कहर

Submitted by महेश भालेराव on 1 February, 2018 - 07:01

मी लाविल्या रोपास आला बहर जेंव्हा
कळले ना मलाही झाला कहर केंव्हा ?

मनी साठवून होते मी फुल अत्तराचे
पसरुन गंध त्याचा झाला जहर केंव्हा ?

डोळ्यात साठविली प्रत्येक वाढ त्याची
मग पापणीतूनी तो सुटला प्रहर केंव्हा ?

पदरातल्या धाग्यांचा कळला खुजेपणा
उधळून लाज सारी गेली लहर जेंव्हा ?

वेगळ्या रूपाची बस राहिली बढाई
फुलानीच रंग विकला आली खबर जेंव्हा ..

महेश बाळकृष्ण भालेराव

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह् वा वा... क्या बात है! एकावर एक सरस खयाल!
वृत्त तपासून पहावे लागेल मात्र! काफिया,रदीफ ई. पुन्हा एकवार वाचून पहाल तर उत्तम! पुलेशु!
>>>पदरातल्या धाग्यांचा कळला खुजेपणा
उधळून लाज सारी गेली लहर जेंव्हा ?>>>खूप आवडल्या या ओळी!