हात घातला. बडीशेप चघळायच्या आधी आठवले, दातांमध्ये मृत चिकनचे बरेच अवशेष फसले आहेत. त्यात आणखी बडीशेप अडकून सारीच सरमिसळ व्हायला नको म्हणून दातांत थोडे कोरीव काम करणे गरजेचे होते. म्हणून मग त्यासाठी काडी शोधू लागलो. सर्वसाधारणपणे मांसाहारी हॉटेलवरच्या काऊंटरवर अश्या काड्या बडीशेपच्या बाटलीसोबतच ठेवल्या असतात. त्यांना टूथपिक असे संबोधतात. पण कधीकधी नशीबही कसे पांडू असते बघा, ईतरवेळी जिथे तिथे काड्या करणार्‍या मला, आज स्वत:लाच एक काडी मिळत नव्हती. मालकालाच विचारून बघूया म्हटले तर एकीकडे तो फोनवर ऑर्डर घेत होता तर दुसरीकडे माझ्या मित्रासोबत बिलाचा हिशोब करत होता. या नादात त्याला माझा प्रश्न क्षुल्लक वाटला असावा जे त्याने माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. किंवा काऊंटरवर बिल सेटल करून टिपचे पैसे वाचवणार्‍या गिर्हाईकांना तिर्हाईतासारखी वागणूक देणे हा त्याचा फंडा असावा.

मग काय, आपलेच दात आणि आपलीच जीभ म्हणत मी काही काळ जीभेने काड्या करायचे प्रयत्न चालू ठेवले. पण जसे प्रयत्न फसू लागले तसे इरीटेशन वाढू लागले. मी पुन्हा ईकडे तिकडे काडी शोधू लागलो. अखेरीस माझी नजर एका रंगीत काडीवर पडली. मी क्षणाचाही विचार न करता ती उचलून दातात घातली. आणि आहा! पहिल्याच फटक्यात दात रिकामा झाला. थूं, करून त्या चिकनच्या कणाला मोक्ष दिला आणि एवढावेळ विसर पडलेल्या आजूबाजुच्या जगाकडे पाहिले. तर तो मालक माझ्यावर आपली रागीट नजर रोखून बघत होता..

"अरेऽऽ क्या करताहे, समजमे नही आता है क्या?" मालक चिडून ओरडला.

"अरे देवाऽऽ.. आता याला काय झाले? मी थू करून उडवलेला कण याच्या अंगावर पडला की काय?" मी विचारात पडलो.

पण प्रकरण वेगळेच होते. मी घाईघाईत तडकाफडकी जी काडी उचलली होती, ती त्याच्या कोण्या परमपूज्य बापू महाराजांसमोर ठेवलेली अगरबत्तीची शिल्लक काडी होती.
ते लक्षात येताच मी ओशाळलो. "सॉरी, गलतीसे मिस्टेक हो गया. ध्यानमे नही आया"

"क्या मिस्टेक हो गया? कुछ अक्कल है के नही?" .. अगदीच झोंबणारा बाण मारला. ईथे सोशलसाईटवर कोणी आपली अक्कल काढली तर त्याला गोडशी स्माईली टाकत पुढे जाणे सोपे असते. पण प्रत्यक्षात कोणी तोंडावर अक्कल काढली की तितकेच अवघड असते.

आता मी सुद्धा चिडलो, "तो क्या करेगा? एक तो चिकन का दुकान खोलके बैठा है, कुछ दात मे फसेगा तो काडी बिडी नही चाहिये क्या? रखनेका ना काऊंटरपे??"

"हा तो मांगनेका ना?"

"किधर मांगनेका? ईधर बाहरीच रखनेका ना? पाच पैसे का कांडी, उसको अंदर तिजोरी मे डालके रखनेका क्या??" .. हिंदीत भांडायला लागलो की माझे शब्द झरझर संपू लागतात. म्हणून मी मदतीसाठी मित्राकडे पाहिले. तर त्याचा चेहरा मला भलताच भेदरलेला दिसला. त्याच्याकडे पाहताच मला परीस्थितीचे वेगाने आकलन होऊ लागले. पाचसहा खूनशी चेहर्‍याचे आडदांड लोकं मोठ्या प्रेमाने आमच्याकडे बघत होते. बस्स, मालकाने छू म्हटले की उचलले आम्हाला. पण मित्राने ऐनवेळी प्रसंगावधान दाखवले. जो हो गया सो हो गया म्हणत खिश्यात हात घालून हातात आली ती पन्नासची नोट काऊंटरवरच्या दानधर्माच्या पेटीत सरकवली आणि झाले गेले विसरून जाऊ म्हणू लागला.

