शब्द

Submitted by सेन्साय on 11 January, 2018 - 07:29

.

.

वाट तू निवडावी...
आपल्या भाव स्वप्नांची
ग्रीष्म शिशिर आणि वर्षा
साथ मी नेहमीच द्यावी

ना तू पुढाकार घ्यावास
ना मी माघार घ्यावी
स्वप्नपूर्ति जीवनाची
कैसी साकार व्हावी !

अथांग खळबळ मन सागराला
संसार किनारी ओढ़ असावी
शाश्वत बेट दीपस्तंभ आधारी
तशीच ह्या नात्याला जोड़ असावी

विखुरलेल्या माझ्या शब्दांना
प्रेमाची उपमा जर तू द्यावीस
शब्दांतून उपजेल एकच अर्थ
जीवनसारथी फक्त तू यावीस

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

sundar!

धन्यवाद मी_ किशोरी Happy
मनातले शब्द चित्ररूपात उमटले
अन् ते चित्रच कवितेत शब्दरूपात