खुदा का बंदा....

Submitted by प्रकाश सरवणकर on 3 February, 2018 - 03:01

खुदा का बंदा....

नसीर कब्रस्तानाच्या दरवाज्याजवळ उभा राहून फुलवाल्याशी तावातावाने भांडत होता. त्याचा एक चुलतभाऊ पैगंबतवासी झाला होता. त्याची प्रेतयात्रा लवकरच कब्रस्तानात पोचणार होती. त्याने मोबाईल वरूनच प्रेतावर घालायला फुलांच्या चादरीची ऑर्डर दिली होती. उशीर झाल्यामुळे तो प्रेतयात्रेत सामील न होता थेट कब्रस्तानात पोचला होता. प्रेतयात्रा कोणत्याही वेळी येऊन पोचणार होती, पण अजून त्याने ऑर्डर केलेली फुलांची चादर घेऊन फुलवाला आला नव्हता...

संध्याकाळची वेळ होती... कब्रस्तानात तसं फारसं कुणीच नव्हतं.. मोबाईल वर बोलताना नसीर च्या लक्षात आलं की एक लहान मुलगा मुसमुसत एका कबरीच्या दिशेने जातोय.. त्याची चादर ही यायची होती आणि अजून प्रेतयात्रा ही पोचली नव्हती, त्यामुळे कुतूहल म्हणून नसीर हलकेच त्या मुलाच्या मागून निघाला.. तो मुलगा एका विशिष्ट कबरीपाशी बसला... रडत रडत आपलं म्हणणं सांगू लागला... " अब्बू,
आप किधर हो अब्बू.. कल स्कूल मे फंक्शन है। मेरे पास ढंग के कपडे नही है, ना ही मा के पास मेरी फीस भरने के लिये कोई पैसा है। क्यू गये अब्बू हमे छोडकर... आ जाओ वापस अब्बू.."
तो मुलगा कबरीवर डोकं ठेवून अश्रू ढाळू लागला...

नसीर बाजूला उभा राहून हे ऐकत होता. त्याचं हृदय भरून आलं.. तो हलकेच पुढे झाला.. त्याने त्या छोटू च्या मस्तकावर हलकेच थोपटले.. त्या मुलाने अश्रूने डबडबलेले डोळे उघडून, डोके थोडेसे उचलून नसीरकडे पाहिले..

"क्या हुआ बेटा? क्यू रो रहे हो? क्या नाम है आपका? कौन हे आपकें अब्बू?"

" अन्वर हु चाचा जी.. मन्सूर खान का बेटा..."

" क्या? "

जसा काही ४४० व्होल्ट चा झटका बसल्यासारखा नसीर उडाला..

"क्या ? मन्सूर खान? उसका बेटा? मन्सूर कभी अल्लाको प्यारा हो गया? या खुदा..."

" छ माह हो गये चाचा.."

काही न बोलता नसीर ने त्याला जवळ घेतलं.. त्याच्या डोक्यावर प्रेमाने ओठ टेकले.. मोबाईल काढून फुलवाल्याला ऑर्डर रद्द करायला सांगितली, आणि अन्वर च्या हाताला धरून तो म्हणाला..
" चल बेटा, मुझे आपकें अम्मी से मिलना है।"
दोघेही कब्रस्तानातून बाहेर पडले आणि अन्वर च्या घराच्या दिशेने निघाले..

**********

छोट्या अन्वर च्या हाताला धरून चालणाऱ्या नसीर च्या मनात भावनांचा कल्लोळ उठला होता.. बाहेर अंधार दाटत असला तरीही, त्याला त्याचा सगळा भूतकाळ लख्ख आठवत होता..

