पुण्याची मुंबई आता झाली की राव!

Submitted by निमिष_सोनार on 12 February, 2018 - 12:26

आजकाल आपले पुणे सुध्दा..
रात्रभर जागे राहून धडधडत असते!
कारण आपली सुध्दा मुंबई झाल्याचे..
स्वप्न जागेपणी त्याला पडत असते!

पुण्यातील पीएमटी खचाखच गर्दीने भरून..
केविलवाणी धावत रडत असते!
मुंबईतील लोकल ट्रेनचा हात हातात धरून..
ती सुद्धा मैत्रीला जागत असते!

मुंबईतील मराठीपणा हद्दपार झाल्याचं..
दुःख मुंबई पचवत जगत असते!
पुणे सुध्दा तिच्याशी समदुःखी होऊन..
गळ्यात गळा घालून रडत असते!

कशापायी आमच्या मुंबईला ठेवता नाव?
पुण्याची मुंबई आता झाली की राव!
तुमचा आमचा असतो सेम वडा पाव..
दिवसरात्र लोकांची जीवघेणी धावाधाव!

- निमिष सोनार
(आता पुणेकर पण भूतकाळातील मुंबईकर)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबई म्हणजे नुसते आणि नुसते धावपळीचे आयुष्य हा समज कधी पुसला जाणार देवास ठाऊक. मुंबईचे पहिले चित्र नेहमी असेच का रंगवले जाते?

सगळ्या बर्‍यावाईट गोष्टींसकट मुंबई ती मुंबईच.अर्थात पुणेकर,पुण्याबाबत हेच म्हणतील.मार्च-एप्रिल सुरु झाला की मुंबई नकोशी वाटते.

@ ऋन्मेऽऽष : मी तीनेक वर्षे मुंबईत जॉब निमित्ताने राहिलो (अर्थात ठाणे जिल्ह्यात - डोंबिवलीत) आणि लोकलने (जीवघेणी) अप डाऊन केली. पण तीन वर्षात एकही निवांत क्षण मला मुंबईने दिला नाही. म्हणून माझी तशी मुंबई बद्दल इमेज झाली असावी. जे लहानपणापासून मुंबईत जन्मले वाढले शिकले (आणि जॉब निमित्ताने ज्यांना लोकलची अप डाऊन करावी लागली नाही) त्यांच्या मनात मुंबईची वेगळी प्रतिमा असू शकते.

दक्षिण मुंबईत अनेक घरे असणार्‍या आणि नवी मुंबईतल्या MNC तल्या नोकरी साठी प्रवास करणार्‍यांना काय कळणार, इतर मुंबईकरांची धावपळ, गर्दीत घुसमटणारा जीव वगैरे

: मी तीनेक वर्षे मुंबईत जॉब निमित्ताने राहिलो (अर्थात ठाणे जिल्ह्यात - डोंबिवलीत) >>>>>
तुम्ही डोंबिवलीत राहिलात, मुंबईत नाही Happy

दक्षिण मुंबईत अनेक घरे असणार्‍या आणि नवी मुंबईतल्या MNC तल्या नोकरी साठी प्रवास करणार्‍यांना काय कळणार, इतर मुंबईकरांची धावपळ, गर्दीत घुसमटणारा जीव वगैरे >>>>>>>> बरोबर.

हो हो पुण्याची मुंबई झाली आहे, सहमत !
जे लोक रोज पुणे मुंबई अप डाऊन करतात, त्यांच्यावर पण एखादी कविता लिहा प्लिज,
माझ्या नात्यात एक व्यक्ती आहे, ते गेली सोळा वर्षे अप डाऊन करत आहेत.
अनेक लोकांना असे वाटते की कल्याण पासुन मुंबई सुरू होते
या अनेकांमधे मी पण होतो बराच काळ Happy