एक पाव

Submitted by अननस on 10 February, 2018 - 17:53

आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब मजूर राहात होता. दिवसभर काही तरी काम मिळवावे, त्यातून जे काही पैसे मिळतील त्यातून आपली गुजराण करावी हा त्याचा दिनक्रम. रोज मजूर काम मिळत असेच असे नाही. त्यामुळे कधी तरी अर्ध पोटीच झोपावे लागत असे. एक दिवस असाच अर्ध पोटी झोपायची वेळ आली. पोटात भूक होती म्हणून झोप नीट लागेना. त्याने विचार केला, देवाला आमची दैना समजत नसेल का? अशा विचारात कधी डुलकी लागली त्याला कळले पण नाही.

दुसर्या दिवशी काम शोधायला तो बाहेर पडला. सुदैवाने एका रस्त्या साठी दगड फोडायचे काम त्याला मिळाले. काल रात्री अर्धपोटी झोपल्याने काम करताना पोटात कावळे कोकलत होते. आजचा दिवस कसा तरी काढू आणि सन्ध्याकाळी जेवण करू असा विचार करत त्याने दिवस ढकलला. सन्ध्याकाळी मजूरी मिळाली. खूशीत गाणी गुणगुणत तो घराकडे निघाला. घरी जाताना चार गुंड तेथे आले. त्याला धरले आणि त्याच्या कडचे सगळे पैसे काढून घेतले. त्यानी दु:खाने आक्रंदत आपल्या नशीबाला आणि दैवाला अनेक शिव्या शाप दिले दु:खाने आणि भूकेने त्याचा पाय पुढे उचलेना. तसाच तो खाली बसला आणि त्याला समोरच्या चर्च बाहेरील येशू ख्रिस्ताची मूर्ती दिसली. येशू ख्रिस्ताच्या शान्त चेहेर्यावर समाजाच्या दु:खाची वेदना होती. डोळ्यामध्ये अपार करूणा होती. येशू ख्रिस्ताची ती करूणामय मूर्ती पाहून मजूर काही काळ आपले दु:ख विसरला. त्याने येशू ख्रिस्तापाशी आपली दु:खमय कहाणी सान्गीतली. त्याने मनाला थोड हलके वाटले. तो क्रूपासिन्धू दीन दुबळ्यान्चा कैवारी आपल्या कडे आलेल्या माणसाला असा थोडाच जाऊ देइल? तेथून एक माणूस आला. त्याच्या हातात दोन पाव होते. त्याने ते या मजूराला दिले आणि म्हणाला, "मी पलिकडच्या खानावळी मध्ये काम करतो. काही पाव उरले होते. ते देऊन टाकतो आहे!!"

मजूराने त्या माणसाचे आणि देवाचे आभार मानले. आता आनंदाने पाव खाणार इतक्यात त्याला समोर रस्त्यावर एक भिकारी झाडाला टेकून बसलेला दिसला. चेहेर्यावरून दोन दिवस उपास घडल्याचे दिसत होते. क्षीण झाला होता पण डोळ्यामध्ये समाधान होते. मजूर त्याच्या पाशी गेला आणि आपल्या पैकी एक पाव त्या भिकार्याला दिला. भिकार्याने पाव घेतला, मजूराचे आभार मानले आणि त्याला म्हणाला, "आज येशूला मला उपाशी झोपू द्यायचे नव्ह्ते !!"

मजूराने उरलेला पाव येशू ख्रिस्ताचा प्रसाद समजून खाल्ला. त्या भिकार्याने त्याला सान्गीतले होते कि, देव आपली काळजी वाहातच असतो. त्याने निश्चय केला कि आपण आपल्यातला एक घास तरी दीन दुबळ्याना द्यायचा. दुसर्याच दिवशी त्या गावात नवीन रस्ता बान्धायच्या कामावर मजूराला नोकरी मिळाली. त्याने मनातल्या मनात त्या भिकार्याचे आणि ख्रिस्ताचे आभार मानले. आता रोज रात्री आपल्याकडचा एक पाव तो गरीबाना देत असे. घरी जाताना, त्याला येशू ख्रिस्ताच्या चेहेर्यावरची वेदना कमी झाल्याचे दिसले!!!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

तर आता सगळेजण येशू ख्रिस्ताचे भक्त बना.
हिंदू धर्माला चालेल. मुळात हिंदू धर्मात ३३ कोटी देव एव्हढ्याचसाठी आहेत की एक देव नाही पावला तर दुसर्‍या देवाच्या पुजार्‍याला पैसे द्यायचे. तसे आपले येशूला देऊन बघा.

