पीआयओ, ओसीआय आणि बरंच काही

Submitted by सशल on 3 January, 2018 - 13:22

फार पुर्वी इथे एक खडाजंगी झाली होती. इन्डियन एम्बसी/कॉन्स्युलेट च्या कारभारातला सावळा गोंधळ आणि त्यामुळे अमेरिकेत राहणार्‍यांनां भोगाव्या लागणार्‍या यातना किंवा गैरसोयी. बहुतेक तेव्हा वादात भारत द्वेष्टे असंभा* आणि (भारत)देशभक्त असंभा असे दोन गट होते. आठवतं का कोणाला?

सध्या तरी माझा सपोर्ट भारत द्वेष्ट्या म्हणून हिणवले गेलेल्या असंभांनां.

- ओसीआय , सीकेजीएस् , भारत सरकारच्या प्रोसेसीस् नी ग्रस्त एक नागरीक!

* - अमेरिकेत राहणारे संपन्न भारत वांशिक

क्रमशः

(बरेच दिवसांनंतर नविन लेखनाचा धागा चालू करत आहे. तेव्हा बर्‍याच चुका झाल्या असतील विषय, शब्दखुणा इत्यादी. किंवा काही राहून गेले असेल. सल्ले मिळताच चुका दुरूस्त करण्याचा प्रयत्न करेन.)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून दोन ग्रिव्हान्सेस जुन्या अ‍ॅप्लिकेशन मधले:

सीकेजीएस् वेबसाईट वर यु एस पासपोर्ट असेल तर प्लेस ऑफ इश्यू "USDOS" ऑटोपॉप्युलेट होतं. गव्हर्न्मेन्ट ऑफ इन्डिया करता तसं होत नाही आणि तुम्ही नीट अभ्यास केला नसेल (आणि/किंवा जनसंपर्क नसेल तर हे कळायला वेळ लागतो! Wink ) आणि तिकडे USDOS च्या ऐवजी दुसरं काही घातलं (उदाहरणार्थ USA) की सगळा फॉर्म बाद. परत सगळं पहिल्यापासून करायचं!

सीकेजीएस् आणि गव्हर्न्मेन्ट ऑफ इन्डिया अग्निदिव्यं पार केली की मग परत सीकेजीएस् च्या वेबसाईट वर जाऊन मॅन्युअली दोन रेफरेन्सेस लिंक करायचे म्हणजे मग तुमचा "अकाउन्ट" तयार होतो. त्या अकाउन्ट मध्ये लॉग-इन करायचं असेल तर मॅक वापरताना फक्त मोझिला वरून करता येत होतं. क्रोम वापरून झालं नाही तेव्हा फोन केला तेव्हा "मोझिला" वापरा असा गोड सल्ला मिळाला.

एव्हढं करून परिक्षेचा रिझल्ट ओसीआय नापास कारण हँड रिटन पी आय ओ वर ह्यानीं मुलाचे मिडल नेम घातलेले नाही. त्यामुळे आता अ‍ॅफिडेव्हिट करायचं म्हणे की ह्या दोन नावांच्या (मिडल नेम आहे अथवा नाही) एकच व्यक्ती आहे.

BTW, हे अ‍ॅफिडेव्हिट म्हणजे नक्की काय? स्वतः एक डॉक्युमेन्ट बनवायचं का (ज्याकरता अ‍ॅफिडेव्हिट आहे तो मजकूर) लिहून खाली सही ठोकून मग नोटराइज्ड केलं की झालं अ‍ॅफिडेव्हिट का? मायनर व्यक्ती च्या नावाचं अ‍ॅफिडेव्हिट पालकांनीं करायचं का?

अ‍ॅफिडेव्हिट हे भारतात एक स्पेफिफिक डॉक्युमेण्ट आहे. रेव्हेन्यू स्टँप वाला फॉर्म घेउन त्यावर करतात आणि नोटराइज करतात असे काहीतरी अंधुक लक्षात आहे. काही वर्षांपूर्वी केले होते. इथे नोटराइज्ड आणि सेल्फ-अटेस्टेड हे दोनच प्रकार पाहिले आहेत.

