तू

Submitted by सुप्रिया जाधव. on 24 January, 2018 - 13:34

तू

वृत्त : उद्धव

तू विश्वाचा निर्माता
तुज भवती दुनिया फिरते
तू तिमीरहारक तरिही
तुज समीप येता जळते

तू अथांग, ठाव न ज्याचा
तरि सरिता तुझिया मागे
तू, तुझ्यामुळे ऋतुचक्रे
ना तुझ्यात तृष्णा भागे

उत्तुंग तुझी रे व्याप्ती
ती अगम्य गूढ निळाई
तव कवेत मावे पृथ्वी
परि अंतर कायम ठेवी

ना रंग गंध तिज अपुला
अस्तित्व स्वतःचे नाही
चिडताच वावटळ होते
तिज वाचून जगणे नाही

ती ती आहे तू तू रे !
दो ध्रूवांवरचे तारे
तारांगण भिन्न असू दे
वलयांकित लखलखणारे

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नितांतसुंदर!!! Happy

सुप्रियाताई, आणखी एक कडवे वाढवून त्यामध्ये हवेचा स्वतंत्र उल्लेख केल्यास पंचमहाभूतांचं वर्णन पुर्ण होईल !