प्रायव्हेट ऑफिस आणि सरकारी कार्यालय !

Submitted by ऋन्मेऽऽष on 23 January, 2018 - 12:43

गेले तेरा महिने मी ज्या जागेवर बसत आहे तिथे माझ्या शेजारीच एक पोपडे निघालेली आणि रंग उडालेली भिंत आहे. मला तसा तिचा काही त्रास नाही, कारण ती माझ्या थेट नजरेस पडत नाही. फक्त माझ्या जागेचा शो जातो ईतकेच. दुरून कोणी पाहिले की मी छानपैकी स्वदेशच्या शाहरूखसारखा फॉर्मल आणि टापटीप कपड्यात बसलो असतो. पण ती भिंत माझ्या सौंदर्याची पार्श्वभूमी खराब करत असते. मला दसरा दिवाळीच्या मुहुर्तावर एखादा फोटो काढायचा झाल्यास उठून दुसर्‍याच्या जागेवर जावे लागते. आणि एकदोनदा केसांवर काही पांढरे पांढरे पडले होते. म्हटलं तर हाच तुरळक त्रास. तरी लोकांच्या आग्रहास्तव मी काही वेळा एच आर आणि मॅनेजमेंटकडे तक्रार केली. चौथ्या तक्रारीनंतर एकदा येऊन त्या भिंतीचे फोटो काढून गेले, ईतकेच काय ते त्यांनी केले. पुढे ते फोटो फेसबूकवर टाकले की व्हॉटसपवर शेअर केले याची कल्पना नाही. बाकी ती जागा माझ्या कामाच्या आणि जॉब प्रोफाईलच्या दृष्टीने मोक्याची आहे म्हणून मला दिली गेली आहे. कारण तिथून मी माझ्या टीमशी योग्य प्रकारे संपर्क आणि समन्वय साधू शकतो. हे मलाही सोयीचे आहे. म्हणून मी आजवर मुन्नाभाई सारखे "Sir what is the procedure to change the room?" म्हणून अर्ज टाकला नाहीये.

पण अशीच एक तक्रार माझ्या एका महिला सहकर्मचारी पद्मिनीने नोंदवून झाली आहे. तिच्या शेजारच्या भिंती्ला चक्क एक क्रॅक, मराठीत तडा गेला आहे. तुलनेत तिचे सौंदर्य, म्हणजे त्या भिंतीचे सौंदर्य माझ्या शेजारच्या भिंतीईतके खराब झालेले नाही. पण लोकं तिला गंमतीने ती भिंत एक दिवस तुझ्या डोक्यावर कोसळणार आणि तुला कायमची सुट्टी मिळणार असे म्हणून घाबरवत असतात. जेव्हा माझ्या भिंतीचे फोटो काढण्यात आलेले तेव्हा तिच्याही भिंतीसमोर काही सेल्फी काढले गेलेले. पण मॅनेजमेंटला त्या भिंतीतही काही धोकादायक वाटले नसल्याने त्यावरही आजवर काही कारवाई झाली नाही. बहुधा त्या फटींतून पिंपळपाने उगवायची वाट बघत असावेत.

असो, हा झाला भूतकाळ !

पण अखेर आमचा तेरा महिन्यांचा खंडरवास संपला. आमचा पडका वाडा अचानक गेल्या रविवारी शनिवारवाडा झाला. सोमवारी सकाळी आम्ही तासभर वेड्यासारखे स्वत:चीच जागा शोधत होतो ईतका त्या भिंतीचा कायापालट करून टाकला. जेव्हा समजले तेव्हा ईतका आनंद झाला, काय सांगू! ईतका आनंद तर आमची चाळ पाडून टोलेजंग ईमारत उभी राहिली तेव्हाही झाला नव्हता.

हे असे का? याचा विचार करेस्तोवर आणि काही सुचेस्तोवर दहा वाजता ईनबॉक्सवर मेल येऊन थडकला....
पुढच्या आठवड्यात आमच्या ऑफिसमध्ये कंपनीचे ग्लोबल सीईओ येणार आहेत !