झक्की Happy Happy

बाकी अननस, गोष्ट छान आहे. येशूच्या जागी नुसते देव लिहिले असते तरी गोष्ट तितकीच चांगली वाटली असती.

<<येशूच्या जागी नुसते देव लिहिले असते तरी गोष्ट तितकीच चांगली वाटली असती.>>
अनुमोदन! अश्या कित्येक गोष्टी मला माहित आहेत ज्यातून हे स्पष्ट होते की देव एकच आहे, पण श्रद्धा पाहिजे! मग येशू असो, शंकर असो की म्हसोबा असो.

नवीन Submitted by साधना on 11 February, 2018 - 20:58
बाकी अननस, गोष्ट छान आहे. येशूच्या जागी नुसते देव लिहिले असते तरी गोष्ट तितकीच चांगली वाटली असती.
नवीन Submitted by नन्द्या४३ on 11 February, 2018 - 21:28
<<येशूच्या जागी नुसते देव लिहिले असते तरी गोष्ट तितकीच चांगली वाटली असती.>>
अनुमोदन! अश्या कित्येक गोष्टी मला माहित आहेत ज्यातून हे स्पष्ट होते की देव एकच आहे, पण श्रद्धा पाहिजे! मग येशू असो, शंकर असो की म्हसोबा असो.>>>> +१११

येशूच्या जागी साईबाबा करा..
सबका मालिक एक..
कथा जास्तीत जास्त लोकांना आवडेल Happy

बाकी मी नास्तिक आहे. पाव आपल्याला कुठलाही देव देत नाही. तो स्वकष्टाने मिळवावा लागतो. कधीतरी नशीबाने मिळतो. पण रोज रोज नाही. जसे क्रिकेटमध्ये फुलटॉस बॉललाही नशीबाने विकेट मिळते. पण रोज रोज नाही. बरेच लोकं नशीबाला देव समजण्याची चुकी करतात.

असो, देवाच्या कृपेने काही मिळाले अश्या कथा आवडत नाहीत. प्रामाणिक मताबद्दल क्षमस्व. देव मानणारे लोकंही कितीही म्हणत असले की देव एकच आहे, तरीही प्रत्येकाला आपल्या धर्मातील नावच त्याला द्यायला आवडते हे फॅक्ट आहे Happy

बाकी अननस, गोष्ट छान आहे. येशूच्या जागी नुसते देव लिहिले असते तरी गोष्ट तितकीच चांगली वाटली असती.
नवीन Submitted by नन्द्या४३ on 11 February, 2018 - 21:28
छान कथा.

<<येशूच्या जागी नुसते देव लिहिले असते तरी गोष्ट तितकीच चांगली वाटली असती.>>
अनुमोदन! अश्या कित्येक गोष्टी मला माहित आहेत ज्यातून हे स्पष्ट होते की देव एकच आहे, पण श्रद्धा पाहिजे! मग येशू असो, शंकर असो की म्हसोबा असो.>>>>
देव एकच आहे पण तरी या गोष्टीत येशूची चेहर्‍यावर वेदना असलेली चर्च बाहेरची मूर्ती चपखल बसते. हिंदू देवांच्या मूर्तीच्या चेहर्‍यावर आश्वासक भाव असतो, मांगल्य असते मात्र वेदना नसतात, उलट शस्त्र हातात असलेली मूर्ती असेल एक प्रकारचे सामर्थ्य प्रतित होते. या कथेत मजूराचा दान करुन पुण्य मिळवायचा विचार नाहीये तर स्वतःच्या वेदनेचे कुठेतरी येशूच्या चेहर्‍यावरच्या वेदनेशी जोडली जाणे आणि पुढे भिकार्‍याच्या वेदनेशी जोडले जाणे आहे. हे जे दुसर्‍याच्या वेदनेशी नाते आहे ते येशूच्या मूर्तीत दिसून येते.

स्वाती२, येशूच्या चेहरयावरच्या वेदनेच्या भावनेचा एंगल ईथे पर्रफेक्ट ! +७८६

हे यापूर्वीसुद्धा कुठेतरी वाचलेय, तेव्हा ही ईतके आवडले नव्हते अन आजही नाही आवडले.

मी नास्तिक, त्यामुळे देवावर विश्वास नाही पण ह्या धर्माविषयी पक्षी या धर्मातील काही व्यक्तींमुळे राग येतो यांचा, तसे दोन वाईट अनुभव आलेत, अगदी अनोळखी मुलींना सुद्धा ट्रेन , बस मध्ये गोड गोड बोलून धर्म बदलायला सूचित करतात Angry

VB, यांच्यात रागावण्यासारखे काही नाही खरेतर. तुम्ही नास्तिक आहात, त्यामुळे धर्माशी संबंधित कुठलीही गोष्ट न करणे या गोष्टीला तुम्ही टॉप प्रायोरिटी देता.

त्याप्रमाणे वरच्या धर्मात देवाचा प्रचार करणे ह्याला टॉप प्रायोरिटी आहे. जो त्या धर्माचा अनुयायी आहे त्याला देवाचा प्रसार करण्याने आपण जास्त देवाजवळ जातो असे वाटते. ख्रिस्ती धर्म प्रसारकांनी जिथे कुणीही लोक गेले नाहीत अशा जागी जाऊन जीवाची बाजी लाऊन प्रसार केला आहे.

देव जर खरच असेल तर त्याला मी त्याच्यावर विश्वास ठेवते की नाही याने काही फरक पडता कामा नये. मी संकटात असेन तर त्याने धावले पाहिजे. पण येशु फक्त त्यांच्यासाठीच धावतो जे त्याच्यावर विश्वास ठेवतात. हा मुद्दा समोर मांडून मी घरी येणाऱ्या धर्म प्रसारकांना घालवले आहे.

देव जर खरच असेल तर त्याला मी त्याच्यावर विश्वास ठेवते की नाही याने काही फरक पडता कामा नये. मी संकटात असेन तर त्याने धावले पाहिजे.
>>>>

या वाक्यात एक गंमत आहे.
"देव असला तर" असे तुम्ही बोलत आहात म्हणजे त्याच्या अस्तित्वाबद्दल तुम्हाला खात्री नाही.
त्याचवेळी तो असला तर त्याचे वर्तन अमुकच असले पाहिजे असे त्याला डिफाईन सुद्धा करत आहात.
कदाचित देव असेलही आणि तो आपल्यावर विश्वास ठेवणारयांचीच मदत करणारा असेल - हे देखील शक्य आहेच Happy

किंबहुना बरेच लोकांचा या कन्सेप्टवरच ठाम विश्वास असतो आणि म्हणूनच तर लोकं आपापल्याच धर्माच्या देवाची पूजा करतात.
काही लोकं ईतर धर्मीयांच्या देवाच्याही पाया पडणारे असतात. पण ते त्यांच्या धार्मिक भावनांचा आदर करणे यात मोडते. भक्ती मात्र आपल्याच देवाची.
तसेच एकाच धर्मातही विविध देव असतात. आणि कुठल्याही आस्तिकाची प्रत्येक देवावरची भक्ती समसमान नसते. एखाद्या देवाला ईतरांपेक्षा जास्त मानले जाते.
तसेच एक कुलदैवत असते. त्या त्या कुळाची देवता. प्रत्येकाची वेगळी असते.
अशी बरीच उदाहरणे देता येतील. त्यामुळे हा युक्तीवाद धर्मप्रचारक मोडीत काढू शकतात.
तुम्ही आमच्या धर्मात या. आमचा देव पॉवरफुल आहे किंवा नवसाला पावणारा आहे हे लॉजिक ते नक्कीच लावू शकतात. लालबागच्या राजाला लागणारया लांबलचक रांगा आपण सर्व पाहतोच. ईथे तर देवही एकच, गणपती. पण त्याची कृपादृष्टीही मंडळाप्रमाणे बदलते..

VB
जोपर्यंत कोणी कोणाला फोर्स करत नाही तोपर्यंत यात गैर काही नाही. क्रेडीट कार्ड कंपन्यांचे फोन येतात त्याचप्रमाणे याला बघा. उलट तुम्ही नास्तिक आहात तर खरे म्हणजे तुम्हाला या प्रकाराकडे अश्या नजरेने बघायला सोपे गेले पाहिजे. जे आस्तिक असतील त्यांना अवघड जाऊ शकते..

