प्रतिशिर्डि येथे एस. टि. ने कसे जायचे

Submitted by श्री आज्ञा on 9 January, 2018 - 06:38

नमस्कार,
मी मायबोलीवर नवीन आहे.
मला पुणे ते शिरगाव (प्रतिशिर्डी) येथे एस. टि. अथवा बस ने जाण्याबद्द्ल माहिती हवी आहे.
एका दिवसात जाउन येता येईल का?
कोणाला माहिती असल्यास प्लीज सांगा.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पुण्यातून एका दिवसात जाऊन येता येते.
सोमाटणे फाट्यावरून प्रतीशिर्डी हे ठिकाण बरंच आत आहे, तिथवर रिक्षा जात असावी फाट्यावरून. फाटया पर्यंत बस मिळेल.
आम्ही कार ने गेलो होतो.

पुण्याहून नक्कीच एका दिवसात जाऊन येता येईल. पुण्याहून थेट एसटीची कल्पना नाही, पण दक्षिणा म्हणतेय त्याप्रमाणे सोमाटणे फाट्यावरून सहा आसनी रिक्षा असणारच. आम्ही तळेगावला गेलो होतो एका समारंभाला तेव्हा गेलो होतो. पण तेव्हा खासगी वाहन होते.

बर्‍याच वर्षांपूर्वी,मी चिंचवडवरून रिक्शाने गेले होते.दुपारी २.३० - ३.०० ला निघून परत ७.-७.३० ला आलो.प्रचंड गर्दी होती.दर्शनाला थांबलो नाही.