Blocked..... :) :D

Submitted by अंबज्ञ on 20 January, 2018 - 22:53

ब्लॉक...

.

.

ती...स्वतःहून
फेसबुकवर वेव्ह करते..
बोलता बोलता
उगाचच दम भरते...
तुला ब्लॉक करेन म्हणते

तासंतास व्हाट्सआप करते
मनातल सारं भस्सकन ओतते
आपुलकीने अहो जाहो
सुद्धा म्हणते...
लाडिवाळपणे हळूच...
तूला ब्लॉक करीन म्हणते

रागवते..हसते
तोंड फुगवून..कट्टी करते
डोळ्यात पाणी आणून चटकन
तुला ब्लॉक करीन म्हणते

आठवणीने फोन करते
रात्र रात्र गप्पात रंगते
स्वतःपेक्षा जास्त
माझ्यातच गुंतते
तरीपण बाय करताना
तूला ब्लॉक करीन म्हणते

प्रत्यक्ष न भेटता कधी
निःस्वार्थ निरपेक्ष मैत्रीचा हात
अलगद स्विकारतानाही
खट्याळपणे ती....नेहमीच
तुला ब्लॉक करीन म्हणते

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

wow Happy जव्हेरगंजची आपल्याकडून ह्या रचनेचे वाहवा is just like feeling proud Happy
आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार