भीती

Submitted by navya on 7 January, 2018 - 13:34

मनाचा घडा रिता करावासा वाटतो रे मलाही, पण भीती वाटते तुला गमावण्याची ....
हळुवार जपलेल्या आपल्या निखळ नात्याला कायमचा तडा जाण्याची।।
तुझ्याकडे पाहत राहावंसं वाटत रे मलाही,
पण भीती वाटते तुझ्या नजरेत हरवून जाण्याची....
तुझ्यात मला शोधताना स्वतःचच अस्तित्व गमावून बसण्याची।।
तुझी स्वप्न सजवायला आवडत मलाही,,, पण भीती वाटते ती स्वप्न सत्यात मांडण्याची...
जगाने घालून दिलेली ही मैत्रीची मर्यादा ओलांडण्याची।।।
माहीत नाही नक्की कशाची भीती वाटतेय मला,,,
आयुष्याच्या अखेरपर्यंत तुझा हात हातात घेऊन चालण्याची.. की मैत्रीच्या अर्ध्या वाटेवरच नकळत साथ सुटून जाण्याची।।।।

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे. तुमच्या भावना पोहचतायेत.
तुमची परवानगी असेल तर यावर विडंबन पेश करेन... उद्देश फक्त थोडी करमणूक इतकाच असेल.