नवीन पास्पोर्ट रिन्ह्यु केल्या मुळे आताच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातच ओसीआय साठी अप्लाय केले आहे. ३ महिने लागतात अस ckgs च्या ऑफिसात कळल्याने शांतपणे वाट पाहात होते पण तुमचे वाईट अनुभव बघुन स्टॅटस चेक करत राहीले पाहीजे अस वाटतय.
मी डॉक्युमेम्ट्स ची लिस्ट करुन ते नोटराईज करुन घेतले. (बाय द वे, $५ नोटरी शोधता आला तर बघ, मी UPS च्या दुकानात $१५ पेज प्रमाणे पे केले Sad )
नापास होणार नाही अशी आशा करते...

$५ नोटरी??!! ट्रीपल ए फुकट करून देते मेंबरांना. (मात्र ते हापिस गैरसोयीच्या जागी असेल असे बघूनच सर्व ट्रीपल ए हापिस थाटतात.)
https://membership.calstate.aaa.com/join-aaa/choose-a-plan
एका दिवशी फक्त १० सह्या मिळणार असा काही नियम आहे. बहुतेक वेळा त्या पुरतात.

$५ चा नोटरी मला पण शोधायचाय.
पोराचं करताना $२७५ वाचातायातंय तर दोन सह्यांना ups कडे $४५ मोजले Sad आता आमचं करताना $५ वाला कोणी देसी गुज्जू शोधला पाहिजे. Happy
आमच्या राज्यात AAA पण $१० घेतंय https://calstate.aaa.com/financial/notary-services

AAA च्या नोटरी सर्व्हिसेस् बद्दल माहिती नाही.

वेल्स फार्गो करून देते नोटरायझेशन ( free of cost but it may depend on the type of account you have with them) पण त्यांची काही रेस्ट्रिक्शन्स आहेत जसं की कुठल्याही "कॉपी" करता ते नोटरायझेशन करत नाहीत. कॉपी म्हणजे आपला पासपोर्ट, बर्थ/डेथ/मॅरेज सर्टिफिकेट ह्या सर्व "कॉपीज् " आहेत. त्याकरता ते नोटरायझेशन करत नाहीत.

ह्याव्यतिरीक्त कॅलिफोर्नियात एका डोक्युमेन्ट च्या नोटरायझेशन करता $१५ स्टँडर्ड रेट आहे अशी लेटेस्ट माहिती आहे.

आमच्या कम्युनिटीमधे पण काही लोक नोटरी करतात. ते रिअल इस्टेट एजंट आहेत. पैसे घेत नाहीत. त्यांचे नाव आपल्या मित्रमंडळींना सांगावे अशी फक्त विनंती करतात. तुमच्या कम्युनिटीचे ‘नेक्स्टडोअर’ असेल तर तिथे असा कोणी आहे का विचारा.

ओहायो मध्ये $१.५० मध्ये BMV नोटरी करुन देते.
लायसन्स घेताना त्याना पासपोर्ट , विसा नोटरी करुन पाहिजे होता, तेव्हा त्यानीच नोटरी करुन स्वतालाच सबमिट केल्या. त्यावेळी त्यानी सांगितले की आम्ही नोटरी करायचा पण business करतो.

सगळ्या बँकांच्या फुलसर्विस ब्रँचमध्ये एकतरी नोटरी असतो. त्या बँकेत अकाउंट असेल तर ते डॉक्युमेंट फुकट नोटराय्ज्ड करतात. या व्यतिरिक्त मेल बॉक्सेस एट्सेट्रा वगैरे सारखे शिपिंग करणार्‍या दुकानातहि चौकशी करा, तिथेहि असतात...

माझ्या ऑफिसात दोन नोटरी आहेत. ते कधी फुकट तर कधी त्यांच्या आवडीच्या चॅरिटी करता काही दोन चार डॉलर मधे साइन करुन देतात. नव र्‍याच्या ऑफिसात पण आहेत . ते पण दोन चार पेपर्स असतील तर फुकट करुन देतात. आमची बॅंक काही ठराविकच पेपर्स नोटराइझ करते. घर विकताना / घेतानाचे पॉवर ऑफ अटर्नि रियल्टर च्या किंवा मॉर्टगेज कंपनी मधेच होतात.

पण हे ओ सी आय साठी लागणारे पेपर्स दोघांनी साइन करायचेत. म्हणजे नवर्‍याने माझ्या ओफिसात यायला हवं किं वा मी त्याच्या ओफिसात. नाहीतर ट्रिपल ए चे ऑफिस लेट किंवा शनवारी चालू असेल तर तिथे जावे लागेल.