पण त्यावर तो मालक आणखी चिडला. "नही चाहिये तुम्हारा पैसा, निकलो यहासे", असे म्हणत आम्हाला उडवून लावले. पडत्या फळाची आज्ञा घेऊन आम्ही खरेच तिथून निघालो. फक्त दुर्दैवाने त्याने हे म्हणायच्या आधी पन्नासची नोट त्या पेटीत ‘पॉईंट ऑफ नो रिटर्न’ पर्यंत सरकावून झाली होती. पण तरीही ‘सिर सलामत, तो जाने दे नोट पचास’ म्हणत आम्ही खुशीने ऑफिसमध्ये परतलो.

ऑफिसमध्ये पोहोचताच लोकांनी विचारले, "काय मग, कशी वाटली बिर्याणी?"
मी तोंड अगदीच कडू करत म्हटले, "बरोबर नव्हती रे, सारखी दातात अडकत होती." असे म्हणून हवेत थूं करून दाखवले. तर खरेच दाताच्या फटीतून एक चिकनचा तुकडा बाहेर आला. कदाचित झाल्या प्रकाराला घाबरून तो सुद्धा कुठेतरी आत दडून बसला असावा. तरी नशीब तो कोणाच्या अंगावर नाही पडला. नाहीतर पुन्हा मार खाता खाता वाचलो म्हणायची वेळ आली असती Happy

क्रमश:

पुढचे काही जुने पुराणे किस्से उद्या परवा...
तो पर्यंत कोणाला काही लिहायचे असेल तर लिहा..
बहोत बडा कलेजा चाहिये सर.., असे मारखाऊ किस्से लिहायला.. बघा जमतंय का Happy
- धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"ईतरवेळी जिथे तिथे काड्या करणार्‍या मला, आज स्वत:लाच एक काडी मिळत नव्हती." >>>>
भाऊ हलके घ्या. Rofl हा सोशलसाईटचा फायदा आहे.

मी कुठलाच सणवार पाळत नसल्याने आणि तो फक्त श्रावणी सोमवार पाळणारा असल्याने
>>> भाऊ, हे श्रावणी सोमवार टाकले नसतेस, 10 प्रतिक्रिया वाढल्या असत्या. कोणी तरी तुझा श्रावणी सोमवार वाला लेखाची लिंक दिली असती पुरावा म्हणून.. चार पाच लोक तू कसा फेका मारतो , कसे खोटे बोलतो हे बोलून गेले असते.
असो... प्रसंग चांगला आहे ... मी पण एक प्रसंग सांगतो.

आजचीच गोष्ट आहे.. मार नाही पण एमबारास झालो राव.
आज ग्रोसरी शॉप मध्ये ऑफिस मधला कोलीग आणि त्याच्या बरोबर एक पांढरे केस असणारी बाई दिसली.. मी गेलो त्याला हाय केला आणि त्या बाईंच्या पायाला हात लावला.. विचारले कधी आल्या आई.. 5 सेकंड ते दोघे शांत.. तो म्हणे अरे बायको आहे माझी ..
मी काही न बोलता बाहेर पडलो.

च्रप्स Lol

अहो नंद्या, चिकन खाणारयांचे प्रॉब्लेम त्यांनाच ठाऊक. एकदा दातात तो मांसाचा कसू फसला की कसा जीव कासावीस होतो हे ज्याचे त्यालाच ठाऊक ..

कधी आल्या आई......लॉल... धाग्यापेक्षा भारी किस्सा तर हा आहे...खरंच मार खाता खाता वाचला

कधी आल्या आई Lol >> :))

एक्दा कोथरुड बिग बझार समोर रिक्शावाला आधी हो म्हणाला म्हनुन आत बसलो, मुले लहान होती. पत्ता सांगितल्यावर तो नाही म्हणाला.
नवरा उतरेचना. तिथेच बसून राहिला. सर्व रिक्षावाले जमा होऊ लागले. हा तसाच बसलेला आनि चिडुन बोलत होता. मुले, मी बाहेर आलो तरी ऐकेना, मी हाताला धरुन बाहेर काढले, नाहीतर भांडणात मार बसला असता,आमची चूक नसतानाही. Sad

कधी आल्या आई >>> Lol

जबरदस्त किस्सा च्रप्स. हे वाचून कमेंट लिहावीशी वाटली.