म्हणजे एखादे मंत्री संत्री येणार म्हणून रस्त्याची डागडूजी करा. एखादे पंतप्रधान येणार म्हणून परीसराची स्वच्छता पाळा. एखादे मोठे शैक्षणिक अधिकारी येणार म्हणून शाळेची डागडूजी करा...
आधी जेवढा आनंद झाला होता, तेवढाच आता त्रास झाला.
आम्ही अश्या परीस्थितीत राहत होतो, काम करत होतो त्याचे कोणाला काहीच पडले नव्हते, पण एक दिवस येणार्‍या साहेबांच्या डोळ्यांना छान दिसावे म्हणून तातडीने उपाययोजना केली गेली.

फक्त म्हणायला एमेनसी, पण एखादे सरकारी कार्यालय आणि खाजगी कंपनी यांची या भारतात जवळपास सारखीच अवस्था आहे. भारतीय कर्मचारी कोणत्या परीस्थितीत काम करत आहेत. याचे मॅनेजमेंटला काहीही पडले नसते. तसेही ईंडियन्स आर चीप लेबर. यांना फुकटात किंवा निम्म्या किंमतीत जेवण वा सकाळचा नाश्ता दिला तरी हे खुश.. मग कश्याला कोणाला काय पडले असेल.. खाजगी असो वा सरकारी, ईथे तुम्ही मॅनेजमेंटसमोर आवाज उठवू शकत नाहीत. ज्या देशात लोकशाही असून जिथे लोकांची चालत नाही, तिथे कंपनीत कशी चालणार...

असो, नाव बदलून लिहिण्याचा एक फायदा तर आहे, ईथे हे बिनधास्त शेअर करू शकतो........

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एमेन्सीत काम करुनही तुमचं इंग्रजी बेतास बात आहे. इतर अनेक वाईट सवयी तुम्हाला आहेत. ऑफिस वेळेत तुम्ही मायबोलीवर प्रचंड टाईमपास करता. तरीही तुमची कंपनी अगदी स्टँडर्ड असावी अशी तुमची अपेक्षा?

इतकीच परफेक्ट कंपनी असेल तर तिथे तुमच्याऐवजी चार पैसे जादा खर्च करुन एखादा परफेक्ट एम्प्लॉयी भरेल की! कंपनीला तुमच्यासारखा एम्प्लॉयी चालतो म्हटल्यावर तुम्हीही पडका वाडा चालवून घ्या की. बाकी गोर्‍या साहेबासमोर कंपनी डागडूजी करुन बिल्डींग ऑलवेल असल्याचं नाटक करत असेल तर ते दोन दिवस तुम्हीदेखील एफिशियंट असल्याचं नाटक करा की राव. तुम्हाला कोणी रोखलंय.

नवीन Submitted by बिपीन चन्द्र हर... on 23 January, 2018 - 23:35>>>>
एखाद्यावर आपण डायरेक्ट असले आरोप कसे करू शकतो,नाही का?
ऋ ऑलटाईम एफिशिएंट नसेल कशावरून?

खाजगी असो वा सरकारी, ईथे तुम्ही मॅनेजमेंटसमोर आवाज उठवू शकत नाहीत.>>>exactly!
बाकी मागे मनमोहन अंकलनी म्हटलं होतं, 'चलता है प्रवृत्तीमुळे प्रगती खुंटली' हेसुद्धा तसंच काहीसं..
खरंतर सरकारी बाबूशाहीला ज्यांनी (!) वर्षानुवर्षे 'चलता है' ची सवय लावली त्यांच्यामुळे ही सवय जनमानसात इतकी खोलवर भिनलीय की तिचं काहीच वाटेनासं झालंय.. सरकारी काय न् खाजगी काय चालायचंच!
पण आपल्या स्वत:च्या अधिकार क्षेत्रातील गोष्टींबाबत मात्र ही 'चलता है' ची वृत्ती सोडून द्यायला हवी.