आमच्याकडे पत्नी, एक मुलगी, आणि अस्मादिकांकडे भारताचा १० वर्षांचा visa आहे. एका मुलीचे PIO कार्ड आहे. तर सर्वांचे सर्व visa स्टॅम्प असलेले नवे जुने वगैरे पासपोर्ट घेऊन भारतात महिनाभरासाठी जायला आम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही ना? ह्यांची प्रोसेस जरा सुधारली की सगळ्यांच्याच OCI साठी apply करायचं म्हणतोय. PIO कधी रद्दबातल होणार आहे? जर ह्याच वर्षी होत असेल तर मग apply करायची घाई करावी लागेल.

PIO to OCI 31 Dec पर्यंत मोफत (फक्त प्रोसेसिंग फी घेऊन) मिळणार होतं. आता उशीर झाला आहे. 31 ऑक्टोबर 2018 नंतर PIO घेणार नाहीत असं वाचलं कुठेतरी. रादर फक्त मशीन रिडेबल घेणार. आणि PIO हाताने लिहून द्यायचे, सो ते बहुतेक चालणार नाही.

>>> आमच्याकडे पत्नी, एक मुलगी, आणि अस्मादिकांकडे भारताचा १० वर्षांचा visa आहे. एका मुलीचे PIO कार्ड आहे. तर सर्वांचे सर्व visa स्टॅम्प असलेले नवे जुने वगैरे पासपोर्ट घेऊन भारतात महिनाभरासाठी जायला आम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही ना? <<<

काही प्रॉब्लेम येणार नाही. पासपोर्टची वैधता किमान ६ महिने शिल्लक आहे ना, ते बघा. काही देशात "कदाचित" तशी शक्यता असते.

अजून एक गोष्ट. जर विसावर जाताना २ महिन्याच्या आत परत भारतात जायचे असेल, तर कॉन्सुलेटकडून स्पेशल परवानगी लागते म्हणे. मी भारतात गेल्यावर ५ दिवसात सिंगापूरला गेलो होतो आणि मग १ आठवड्याने परत आलो तेव्हा मला एअरपोर्टवर अडवले होते, माझ्याकडे मल्टिपल एंट्री विसा असूनही. एक परदेशी नागरिक येतो त्याला दुसर्‍या देशाने इमिग्रेशन करू द्यावेच असा कुठलाही नियम नाही आणि ते मला माहीत आहे. मी त्यांना शांतपणे विचारले की मला माहीत न्हवते नाही तर मी सिंगापूरमध्ये भारताच्या कॉन्सुलेटकडून तसे केले असते. पण आता काय करू ते सांगा. तर त्याने मला साईडला ऑफिसात नेले, माझ्याकडून १ फॉर्म भरून घेतला, स्वतः जाऊन साहेबाची सही आणली, मग झेरॉक्स काढून पासपोर्टला लावली. अजिबात पैसे मागितले नाहीत आणि सौजन्यपूर्ण वागणूक दिली. मी पण त्याला धन्यवाद दिले. सांगायचा मुद्दा इतकाच की दुसर्‍या देशात जाताना, केवळ आपला जन्म त्या देशात झाला म्हणून असणारा आपला माज आपण बाजूला ठेवला पाहिजे आणि त्यांचे नियम पाळले पाहिजेत. जर कुणी तिथे वाद घालत बसला तर ताबडतोब परत पाठवण्याची पॉवर इमिग्रेशन ऑफिसरला असते, हे लक्षात ठेवावे.

त्यामुळे OCI हवे असेल तर भारताचे नियम काटेकोर पाळणे जरूरिचे आहे. नियम माहीत नसतील तर ते माहीत करून घ्यावे. Berry Appleman & Leiden हे लॉयर आमचे कोर्पोरेट इमिग्रेशन बघतात, त्यांना विचारावे (ते फक्त $१२०० घेतील) नाहीतर CKGS च्या साईटवर पूर्ण माहिती दिली आहे. ज्यांना पूर्वी इंडियन काँसुलेटला फोन करण्याचा अनुभव आहे, त्यांना CKGS कितीही वाईट असली तरी खूपच सुधारित वाटेल यात शंका नाही. जर OCI त्रासाचे वाटत असेल तर १० वर्षाचा विसा $१०० मध्ये मिळतो, तो घ्यावा.

