स्वप्नात हळूच लहरताना....

Submitted by अजय चव्हाण on 29 December, 2017 - 23:50

कधी असं वाटतं की,
तो क्षण आताच यावा अन माझ्या तिच्या ओढीने सहजसुंदर फुलावा..
कधी असं वाटतं की,
त्या क्षणाने हळूहळू यावं अन सोबत थोड कुतुहुल , थोडा उत्साह घेऊन हळूच उमलावं..
हुरहुर... ही गोड चाहूल..
माझ्या मनाला चैन पडेना.....
आभाळातच उडतोय जणू मी, जमिनीवर पाय ठरेना...
पण थोडी भितीही वाटतेय...
कानाभोवती काळजात माझ्या क्षणोक्षणी धडधड वाढतेय...
असलो जरी मी एकटा..
सोबत ही कुणाची असते...
का सारं ते आठवून
मनोमन ओठांची पाकळी खुलते...
आरशात स्वतःला न्हाहळताना..
पुन्हा पुन्हा का पाहावसं वाटतं..
कसा दिसतो रे मी??
हाच प्रश्न त्या आरश्याला विचारावसं वाटतं..
असंच होत का? लग्न ठरवताना..
होतात का असे वेड्या मनाचे पिसे..
स्वप्नात हळूच लहरताना...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा. छान जमलीय कविता

लग्न ठरलय वाटतं तुमचं,त्याशिवाय नेमक्या त्या भावना शब्दात मांडण शक्य वाटत नाही.

ऋनिल असं काही नाहीये...ठरल्यावर कळवेन तुम्हाला ..

प्रतिसादाबद्दल धन्यवाद मेघा VB