चिमणी इवली

Submitted by vijaya kelkar on 4 January, 2018 - 02:22

चिमणी इवली

बसून वेलीच्या हिंदोळी
डोले चिमणी इवली

झुलविण्या वाकली आम्र डहाळी
चढली डाळींबाची लाली

फुलांचा सडा, पानांची रांगोळी
पपईच्या हाताची सावली

कुहू - कुहूची आरोळी
तिनेही शीळ घातली

तळ्यातली मासोळी
वारंवार डोकावू लागली

फुलांच्या ओळी,रंगीत कोळी
परागांची मोळी हीनं बांधली

थेंबांच्या ओळी गाळे पागोळी
क्षणात मग तिथे पावली

माशा कामात मग्न मोहोळी
बघत ही क्षणभर विसावली

घिरट्या घालू लागली पाकोळी
' घरट्या कडे जावे 'म्हणत उडाली ........
विजया केळकर _____
bandeejaidevee blogspot.com

Group content visibility: 
Use group defaults