मुले, मी बाहेर आलो तरी ऐकेना, मी हाताला धरुन बाहेर काढले,
>>>>

बरेचदा पुरुषांना आपल्या फॅमिलीसोबत असताना माघार घ्यायला आवडत नाही वा कमीपणाचे वाटते. बायकापोरांच्या नजरेत आपली ईज्जत कमी तर होणार नाही ना असे वाटते. या केसमध्ये असे असेलच असे नाही. तसेच हे चूक की बरोबर असेही नाही. पण हे घडते.

आमच्या केसमधे नवरा आणि रिक्षावले यांचे विषेश प्रेमळ संबंध आहेत. Happy त्यामुळे अशा अनेक वेळा (एर्वी अतिशय संयमी असनार्या नवर्याला) शांत करायची वेळ माझ्यावर आली आहे, पण हा खास बाका प्रसंग होता. Happy

बरेचदा पुरुषांना आपल्या फॅमिलीसोबत असताना माघार घ्यायला आवडत नाही वा कमीपणाचे वाटते. << उलट मुलं बरोबर असतांना असे अग्रेसिव्ह प्रसंग टाळण्यासाठी पुरुष माघार घेतात. आणि ते योग्य ही आहे.

ऋन्मेष - वाचता वाचता मार खाल्ला, असे तुमचे काही किस्से असतील तर सांगा ना. वाचायला खूप आवडतील. Wink

एक्दा कोथरुड बिग बझार समोर रिक्शावाला आधी हो म्हणाला म्हनुन आत बसलो, मुले लहान होती. पत्ता सांगितल्यावर तो नाही म्हणाला.>>>>
रिक्शा मिळवण्याची एक सोपी युक्ती. रिक्षावाल्यांना ज्या ठिकाणी जाण्यात रस असतो असे लांबचे ठिकाण सांगावे आणि रिक्षात बसावे आणि प्रवास सुरु करावा. मग थोडे अंतर गेल्यावर आपले इच्छित स्थळ थेटपणे न सांगता (रिक्षा पूर्ण भरली असल्यास) एखाद्याला 'अमुक' ठिकाणी उतरायचे आहे किंवा (रिक्षात एखादी जागा मोकळी असल्यास) 'अमुक' एक ठिकाणावरून एकाला 'pickup' करायचे आहे असे सांगून रिक्षा आपल्या इच्छित स्थळी न्यावी आणि मग सगळ्यांनी उतरावे! जर त्याने वाद घालायला सुरवात केली तर "पैसे हवे तर घे नाहीतर जा उडत" असा पवित्रा घ्यावा. नाहीतर रिक्षाच्या फंदात न पडता सरळ ओला-उबर बुक करावी. (या लोकांची आर्थिक नाकेबंदी केल्याशिवाय हे लोक सुधारणार नाहीत.) परंतु रिक्षावाल्याच्या नकाराला मान देवून दुसरी रिक्षा शोधत बसू नये. कायद्याप्रमाणे रिक्षावाल्यांना 'सबळ' कारणाशिवाय भाडे नाकारण्याचा अधिकार नाही.

च्रप्स यांचा किस्सा गमतीदार आहे प्रसंग डोळ्यासमोर आणला तरी हसू आवरत नाही>>>>
त्यातून तो किस्सा 'valentine day' ला घडला हे विशेष!!!

हे घडले तेव्हा मी कॉलेज मध्ये होतो,
स्थळ पुणे- भरत रंगमंदिर
वेळ- फिरोदिया करंडक कॉलेज ची टीम आत जात असतांची.

