आता

Submitted by वृन्दा१ on 11 February, 2018 - 13:11

पूर्वी आपल्याला भेटायला कारण लागत नसे
आता न भेटण्यासाठी कारणे शोधावी लागतात
माझ्या साध्याशा हसण्यानं तू फुलून जायचीस
तुझ्या स्वरातल्या बदलानं सुकून जायचा माझा दिवस
साऱ्या गोष्टी दूर निघून गेल्यात नेहमीसाठी
एकदा उडून गेल्यावर न परतणाऱ्या पाखरांसारख्या
आता उरल्या आहेत आपल्याजवळ एकमेकींसाठी
फक्त युक्तिवादाच्या भुंड्या शिड्या....

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कधी कधी तुम्ही अगदी माझ्या मनातलंच बोलुन जाता ...ही प्रतिक्रिया खूपच आवडली.धन्यवाद भुईकमळ आणि कावेरि.