शेवटचे पान

Submitted by कवी मन माझे on 8 January, 2018 - 02:32

कित्येक दिवसांच्या अबोलपणा नंतर आज अचानकपणे तिचा त्याला एक Text आला...
इतके दिवस तोही तिच्याशी बोलण्यासाठी आतुरलेला होता .ती बोलत नाही म्हणून तोही तिच्याशी बोलत नव्हता...(त्या दोघांमध्ये भांडण असा काही नव्हतं होता तो फक्त गैरसमज)

तिचं नाव मोबाईलच्या screen वर बघताच त्याच्या मनाची धडधड वाढली होती मन विचारांच्या भोवऱ्यात अडकले होते
काय झाले असेल?? आज अचानक तिने मला Text का केला ?
या विचाराने तो पुरता गोंधळून गेला होता...
मनाला सावरून त्याने तिझा Text उघडला ....तो बघून तो आता तर जास्तच गोंधळला होता...त्याला आता समजत नव्हतं असे का तिने केले असेल..
तिने त्याला Blank Text केला होता..

खूप वेळ विचारानंतर त्याने हिम्मत करुन तिच्याशी आज मनातला सगळं बोलायचं ठरवलं .. मग आता त्यानेही तिला Hiii Text केला होता...
बोलायला सुरुवात झाली दोघांची ...सुरुवात अगदी अनोळखीपणा सारखीच ..ती त्याला म्हणत होती ...खुप दिवसांपासून तुला बोलायचे आहे पण कसे बोलू तेच समजत नाही मला...
शेवटी आज मनाचे धैर्य करून तुला आज बोलायचं ठरवलंय बघ...त्यासाठी आज तुला Blank Text केला होता...

तुझ्याबद्दल माझ्या कानावर खूप-खूप काही आले आहे बघ ...पण मला तू सोडून बाकी कोणावरच विश्वास नाही बघ .. मला आता हे सगळं तुझ्या तोंडून ऐकायचं आहे बघ.. म्हणूनच आज तुला सर्व काही बोलेन अस ठरवलंय बघ.

शेवटी ती त्याला विचारतेच खर खर सांग ना ...
तुझ्या आयुष्यात एक नवीन मुलगी आली आहे म्हणे? सांग ना खर आहे का ते?
तो उत्तरला हो खर आहे ते पण.......

त्याच पुढचं काही बोलण्याआधीच तिची तळपायची आग मस्तकापर्यंत पोहचते ..
तो अगदी शांत होता..काही न बोलता फक्त तिच बोलणं ऐकत होता.पण...
नंतर त्याला तिला पुढचं खूप काही सांगायचं होत ...ती काहीच ऐकायला तयार नव्हती... ती आता फक्त त्याच्यावर आरोप करत होती..

त्याला वाटलं तिच बोलणंही बरोबर आहे त्याने ही चुक केली होतीच ...नाही म्हणता म्हणता त्याचा ही राग आता अनावर झाला होता... त्याने ही आता उद्धटपणे बोलणं सुरू केलं होतं...आरोप-प्रत्यारोप सुरू झाले ...बघता बघता भांडण आता टोकाला पोहचलं होत...कोणच आता माघार घ्यायला तयार नव्हते..
दोघे इतके बोलू लागले होते जसे की जुने एकमेकांचे वैरीच आहेत..
शेवटी त्याने ठरवलं आपणच थोडं जास्तच चुकलो आहेत म्हणून आपणच आता माघार घ्यायला हवी...

तो तिला Sorry बोलतो पण अजूनही ती त्याच काही ऐकून घ्यायला तयार नव्हती..
इतक्या दिवसांचा तिच्या मनात असेलला त्याच्यावरचा राग ती व्यक्त करत होती..ती बोलत बोलत मध्येच थांबते...

संधीचा फायदा घेत तो आता बोलायला सुरू करतो..
तुझा मन शांत झाल का आता?
खरं नक्की काय आहे ते सांगु का तुला?
मग आता तो त्याने केलेल्या चुका तिला सांगु लागतो.. ती आता फक्त ऐकून घेत होती आणि तो बोलतच होता..
त्याच बोलणं झाल्यावर तिलाही आता पटलं होत की यामध्ये दोघांची चुकी आहेच पण त्या बरोबरच त्या दोघांनी चुकीच्या व्यक्तीवर ठेवलेला विश्वास ही तितकाच जबाबदार आहे...
आता दोघांनाही आपल्या चुकीची जाणीव झाली होती...
आता दोघेही एकमेकांना Sorry बोलले ...
पण आता पुढे काय??/

दोघेही काही न बोलता sorry वरच थांबले....अन शेवटही आता परत सुरुवाती सारखा झाला होता

"अबोलपणा"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users