जुगाड

Submitted by निर्झरा on 28 December, 2017 - 05:12

"जुगाड"
थोडक्यात काय तर अचानक कधी कधी अस काही घडत की आपल काम अडकून पडत. त्या वेळी ते कसही करून पुर्ण करण भाग असत. त्या वेळी आहे त्या सामानात अस काहीतरी कराव लागत कि ज्या मुळे आपल कामही होईल आणि समोरचा ही समाधानी होईल. हा प्रकार सर्वच ठिकाणी आढळतो. मग ते ऑफिस असो, घर असो, ट्रिप असो किंवा अजून काही. जिथे समस्या निर्माण होते तिथे तिथे हा जुगाड आपल अस्तित्व दाखवतो. यात महत्वाच म्हणजे जुगाड करणारि व्यक्ती. तिला जर जुगाड जमला नाही तर हसु झालच म्हणून समजा. यावर आधारीत एक चित्रपटही मी बघितला होता. तुम्ही ही कधी असा जुगाड नक्कीच केला असेल. मला तर असे प्रयोग करायला फार आवडतं आणि गेले काही दिवस मी याचा पुरेपूर आनंदही घेत आहे.
सध्या ऑफिस मधे ईनस्पेक्शन चालू आहे. खरं तर सर्वांनी जोरदार तयारी केली. जे जे समोरची व्यक्ति मागू शकते त्या अनुशंगाने विचार करून ते सर्व डॉक्युमेंटस तयार करून ठेवले. आता उजाडला जुगाड करण्याचा दिवस. नेमणूक झालेले पदाधिकारी ठरल्यावेळेप्रमाणे ऑफिस मधे हजर झाले. हळू-हळू गोष्टी तपासणे चालू झाले. एक दाखवल कि लगेच त्यांच्या पुढचा प्रश्न तयार असायचा. पण का कुणास ठाऊक आपण परिक्षेत एखादा धडा ऑप्शनला टाकावा आणि प्रश्न पत्रिका हातात आल्यावर नेमके त्याच धड्यावर जास्त प्रश्न असावेत तस हे लोक पण बरोब्बर ज्याची आपण जास्त तयारी करत नाही असे डॉक्युमेंट मागतात आणि मग ईथून सुरू होतो जुगाडाचा प्रवास.
त्यांच्या समोर हे डॉक्युमेंट कस सादर कराव?, ते नविन न वाटता जुनच आहे हे कस दाखवाव?, जर त्यावर काही लिहायचे असेल आणि अक्षर सारख नको असेल तर कस वेग वेगळे लोक पकडून त्यांच्या कडून वेग वेगळ्या पेनाने- शाईने त्यावर लिहून घ्यायचे? अशा अनेक प्रश्नांची उत्तर हा जुगाड करून मिळवली जातात. आता उदाहरण द्यायच झाल तर आमच्या ऑफिसच एक रेकॉर्ड जे सॉफ्ट मधे होत ते हार्ड मधल आम्हाला दाखवायच होत, पण त्या वेळी ते हार्ड मधे केलेलच न्हवत, आता काय? तर आम्ही चक्क एका रफ पेपरवर त्याची एक प्रिंट दिली आणि तो कागद धूळ असलेल्या डेस्कवर घासून काढला आणि त्यांच्या समोर धरला.
अजून एक गम्मत म्हणजे आम्हाला हे सगळ करायला वेळ मिळावा म्हणून आमचे सर त्यांच्या सोबत खिंड लढ्वायचे. त्यांनी अस काही मागीतल कि आम्हि लगेच खालच्या फ्लोअरला पळायचो जुगाड करण्यासाठी मग सर त्यांच्यासाठी खायला मागवायचे आणि त्यांच लक्ष तिकड वळवायचे. एकदा तर त्या अधिकार्‍याने सांगितल की आता मला अजून खायला घालू नका नाहीतर तुमचा रिपोर्टच मी बनवणार नाही. तेव्हा कुठे सर जरा थांबले.
यात अजून गमतीचा भाग म्हणजे आय टी वाल्याला पण आमच्या जुगाडात सामिल करून घ्यायचे. जर मागितलेल काही आम्ही कुठल्याच प्रकारे नाही जमवू शकलो तर त्यांना सरळ सांगायच कि हा डाटा आम्हि सरव्हर वर ठेवलाय. मग ते दाखवा म्हणाले की सरव्हर डाऊन झालाय असे सागायचे. मग आय टी वाला पण त्यांच्या समोर उगाचच आज तरी काम होणार नाही असे बोलून जाणार की आम्ही यातून सुटायचो.
हे झाले ऑफिसशी निगडीत जुगाड. जर माबोवर पण कोणी असे जुगाड केले असतिल किंवा अनुभव घेतले असतील तर नक्कीच सांगा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users