अन्वर चा अब्बू... मन्सूर खान.. एक पाक मुसलमान माणूस... खुदा चा बंदा.. नेहमी दुसऱ्याला जमेल तशी मदत करणारा माणूस..
नसीर ला आठवत होतं.. नसीर ने कसं बसं आय टी इंजिनीअरिंग केलं होतं... इथे नोकरी मिळणं मुश्किल होत होतं.. अशा वेळी त्याला एक संधी मिळाली, अमेरीकेत सिलिकॉन व्हॅली त एका कंपनीत जॉईन व्हायचं होतं.. पासपोर्ट, व्हिसा आणि एअर टिकेट ह्या सगळ्या गोष्टींसाठी पैसे कसे जमवावे ह्या विवंचनेत नसीर होता.. नसीर च्या अम्मी त्याच्या शिक्षणासाठी झालेल्या खर्चातून अजून बाहेर आली नव्हती.. अशा वेळी त्याच्या मदतीला धावून आला तो मन्सूर...
मन्सूर ने स्वतःच्या पदराला खार लावून त्याला मदत केली, त्यामुळे नसीर वेळेत अमेरिकेत जाऊ शकला.. नंतर त्याने मन्सूर चे पैसे परत पाठवूनही दिले.. नंतर तो त्याच्या व्यापात मग्न झाला..
आय टी क्षेत्रातल्या माणसांना जीवन तसं उरतच नाही, त्यामुळे तिथल्या चक्रात तो गुरफटून गेला..
बरीच वर्षे नंतर त्याचं भारतात येणही झालं नाही..
त्यामुळेच सुरुवातीला असलेला सम्पर्क पण कमी होत गेला..
आताही नसीर आला होता तो त्याची अम्मी खुप आजारी होती, आणि तिची परिस्थिती खूपच वाईट झाली होती...
नसीर भारतात येऊन दोनच दिवस झाले होते, त्यामुळे त्याला मन्सूर बद्दल कोणालाच काही विचारता आलं नव्हतं किंवा त्याला कोणी बोललं नव्हतं..
अन्वरशी चालता चालता थोडं बोलल्यावर त्याच्या लक्षात आलं की मन्सूर ने त्याच्या आयुष्यात खूप लोकांना मदत केली... पण त्याच्या अचानक जाण्याने सगळी परिस्थिती बदलून गेली होती..
मन्सूर ने ज्यांना ज्यांना मदत केली होती, त्या पैकी एक दोघे जण सोडले तर कोणीच अन्वर किंवा त्याच्या अम्मी ला मदत करायला पुढे आलं नाही.
त्यामुळे साठवणीचं पाणी संपत आल्यावर अन्वर च्या पालन पोषणासाठी त्याच्या अम्मीला एक हॉस्पिटलमध्ये आया ची नोकरी पकडावी लागली होती. त्यांचं कसंबसं भागत होतं.. पण वाढत्या खर्चाचं काय करावं हा तर प्रश्नच असे तिच्यापुढे..

*******

अन्वर ला घेऊन नसीर त्यांच्या घरी पोचला..
अन्वर सोबत नसीर ला पाहून त्याची अम्मी थोडी चकित झाली पण तिला मन्सूर ची आठवण आली आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले...

नसीर पुढे झाला..
" रोना मत भाभी.. अन्वर ने सब बताया है मुझे..
मन्सूर तो खुदा का बंदा था... उसके बहोत अहेसान है मुझपर.. आज मैं जो कुछ भी हूं, सिर्फ उसकी बदौलत ही हूं.. "

" जाने दो, भाई साब... ओ अच्छाई उनके साथ चली गयी, अब किसको पडी है, मन्सूर की बेवा और बच्चा कैसे जी रहे हैं"

" भाभी, आप अब कुछ भी चिंता मत करो, अब मुझे मन्सूर के अहेसानोंका कर्जा चुकाना बाकी है।
अब आपको अन्वर की चिंता करने की कोई जरुरत नही है। मन्सूर ने मेरी जिंदगी संवारी है। अब मेरी बारी है, मैं अन्वर की जिंदगी संवारना चाहता हु। इसके आगे उसका जो भी खर्चा होगा, वो पढ लिख कर जबतक अपने पैरोंपे खडा नही हो जाता, मैं उसकी देखभाल करुंगा।
लेकींन भाभी, आपकें स्वाभिमान को मैं ठेस पहूंचाना नही चाहता हु। आप अपनी नौकरी किजीए। आप अपना खर्चा खुद किजीए। आपको किसी चीझ की जरूरत पडे तो आप बेझिझक कह सकते है। खुदाका दिया... नही.. नही... मन्सूर का, आपकें शौहर का दिया हुआ सबकुछ है मेरे पास..."

" भाईजान, आप तो खुदा का बंदा बनकर हमारे सामने आये है.. बेशक मेरे शौहर ने कुछ नेक काम किये है, लेकींन उसे याद रख कर इतना सबकुछ जताना आप जैसा कोई खुदा का बंदाही कर सकता है, आपकी तहेदिल से शुक्रिया... इस बच्चेकी चिंता अब आपने मीटा दी।"

अन्वर च्या अम्मी ला अश्रू अनावर झाले होते... आपल्या पती ने केलेल्या चांगल्या कामांचा अभिमान आणि नसीरने ठेवलेली त्याची जाणीव यांचा मिलाफ त्या आसवांमध्ये होता..
नसीर चे डोळेही भरून आले होते आणि छोटा अन्वर त्या दोघांकडेही विस्मयाने बघत होता.....

© प्रकाश सरवणकर ९८६९२८०६६०

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

छान