नॉर्मली एक दिवशी 3 एकांकिका असतात, एका टीम ची एकांकिका संपली की पहिल्या टीम ला सामाना सकट बाहेर काढतात आणि दुसऱ्या टीम ला त्यांच्या सामाना सकट आत घेतात, ती 15 20 मिनिटे तिकडे अक्षरशः रणधुमाळी असते,

आमच्या कॉलेजची एकांकिका 2 री होती, कॉलेज वरून सगळे सामानाचे पेटारे आणून भरत च्या एन्ट्रान्स मध्ये ठेवले, टीम ला ऑल द बेस्ट करून आम्ही प्रेक्षकांमध्ये बसलो , पहिली एकांकिका सम्पली, हॉल मधले चिअरिंग चिडवणे शिगेला पोचले होते, आणि अचानक आठवले की मेन कॅरॅकटर चा एक महत्वाचा ड्रेपरी पीस माझ्या बॅगेत राहिला आहे.

मला घाम फुटला, मित्राला जागा धरून ठेवायला सांगून दाराकडे जायचा प्रयत्न करू लागलो, प्रचंड गर्दी होती,
सामान आत न्यायच्या जागेवर , आतले बाहेर आणि बाहेरचे आत जाण्यासाठी हातघाई ची लढाई करत होते,

मी अक्षरशः पुढे कोण आहे याची पर्वा न करता घुसत होतो,
आणि समोर एक मुलगी अचानक वळली, आणि अतिशय तिरस्कार भरल्या स्वरात ओरडली, " ए मुला, तू मूर्ख आहेस का? अक्कल नाहीये का तुला?"
माझी ट्यूब पेटवायला 1 सेकंद लागला, त्या घुसघुशीत बहुदा तिला फारच Inappropriate स्पर्श झाला असावा,
तिच्या बरोबर तिचा गृप पण होता, त्यातून ते दुसऱ्या कॉलेज चे, 2 सेकंद गमावली असती तर फटके पडले असते,

मी अक्षरशः हात जोडले, आणि सॉरी म्हंटले, हातात तो ड्रेपरी आयटम होताच, तो पुढे करून " माझी टीम आत जातेय आणि हे त्यांना घ्यायचंय, मला खरच माफ करा "म्हंटले, आणि न थांबता पुढे गेलो,
तिला माझे बोलणे पटले असावे, किंवा गोष्ट वाढवण्यात इंटरेस्ट नसावा, परत जाताना परत त्या गृप ला क्रॉस झालो पण काही बोलली नाही ती.
फट के हात मै आना, चा अनुभव त्या 2 मिनिटात घेतला.

वि.मु.ल = विक्षिप्त मुलगा लफंगा

काढा धागा

Submitted by दत्तू on 15 February, 2018 - 17:07

@ admin आणि वेमा, वरील वैयक्तिक तसेच मानहानीकारक कमेंटची योग्य ती दखल घ्यावी ही विनंती.

maayboli screenshot.jpg

वेळ- फिरोदिया करंडक कॉलेज ची टीम आत जात असतांची.
नॉर्मली एक दिवशी 3 एकांकिका असतात, एका टीम ची एकांकिका संपली की पहिल्या टीम ला सामना सकट बाहेर काढतात आणि दुसऱ्या टीम ला त्यांच्या सामना सकट आत घेतात, ती 15 20 मिनिटे तिकडे अक्षरशः रणधुमाळी असते,
Submitted by सिम्बा on 15 February, 2018 - 18:04

@ सिम्बा, कृपया 'सामना' च्या जागी 'सामाना' करावे. फारच बुचकळ्यात पडलो मी! शिवाय वेळेतही 'करंडक' हा शब्द आहे!

विक्षिप्त मुलगा
सुरवात करून पुन्हा पोस्ट एडीट केल्यावर अॅडमिन यांना कळत नाही अले वाटते का? Rofl
ॠन्म्याला बोलल्यावर तुला इतकी मिर्ची का झोंबली?

मिर्ची जाम झोंबली रे तुला बर्नोल लाव
फेकाड्याचे नाव काय घेतले भक्ताड बोंबलू लागला Wink

बाकी माझ्या कडे पण स्क्रीनशॉट आहे पण तुझ्यासारखी वृत्ती आमची नाही तु तर अगदीच गेलेला निघालास Wink आता बघ पुढे..

आणि हो त्या पोस्टीत "वि.मु.ल." याचा फुल्ल फोर्म दिला आहे मग ते तुझ्यावर कसे गेले बुवा? तु विमुल आहे? हे पण सांग हा
Rofl

Pages