सांगायचा मुद्दा इतकाच की वडापाव खायचे तुम्हाला कुणीही आमंत्रण दिलेले नाही. वड्याबरोबर समोसा पण उपलब्ध आहे, तो खावा. नको असेल तर घरी श्रीखण्ड-बासुंदी खात बसावे. पण वडा खायचाच असेल तर हॉटेलच्या वेळेतच, नियमानुसार जावे आणि मग वडा स्टीलच्या ताटातच का दिला, काचेच्या प्लेटमध्ये का दिला नाही असा कांगावा करत बसू नये.

पुढील माहिती कदाचित उपयोगी पडेल म्हणून देत आहे. (OCI card in lieu of PIO card)
१. Please take ONLY color photo copies.
२. Follow the instructions on the CKGS checksists. Some papers are self attested and some only need to be notarized.

They also want us to upload the photos and ask for certain specifications.
1) please place the photo on a white paper and take a picture of it using smart phone.
2) then using Microsoft Paint Brush, crop the image. copy the cropped image and save it into another file.
3) Re size the image using pixels in paint brush. use 360x360 (uncheck maintain aspect ratio check box)

In the same way, draw a rectangle of 750 pixels width and 250 pixels height and take a print out. Ask your child to sign or thumb print in the box. Take a picture of it using smart phone and follow the above procedure. This time pixel sizes should be 120x360.

Copy of US passport and Indian PIO size should not be more than 500 KB. Use a lower dpi option (75 dpi) while scanning the color photo copies.

उपाशी बोका , फार पर्सनल प्रश्न होत असेल तर सोडून द्या. उत्तर देणं माझ्यातर्फे बंधनकारक नाही. नाही दिलंत तर तुम्हाला जज्ज करणार नाही.
तुम्ही पुर्वी ह्युस्टन मध्ये होतात का हो?

उपाशी बोका छान पोस्ट.....
विसा वर अस्ताना दोन महिन्यात परत जायचा कायदा मागच्या ७-८ वर्षात केला आहे. २००८ च्या हल्या आधी काही लोकानी शॉर्ट टर्म मध्ये बर्याच वेळा ये जा केले होते. त्यामुळे हा कायदा केला आहे.

उपाशी बोका, मोठी पोस्ट लिहून, अनुभव शेअर केलात हे छान केलत.

इमिग्रेशन ऑफिसर ला परत पाठवायची पॉवर असते (म्हणूनच), त्याच्याशी सौजन्याने वागावं हा मुद्दा पण लक्षात आला. बहुतेक सगळे तसच करतात. (बराचसा माज हा आभासी आंतरजालीय जगात करता येतो आणी केला जातो)

नियम माहीत करून घ्यावेच लागतात आणी पाळावे पण लागतात. पण म्हणून ते नियम / ती प्रॉसेस किचकट असेल, तर तसं म्हणू नये, हे अमान्य आहे. जन्म त्या देशात झाला म्हणून माज केला असं कुणी काही लिहिल्याचं वाचलं नाहीये.

थोडसं अवांतरः कितीही परदेशी वगैरे म्हटलं, तरिही, भारत सरकारने OCI - Overseas Citizens of India, हे एका non-immigrant visa पेक्षा पुढच्या लेव्हल चं स्टॅटस दिलय (मतदान आणी शेतजमिन विकत घेण्याव्यतिरिक्त भारतीय नागरिकत्वाचे सगळे अधिकार आहेत).

सशल, तू डेड लाईन टाईम/ टाईम झोन बद्दल लिहिलेलं त्यांनी वाचलं बहुतेक.
आता असं दिसतंय.... ON or PRIOR to December 31, 2017(up to 2400 hours IST of December 31, 2017)
अजूनही का दिसतंय हा प्रश्न सोडून देऊ. पण २४.०० कसे वाजतात? Lol
रच्याकने : अर्थात हे २०१६ साली लिहिलं असतं तर लीप सेकंद धरून डेड लाईन आहे म्हणून एकदम गीकी वाटलं ही असतं. Proud
रच्याकच्या रच्याकने : २३:५९:६० म्हणजे २४:००:०० नाही पण ठीके

अमित, आधीही लिहीलेलं असू शकतं हं. फक्त मी नोटिस केल्याचं आठवत नाही Wink

आज केटी सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ऑनलाईन प्रोसेस नविन अ‍ॅप्लिकेशन करता पूर्ण केली; ह्यावेळी इन-पर्सन अपॉइन्टमेन्ट घेऊन.

