तुकडा हिमालयाचा

Submitted by बेफ़िकीर on 13 February, 2018 - 09:30

कविता - तुकडा हिमालयाचा

हिमागौरीच्या गाली लाली रविकिरणांची पसरे
स्फटिकाचा ओघळ वक्षांवर थिरकत थिरकत उतरे
नाभीवर लवलवती पारोश्या वस्त्यांचे नखरे
उद्या मला दिसतील पुन्हा ती हिमालयाची शिखरे

लक्ष लक्ष डोळ्यांना देतो स्वप्ने नवी हिमालय
आरश्यापरी जगताला दाखवतो छवी हिमालय
गंगा जन्मो म्हणून माथी सोसे रवी हिमालय
गाभ्यामध्ये लाख रहस्ये दडवे कवी हिमालय

माझ्या हृदया त्याग ह्यापुढे मोह खुळा विषयाचा
तुझ्यामुळे संवाद घडो हृदयाशी बस हृदयाचा
अहंकार सोडून पत्करू हमरस्ता विनयाचा
छातीमध्ये जपून ठेवू तुकडा हिमालयाचा
========

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह, सुन्दर. नुअक्तेच काही फोटो पाहिलेत हिमालयाचे आणि जायची इच्छा झाली. हे वाचून ती बळावली. Happy

मस्त! क्या ब्बात!!

जियो!!!

याला म्हणतात बेफ़ी.

हे असं काही करत जा हो. नैतर नको तिथे राज्कार्ण वगय्रे.. उगाच आमची गरीबाची चिडचिड होते, अन आम्ही.. असो.

व्वा!!!!!!
नितांतसुंदर!
बेफ़ी, आपण हिमालय आहात....