खुंटी

Submitted by सेन्साय on 12 February, 2018 - 00:33

.

.
पागोटे छत्री दिसेना खुंटीवर
दाराबाहेरून नमस्कार
निरोप सांगे परस्पर
कर्ता पुरुष बाहेर

देवघरातल्या खुंटीवर
सोवळं मुकट्याचा वावर
भक्तिदर्शक विचार
श्रद्धावानाचे हे घर

माजघर मोरीतल्या खुंटीवर
नऊवारी गुंडाळी शंखाकार
नवपरिणितेस मनाधार
कुटुंबवत्सल मायाळू वावर

नातिगोती नि भावबंध
वाहून गेले परस्पर
आधुनिकेतेच्या वाऱ्यावर
खूंटी दिसेना भिंतीवर...
ना मनाच्या ओसरीवर !

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोवळं मुटक्याचा वावर >>>> इथे 'मुकटा' हवं.
नवपरिणितास मनाधार >>>> नवपरिणितेस

बाकी आशय अगदी पोहोचला. छान लिहिली आहे. फक्त शेवटच्या कडव्याला अपवाद असतातच. खुंटी नसली तरी वृत्ती प्रेमळ, आश्वस्त मिळू शकते.

टाइपो लक्षात आणून दिल्याबदल धन्यवाद अश्विनी ताई Happy
सुचवले तसे बदल करतो
प्रतिसादाबद्दल आभार __/\__ आणि शेवटच्या कडव्याला अपवाद घरोघरी लाभोत हीच खरंतर मनापासून इच्छा आहे Happy

मस्त आवडली.
शेवट भारी पण वर म्हटलेय् तसे अपवाद आहेत्. Happy