बार शेट्टीचा

Submitted by मिरिंडा on 14 January, 2018 - 13:16

बारचेच गोदाम मदिरेचाच ठेवा
उघड बार शेट्टी आता उघड बार आता ॥ध्रु॥

जमले ते असंख्य बेवडे बंद बारपाशी
वाट पाहुनिया सारे निराश होती चित्ती
बापा शेट्टी लवकर आता ह्वावा प्रवेश आमुचा ॥ उघड बार... ॥ १

उजेडात होते ग्लास , अंधारात बाटल्या
ज्याचे त्याचे हाती होती चखण्याची वाटी
ताक पिणाऱ्यांना कैसी घडे मदिराभक्ती ॥ उघड बार .... ॥२

पिते मदिरा डोळे मिटूनी जात बेवड्याची
मनी बेवड्याच्या का रे भीती बायकोची
गृहप्रवेश होता होता बसेल ,कमरेत लाथ ॥ उघड बार .... ॥ ३

पाहुनी ही मदिराभक्ती गहिंवरला शेट्टी
एक एक पेग त्याने फुकट दिला शेवटी
उधारीची चिंता त्याला का भेडसावी ॥उघड बार .... ॥। ४

समोरच्या भिंतीवरती आरसा बिलोरी
आपुल्याच असंख्य प्रतिमा भिरभिरती भोवती
क्षणोक्षणी देहावरला तोल सावरावा
हीच तुझ्या चरणापाशी प्रार्थना देवा ॥ उघड बार .... ॥ ५॥

(संपूर्ण )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही जमली. विडंबन करताना बर्‍याच गोष्टींचं भान ठेवावं लागतं उदा मुळ काव्याची ताकद कशात आहे याचं आकलन व्हावं लागतं.

आपलं म्हणणं पटलं. प्रतिसादाबद्दल आभारी आहे. हा एक केवळ प्रयत्न होता.