उलट तुम्ही नास्तिक आहात तर खरे म्हणजे तुम्हाला या प्रकाराकडे अश्या नजरेने बघायला सोपे गेले पाहिजे. जे आस्तिक असतील त्यांना अवघड जाऊ शकते.. >>> मला स्वतःला या प्रकाराने काही फरक पडत नाही, पण दोन तीन शाळेकरू मुलींना पकडून त्यांना यासाठी प्रवृत्त करण्याची वृत्ती, तिचा तिटकारा आला, तेव्हा खरेतर देव, आस्तिक नास्तिक, दुनियादारी ईतकीशी माहीतही नसते ना निर्णय घेण्याचे स्वातंत्र असते त्या वयात शक्यतो सगळे निर्णय, त्यांची जबाबदारी त्यांच्या पालकांवर असते
मग तिथे या असल्या मार्केटिंग ने नक्की काय साध्य करायचे असते हा प्रश्न पडला

आपला देव श्रेष्ठ हे मनावर बिंबवलेले असते, त्यांना नकळत्या वयापासून. आपला देव न मानणारे लोक काहीतरी चांगल्या गोष्टींना मुकताहेत असे त्यांना वाटत राहते. त्यामुळे अगदी चांगली , तुमच्या अमच्यासारखी साधारण माणसेही दुसर्यांना आमचा देव चांगला हे सांगत राहतात. आमच्या सोसायटीचे सेक्रेटरी प्रोटेस्टंट आहेत. माझी मुलगी सोसायटीचा चेक द्यायला गेली की त्या दोन चार मिनिटात सुद्धा ते देवावद्दल तिच्याशी बोलतात. जनरल बॉडीच्या व्हत्सापवर दैवी मेसेज टाकायचे, ते आम्ही बंद केले, इथे फक्त कामाचेच मेसेज हवे सांगून. बाकी माणूस खूपच चांगला.

ज्यांनी देवकामाला वाहून घेतलंय अश्याना तर खूप वाईट वाटते, येशु तुमचे सगळे त्रास स्वतःच्या गळ्यात घालून घ्यायला तयार आहे, आणि तुम्ही हो म्हणत नाही याचे. हे सगळे चांगलेच लोक असतात. देवाचे काम करून आपण देवाच्या जवळ जातो असे त्यांना वाटते.

छान कथा Happy
जैसी व्यष्टि तैसी समष्टि !
त्या गरीब मजदूर माणसाची भावसार्द दृष्टी व कृपाळु अन्तःकरण जेव्हा आपल्यापेक्षा अधिक गरजू माणसाचे दुःख ओळखतो तेव्हाच तो येशु वा तत्सम वैयक्तिक धर्म पंथा प्रमाणे आपल्या दैवताचा आपल्या प्रति असलेला करुणभाव ओळखु शकतो.

संत गाडगे बाबा कोणाला झाड़ू घेतलेला वेडा फकीर वाटेल पण जी व्यक्ति आपल्या कुटुंबा व्यतिरिक्त इतर माणसांना सुद्धा तेवढेच ममत्व देवू शकते त्या व्यक्तिस गाडगे बाबांचा समाजा प्रति खरा भाव ओळखता येईल.

येथे सर्व काही भाव सापेक्ष आहे आणि कायम असते.

कोणाला आदिमाता महाकालिचा अतिगडद काळा रंग भीतिदायक दिसेल तर कोणाला हाच काळा रंग अंधारलेल्या रात्रीतसुद्धा आपले दैवत त्या रात्रीच्या काळोखापेक्षाही अधिक काळे असल्याने मनाला धीर देणारे आश्वासक दर्शन देणारे ठरेल.

ह्या कथानकात मजदूर कठोर श्रम करतोय म्हणजे कर्मवादाचा सिद्धांतही पाळतोय आणि देवावर / देवाने त्याच्या आयुष्यात ज्या घडामोडी निश्चित केल्यात त्यावरही विश्वास ठेवतोय म्हणजे दैववादसुद्धा पाळतोय. पण हां धार्मिक/आस्तिकपणा अंधविश्वास नसलेला आहे. नाहीतर तो असेही म्हणू शकतो की असेल माझा हरि तर देईल खाटल्यावरी !

मॉरल ऑफ द स्टोरी - देवाची कृपा नसेल तर मेहनत व्यर्थ आहे.

VB, येस, शाळकरी मुलांना हे डोस पाजणे चूक आहे.

मला तर आपल्या श्रद्धा आपल्या पोरांवर लादणारे पालकही पटत नाहीत. यावर माझे अनुभव आणि माझ्या आजूबाजूला बघत असलेले अनुभव यावर वेगळा लेख होईल. ईथे ते थोडे अवांतर होईल.