प्रेमाचे गणित -2

Submitted by navya on 10 January, 2018 - 06:46

दोन वर्षांपूर्वी...
`ए वैभ्या अजून किती वेळ थांबयचय इतक्या वेळात दोनदा मटन शिजून झाल असतं' वाट बघून वैतागलेल्या निशांतने शेवटी वैभवला झापलच..
'थांब रे जरा आत्ता mess साठी बाहेर येईल बघ ती'
तेवढ्या वेळासाठी तरी त्याने निशांतला दिलासा देऊन शांत केले..
गेले एक वर्ष असच चालेलल
तिला बघितल्याशिवाय वैभवचा दिवसच संपत नसे ..
तसं, दररोज college मध्ये दिसायची ती, पण आज project च्या कामाच्या गड़बडित ती दिसलिच नव्हती.
मग काय रोजचा शिरस्ता मोडू नये म्हणून साहेब एक तासापासुन तिच्या हॉस्टेलबाहेर ठाण मांडून बसलेले..आत्ता येईल असं करता करता एक तास उलटून गेला..
तेवढ्यात ती आली !!
ब्लू जीन्स, पिंक टॉप, त्यावर घातलेल grey jacket ,कानात earphones जाकेटच्या खिशात हात घालून ,आजुबाजुच्या जगाशी काही संबंधच नसल्यासारखी आपल्याच नादात चालली होती ती.. त्याच्याकडे नजर वर करून पहिलेही नाही तिने..
पण त्याला कुठे ह्या गोष्टीची काळजी होती तिला आज बघायला मिळाले ह्याचाच आनंद होता त्याला..
'ओ मजनू गेल्या वहिनी ,आता तरी आपल्या पोटापाण्याचं बघुया भुकेने जीव जाईल माझा' इति निशांत
'हो चल रूमवर डबा आला असेल' अस बोलून वैभवने गाड़ी सुरु केली'
तशी ती पहिल्या नजरेत कोणालाही आवडेल इतकी सुंदर नव्हती ,हां पण मध्यम ऊंची ,सुडौल बांधा ,गव्हाळ रंग आणि निरागस चेहरा ह्यामुळे चारचौघिंमध्ये नक्कीच उठून दिसेल अशी होती.. प्राची पाटिल...!
वैभवला तिच्यात काय आवडले हे त्याला कधी सांगता आलच नाही ..फक्त तिला बघिल्यापासुन त्याच college life तिच्यापुरतच मर्यादित झालेल..
तस social sites वरुन तिच्याशी संपर्क करण्याचा हरेक प्रयत्न केलेला पण तिला त्याच्या प्रेमाशी काहीच देनघेण नव्हता
एकीकडे तिच्यासोबत त्याने स्वतःचं छोटेसं काल्पनिक जग बनवलेल तर दुसरीकडे तिच्या छोट्या जगात त्याच्या प्रेमाला काही किम्मत नव्हती..
आपल्या देशात एखादी मुलगी पटवने ही complicated प्रक्रिया एकदम सोपी करायची असेल तर तिच्या मैत्रीणि हा सर्वात उत्तम पर्याय आहे.. मग ह्यात वैभव तरी का मागे राहिल.!!
वैभवच प्रेम प्राचीने कितीही avoid केल असलं तरी तिच्या जवळच्या मैत्रीणि सगळ पाहत होत्या आणि त्यांच्या मते वैभव प्राचीसाठी एकदम perfect match वैगरे होता..
बाक़ी काही म्हणा ,पण अशा बाबतीत खरी मैत्री दाखवायची हूककी सगळ्याणांच येते..बस फक्त त्याच प्रयात्नात होती ही सगळी मंडळी...!!!
आज पहिल्यांदाच तो ग्रूपमध्ये का होईना प्राचीला भेटणार होता ..उत्साह, आनंद ,थोड़ी भीति ह्याच perfect combination होतं त्याच्या चेहऱ्यावर....
तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाच्या पार्टीला तो invited होता ...तस म्हणायला गेल तर हि party निम्मित होत त्या दोघांना भेटवण्याचं..
आजचा दिवस वैभवच्या आयुष्यातला खुप महत्वाचा दिवस असणार होता..!!!!
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त!
छान लिहीत आहात पण
पहीला भाग आणि आताचा दुसरा भाग यांना सांधणारा दुवा ('दोन वर्षांपूर्वी' असं लिहीलंय तरीही) मिसींग आहे. हा भाग पुर्णपणे स्वतंत्र असल्यासारखा वाटला. अर्थात् हे मा वै म.
पुभाप्र.शुभेच्छा!