कोण मी अन् कोण तू..

Submitted by गवंडी ललिता on 3 February, 2018 - 05:43

कोण मी अन् कोण तू..

कोण मी अन् कोण तू
का विचारतेस प्रिये मला
कोण तू अन् कोण तू ?
कसे सांगू आज तुला
अंतरीच्या माझ्या खुणा !
तू श्वासातील श्वास माझा
मनातला भाव माझा
या जगण्यातला अर्थ तू
अन् जीवनाचा सार माझा
कोण मी अन् कोण तू
का विचारतेस प्रिये मला
कोण तू अन् कोण तू ?
ओल्या मातीचा गंध तू
अन् कमळावरचे बिंदू तू
रातराणीचा सुंगंध अन् नभातील चंद्र तू
या डोळ्याची साठवण तू अन् आठवणीची ओंजळ तू
सुरातल्या बासरीचा स्वर अन् जीवनाची लय तू

कोण मी अन् कोण तू
का विचारतेस प्रिये मला
कोण तू अन् कोण तू ?

-ललिता गवंडी

Group content visibility: 
Use group defaults