ते..

Submitted by ओवी... on 3 January, 2018 - 14:53

सध्या माझं आयुष्य माझ्या हातात नाहीये !
ते मला जसं वागवतात, तशी मी वागते.
मला कारण समजत नाही ,
मी कारण विचारत ही नाही..
कधी सोडून देतात मला मुक्त, स्वच्छ्नद..
तर कधी सगळ्यांमध्ये असूनही एकटं करतात.
समाधानानी काठोकाठ भरलेली असते मी..
आणि दुसऱ्याच क्षणी भरून जातं माझं मन रीतेपणानी!!
कधी माझ्या हातात सत्ता असते माझ्या सम्पूर्ण आयुष्याची,
आणि कधी नसते मला मुभा साधी एका श्वासाची!
काहीच माझं नसतं, तरीही सगळं माझंच असतं!
कधी समजतं कधी समजतं नाही!
असं कसही वागवतात मला ते...
पण तरीही मला ते हवेच असतात..
कारण कधी कधी तेच देतात मला भावना ,
प्रेमाची, आनंदची, सुखाची,
कोणाला आपलं म्हणायची,
आपण कोणाचं तरी होण्याची...
तेच दाखवतात मला स्वप्न ऊर भरून जाणारी..
ते...
माझेच असूनही माझे कोणीच नसणारे....
- ओवी.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Ka?

सही Happy