एमेन्सीत काम करुनही तुमचं इंग्रजी बेतास बात आहे.
>>>>>
हो हे खरेय. पण टेक्निकली मी खूप स्ट्राँग आहे. तिथे मला पर्याय नाही.

इतर अनेक वाईट सवयी तुम्हाला आहेत.
>>>
जुगार, शिवीगाळ, मारामारी, चोरी करणे वगैरे माझ्या वाईट सवयी लेखमालेच्या अनुषंगाने बोलत आहात का? त्यातच लिहिलेय, त्यातील कित्येक सवयी मी केव्हाच सोडून दिल्या आहेत. याऊपर त्यांचा माझ्या एफिशिअन्सी वर काही फरक पडत नाही.

ऑफिस वेळेत तुम्ही मायबोलीवर प्रचंड टाईमपास करता.
>>>
केव्हा?
मी ईथे रात्री ऑनलाईन असतो. दिवसा सकाळी ट्रेनच्या प्रवासात एखादी पोस्ट, फार तर दुपारी लंचमध्ये एखादी पोस्ट. . तुम्हाला माझ्या जॉब प्रोफाईलची कल्पना नाही. ऑफिसमध्ये असताना मला खुर्चीवर बूड टेकवायला उसंत मिळत नाही. दहा दिशांनी दहा जण मला हाक मारत असतात आणि मला याच्या त्याच्या जागेवर जाऊन त्यांच्या क्वेरी सोडवाव्या लागतात. रोज संध्याकाळी गर्लफ्रेंडच्या शिव्या खातो. कारण ऑफिसमध्ये असताना तिचा फोन उचलून माझे पहिले वाक्य हेच असते की, काही अर्जंट काम असेल तरच बोल !

देवा... दोन वर्षांपूर्वी कधीतरी मी ज्युनिआर होतो तेव्हा ठरलेले काम पटपट हातावेगळे केले की थोडासा फावला वेळ मिळायचा... आता फक्त रेस असते. जेवढे मी करू शकतो तितके काम. आयुष्यात पुन्हा कधी ईंजिनीअर नाही होणार Sad

आनंद, हो
एमेनसी असली तरी ईथले मॅनेजमेंट भारतीयच.
त्यांना भारतीय कामगारांची नसही चांगलीच ठाऊक असणार

ऋ मी तुमची फार मोठठी पंखा आहे.तुम्हीच शेवटच्या parat सांगितलं ऋन्मेष तुमचे खरं नाव नाही मग काय आहे?जाणून घ्यायला आवडेल

तुम्हीच शेवटच्या parat सांगितलं ऋन्मेष तुमचे खरं नाव नाही मग काय आहे?जाणून घ्यायला आवडेल>>>>
अर्रे देवा!!! Lol

ओ मोठ्ठाला पंखा,
नावात काय आहे?
-इति शेक्सपीअर...:)

एक भाबडा प्रश्न-
असे असेल , तर एमएनसीत जाॅब करून फायदा काय?

त्यापेक्षा स्वतःचा बिझनेस केलेला बरा. निदान आपल्या कामाचं क्रेडिट आपल्याला तरी मिळेल अन् स्वतःसाठी काहीतरी केल्याचा आनंदही.

>> नाव बदलून लिहिण्याचा एक फायदा तर आहे,

मिलार्ड, ये पॉईंट फ्युचर रेफरन्स के लिये नोट किया जाये

https://www.maayboli.com/node/15206?page=11
{माझे नावच ऋन्मेष
माझी आई जेवायला बोलावताना मला ऋन्मेऽऽष अशी हाक मारते ..
तसेच नाव मग ईथे ठेवले, कारण नावात काही अतरंगी कॅरेक्टर असले की ते उठून दिसते Happy
Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2015 - 09:18}

मी ईथे रात्री ऑनलाईन असतो>>>>> ऋन्मेष, मी मागे पण लिहीले होते, आताही तेच लिहीते. कृपया रात्री ११ च्या पुढे विनाकारण जागरण म्हणजे अनेक आजारांना निमंत्रण. मग तू ते स्वतःहून कशाला ओढवुन घेतोयस या नवीन नवीन धागे गुंफण्याच्या हट्टापायी? संध्याकाळी घरी गेल्यावर बस ना मायबोली वाचत. तुझ्यावर जबाबदारी आहे का नवीन प्रश्न सोडवण्याची? आणी निर्माण झालेले प्रश्न बघुन डोक्याला ताप करुन घेण्याची?

