स्ववंचना ..

Submitted by सेन्साय on 2 February, 2018 - 11:54

स्ववंचना
~~~~~

.

.

ईश्वरी देणगी मनाच्या भावना
प्रेमाची अभिव्यक्ति त्यातीलच एक ना !
निसर्ग शिकवतो प्रेम करायला
निस्पृहतेने व्यक्त होताना
अस्पर्श सहवास जीवलगाला
का उगीच येथे मग स्ववंचना
अनामिक नात्याची अवहेलना !

मन उलगड़ते तिन्ही पातळीवर
भौतिकतेच्याही सीमा ओलांडून..
वेलीनं जसं कळीस जपावं
कळीनं पानांमागे लपावं
पानांनी वेलीस पोसावं
मुळांनी जमीनीस पकडावं.
नातं अबोल प्रितीचं सुद्धा असंच
एकमेकांशी कायम घट्ट असावं.
पण ......!

तुझ्यासोबत वेचलेले अनंत क्षण
जरी माझ्याच अस्तित्वाचा भाग झालेत
अखेरचा क्षण मात्र हा एकटा आहे
तो क्षण गेला ... ती परिस्थिती बदलली
स्वप्नं सर्व भुतकाळात गड़प झाली
त्यांना परत जीवंत करण्याचा प्रयत्न
निर्रथक आणि भेकड़ आहे ... कारण
"काल" रात्रीच्या पोटात गड़प झालाय
आणि "आज" उगवला आहे !

―अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users