प्रवास

Submitted by मिता on 6 January, 2018 - 05:45

ते एक आयुष्य होत.. निवांत बिनधास्त.. कशाचं बंधन नव्हतं, कसले विचार नव्हते, परिकथेची स्वप्न बघत दिवस मजेत होते.. डोळ्यात मोठी स्वप्न होती , पण तेव्हा क्षणभंगुर आयुष्याचा विचार नव्हता.. अन स्वप्न फक्त डोळ्यात होती.. वास्तवात त्यांच्या पूर्तीसाठी धडपड करावी असं वाटत नव्हतं .. एका रंगबेरंगी दुनियेत हरवलेली होतो.. जबाबदारी माहित नव्हती.. कारण कोणीतरी होत ती वाहणार.. अलगद हातात पैसे येत होते , गरजांसाठी .. कशाची जाणीव नव्हती , अगदी कशाचीच ...
पण तेव्हा हे पण माहित नव्हतं कि जगतोय हे आयुष्य आनंदाचे परमोच क्षण आहेत .. याहून वेगळा आनंद नाही .. तेव्हा मात्र चांगले दिवस येतील अन मी असं करेन तसं करेन , असे मजल्या वर मजले बांधत होतो ..

आता ..!!! . अन आता सगळं आहे , ती स्वप्न बऱ्यापैकी पूर्ण झालीत .. सगळं आहे .. अन विचाराने पण बऱ्यापैकी समृद्ध झालोत .. चांगल्या वाईटाची जाण आलीय .. काय करायला हवं काय नको हे सगळं नेमकं समजतं ..
जे हवं होत ते आयुष्य आहे पण हि कसली उणीव जाणवतेय .. काय नाहीये ज्याची गरज भासतेय , अन हे सगळं असणं पण नको वाटतंय .. कुणीतरी ते आयुष्य परत द्या असं ओरडून सांगावं वाटतंय ..
कारण आता काळात नाहीये कि नेमकं काय साध्य करायचं आहे या आयुष्यात , कि ह्याच सुख दुःखाच्या प्रवासात हेलकावे खात हि होडी पुढं रेटायची आहे , न एक दिवस स्वतःला पण न समजता बुडून जायचं आहे त्या अथांग सागरात .. कळत नाहीये कशासाठी हा डाव .. मूर्त - अमूर्तच्या या खेळात या मनाची फरफट होतेय एवढंच ..

बर कधी कधी हे हि कळतं कि मनाचं समाधान असणं म्हणजे आनंद .. पण त्याला समाधानी ठेवणं पण प्रवाहाची गती मंद करत अन मग पुन्हा उगाचच ओढून एक इचछा मनी धरून प्रवास सुरु करावा लागतो , क्षितिजाकडे तोंड करून , पुन्हा माहित नसत कशासाठी .. पण तरी सुरु असतो जाणीव नेणिवेच्या पलीकडला प्रवास .. कशाच्या तरी शोधात .. अधांतरी...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

इथं कसा आलो- वय ओळखा धागा, त्यावरून vbचा पुरुषांना स्त्री डु आयडी धागा, त्यावर आ रा रा ची कमेंट मधला संयुक्ता ग्रुपचा उल्लेख, मग ग्रुप शोधून सभासद बघितले, त्यात एकच फोटो असणारा आयडी तो पण आवडत्या जेनेलियाचा फोटो, मग फोटो बघायला म्हणून प्रोफाईल ओपन केली, मग लेखन आणि त्यातला हा पहिला धागा!

(पूर्वी माझ्यावर anonymously आरोप झालेत की कोणत्यातरी लेखकावर खार खाऊन मी मुद्दाम जुने धागे पहिल्या पानावर ओढून आणतो, त्यासाठी हे स्पष्टीकरण.. अर्थात आरोपांना फाट्यावर मारून)