अजूनही त्यांनी मागितलेल्या डॉक्युमेन्ट्स पैकी काही ठिकाणी एका पालकाचं मिडल इनीशियल आहे, काही ठिकाणी पूर्ण नाव ( फर्स्ट + मिडल) आणि काही ठिकाणी नायदर मिडल नेम नॉर इनीशियल. त्यामुळे अजून कुठे कुठे बोटं ठेवू शकतील त्याची कल्पना नाही. पण इन-पर्सन अपॉइन्ट्मेन्ट आणि ३००$ पेक्षा जास्त फोडणी देणार असल्यामुळे काही खुसपटं निघालीच तर वेळच्या वेळी उपाय साधून एकदाचं हे काम पूर्ण व्हावं ही अपेक्षा आहे.

आमच्या रिनन्सिएशन करताही अपॉइन्टमेन्ट घेतली आहे. रिनन्सिएशन पार पडलं की ओसीआय चं दिव्य. लग्नानंतर नाव बदलल्यामुळे "नाव कधी बदललं आहे का" ह्या प्रश्नाचं उत्तर "हो" असं आहे. जरी पुर्वी नाव बदललं तेव्हा अ‍ॅफिडेव्हिट वगैरे करून पासपोर्ट वर बदललेलं नाव असलं तरी अजून परत एकदा अ‍ॅफिडेव्हिट करावं लागतंय की काय अशी रास्त भिती वाटते आहे Wink

>> रच्याकच्या रच्याकने

रच्याकच्याकने टेक्निकली जास्त बरोबर वाटतंय. अ‍ॅफिडेव्हिट लागेल साहेब!

Lol
अरे govt ऑफ इंडिया भरल्यावर तो आणि ckgs नंबर एकत्र करायला जी लिंक आहे ती काही केल्या सापडत नाहीये. सशल किंवा कोणाकडे असेल तर टाका ना प्लीज ?
नेवर माइंड. सापडली.
अरे काय चावटपणा आहे! तो CKGS नंबरच्या फील्डला कॉपी चालतं पण भारत सरकार साईट वरून आलेल्या नंबरला नाही तो भला मोठा नंबर एक एक करून लिहायचा. Lol

>> अरे काय चावटपणा आहे! तो CKGS नंबरच्या फील्डला कॉपी चालतं पण भारत सरकार साईट वरून आलेल्या नंबरला नाही तो भला मोठा नंबर एक एक करून लिहायचा. Lol

Lol
हम इससे गुजर चुकें है! नंतर कळलं मॅक आणि क्रोम कॉम्बिनेशन चालेना!

नंबर ० आणि लेटर O ह्यातला फरक जरा प्रॉमिनन्ट करा बुवा सगळ्यानीच. सीकेजीएस किंवा ओसीआय करता नाही तर सगळीकडेच , युनिव्हर्सल.

हे असं एक एक करून कॉपी करताना नाकी नऊ येतात.

आज वेल्स फार्गो मध्ये नोटराईझ करायला गेलो तर त्याने दोन वेगवेगळे प्रकार सांगितले आणि कुठला करु विचारले.
मी Jurat Certificate दे म्हणालो ज्यात मी त्याच्या समोर सही केली असं सर्टिफिकेट आहे. हे बरोबर आहे का? का दुसरं घेतलं पाहिजे. ?

affidavite in lieu of originals डॉक्युमेंट CKGS वर ज्या दिवशी प्रोसेस कंप्लिट करतो त्या दिवसाची तारिख टाकतं. नोटरी ने मला ती खोडून आजची तारिख टाकायला लावली कारण तो आज नोटराईझ करत होता.
होप ते त्यांना चालेल.

वेल्स फार्गो च्या नोटरी ने मला प्रकार विचारला नव्हता. पण हो, त्याच्यासमोर सही केली. आणि लॉजिकली डेट जेव्हा सही केली असेल तेव्हाची हवी (असं मला वाटतं Wink )

Pages