तेव्हा तुला व इतर धागेकरु मंडळींना कळकळीची विनंती की मोहापायी आपले बहुमोल आयुष्य वाया घालवु नका. रात्र ही झोपेकरताच निर्माण झालीय, तिचा दिवस बनवुन परमेश्वराचा घोर अपमान करु नका. पटलं तर बघा, नाहीतर उडत जा वाळवंटात...

{{{ रात्र ही झोपेकरताच निर्माण झालीय, तिचा दिवस बनवुन परमेश्वराचा घोर अपमान करु नका. }}}

याला चार अपवाद आहेत -

रात के चार यार - उल्लू, बीमार, चोर और चौकीदार

धागालेखक यापैकीच एक असतील.

पटलं तर बघा, नाहीतर उडत जा वाळवंटात... Lol

रश्मी आपला सल्ला काळजीचा आणि योग्य आहे. पण काही अपरिहार्य वैयक्तिक कारणांमुळे मला रात्री लवकर झोपता येत नाही. झोप अपुरी होतेय असे लक्षात आल्यास मी ऑफिसला लेट वगैरे सर्रास जातो. मला ते अलाऊड आहे. खरे तर फक्त मलाच अलाऊड असल्याने बॉसचा लाडका वगैरे विशेषणे मला चिकटली असतात.

व्यत्यय कमाल आहे, मी थक्क झालो.
तुम्ही कुठल्याश्या धाग्यावरून माझी कुठलीशी पोस्ट कशी शोधून आणता?
मायबोलीवर एखाद्याच्या पाऊलखुणा शोधता येण्याची अशी काही सोय आहे का?

अरे हो, तुमच्या प्रश्नाचे उत्तर राहिलेच. ऋन्मेष माझे नाव आहे. पण ते मी स्वतः ठेवलेले आहे. घरच्यांनी ठेवलेले वेगळे आहे. पण सध्या ते देखील मला ऋन्मेष या नावानेच हाक मारतात.

रात के चार यार - उल्लू, बीमार, चोर और चौकीदार
धागालेखक यापैकीच एक असतील.
>>>
चोर आणि कोतवाल एकाच गटात __/\__

त्यापेक्षा स्वतःचा बिझनेस केलेला बरा. निदान आपल्या कामाचं क्रेडिट आपल्याला तरी मिळेल अन् स्वतःसाठी काहीतरी केल्याचा आनंदही.
>>>>>>>>
मराठी असल्याचा न्यूनगंड असावा मला कदाचित.. पण स्वतःचे काही जमेलसे वाटत नाही मला. कदाचित ते २४ तासांचे डेडीकेशन नाही जमणार.. किंवा ती जबाबदारी.. नोकरीत निदान जसे काही मर मर काम करत असेल दिवसभर.. पण सुटताच लॉग ऑट होतो. कधीच ते टेंशन घेऊन घरी येत नाही.

असो, एक सरकारी नोकरी लाथाडल्याचा पश्चाताप होतो कधी कधी...
जेव्हा तिथे फार आराम असल्याचे मागाहून समजले..
आपले वैयक्तिक छंद जोपासता आले असते. आजच्या खाजगी कंपनीत काम करणार्‍यांना कुठे जमतेय ते Sad

जेव्हा तिथे फार आराम असल्याचे मागाहून समजले..>>दुरून डोंगर साजरे असतात रुन्मेष
आणि खाजगी कामाला असलेल्या जवळपास सगळ्यांना असेच वाटते..एके काळी ते खरे असेलहि कदाचित पण सध्याची स नो ची स्थिति तुम्ही समजता तितकी आरामदायक नक्कीच नाहीये

आदू, शक्य आहे. सरकारी नोकरीतरी प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळे अनुभव असतील. पण आमच्या क्षेत्रात आरामाची आहे असे बोलू शकतो कारण काही सोबतचे मित्र करत आहेत. पैसाही हातात छान खुळखुळत असतो त्यांच्या पण मला त्यात ईंटरेस्ट नाही फारसा. आरामाच्या लाईफमध्ये मात्र आहे..

