आधारकार्ड

Submitted by सुप्रिया जाधव. on 12 January, 2018 - 10:18

आधारकार्ड

प्रिय,

बॅंके- बॅंकेत
गिर-गिर हिंडून
प्रत्येक बचत खात्याला
आधार कार्ड जोडून
एकेक खाती
बंद होण्यापासून वाचवताना

तुझ्या- माझ्या
भावनिक गुंतवणुकींच
बचत खातही
बरेच दिवस ऑपरेट न झाल्याने
धूळ खात पडलेल दिसलं

जे जॉइंट असल्याने
एकटीने बंदही
करता येत नाहीय
आणि
तुझ्या आधाराशिवाय चालू ठेवताही ..

तशी मुदतही वाढवून मिळालीय म्हणा !

मग,
करतोयस सही झेरॉक्स कॉपीवर ?
नात्याला तुझा कायम आधार असल्याची
की
बंद होवून जावूदेत आपोआप ?

प्रतिक्षेत ....

सुप्रिया

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त. Happy