४०-५० पोस्टी जमण्याचे पोटेन्शियल आहे यात Happy >>> याला अनुमोदन देणार्‍या की या मताच्या विरोधात?
मला वाटते ज्या सरकारी नोकरीत वरची कमाई आहे तिलाच फक्त डिमान्ड आहे. जिथे ती नाही तिथे आराम असूनही काय फायदा असा मतप्रवाह तरुणांमध्ये आहे. अर्थात ज्याच्याकडे चॉईस नाही त्याला मिळेल ते पावन.

सध्या ते देखील मला ऋन्मेष या नावानेच हाक मारतात.>>> सध्याचा काळ कोणता?

Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2015 - 09:18... पासून २०१८ पर्यंतचा का? Proud

असो, एक सरकारी नोकरी लाथाडल्याचा पश्चाताप होतो कधी कधी...
जेव्हा तिथे फार आराम असल्याचे मागाहून समजले..
आपले वैयक्तिक छंद जोपासता आले असते. आजच्या खाजगी कंपनीत काम करणार्‍यांना कुठे जमतेय ते Sad
नवीन Submitted by ऋन्मेऽऽष on 24 January, 2018 - 22:33
>>>>
अशा आरामाच्या नोकर्‍या फक्त दूरवर असतात उदा: "गडचिरोली " Rofl
बरोबर ना? Wink

हा हा मी आराम हवेय म्हटले, तुम्ही जगाला राम राम बोलायच्या आयड्या देत आहात. तसेही मी मुंबई सोडून बाहेर जायची शक्यता कमीच आहे. त्यामुळे माझी पोहोच मुंबई महानगरपालिकेपर्यंत. माझ्या डिप्लोमा बॅचचे बरेच मित्र गुण्यागोईंद्याने तिथे नांदत आहेत. आणि मी डिग्री करून माझी अवस्था खडतर आहे.

>> तुम्ही कुठल्याश्या धाग्यावरून माझी कुठलीशी पोस्ट कशी शोधून आणता?

मायबोलीच नाही तर हमारे जासुस फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम के कोने कोने मे फैले है.
ऋन्मेष कोणाचं खरं नाव आहे हमको सब पता है... Lol

परदे मे रहने दो, परदा ना उठाओ. परदा जो उठ गया तो फिर खुल जायेगा
अल्लाह मेरी तोबा अल्लाह मेरी तोबा

हे गाणे कुठल्या पिक्चर मधले आहे? Wink

परदे मे रहने दो, परदा ना उठाओ. परदा जो उठ गया तो फिर खुल जायेगा>>>भेद खुल जायेगा असे हवे ना.

शिकार मधले गाणे आहे.
पण मला काही लिंक लागत नाही Happy

सध्या ते देखील मला ऋन्मेष या नावानेच हाक मारतात.>>> सध्याचा काळ कोणता?
Submitted by ऋन्मेऽऽष on 10 July, 2015 - 09:18... पासून २०१८ पर्यंतचा का?>>>>>
नाय. कदाचित् एकविस नोव्हेंबर पासून... Happy

पण मला काही लिंक लागत नाही>>>
अभ्यास अभ्यास करायला हवा! Lol

रच्चाकने,
ऐ बाबू ये पब्लिक है पब्लिक
ये जो पब्लिक है सब जानती है
ये जो पब्लिक है
अजी अन्दर क्या है बाहर क्या है
ये सब कुछ पहचानती है
ये जो पब्लिक …
हे गाणं पण भारीये! Wink

पण मला
" या टोपीखाली (????) दडलय काय?"
हे गाणे जास्ती आवडते. Rofl

Pages