सुखांचे बेट

Submitted by सेन्साय on 26 December, 2017 - 21:53

.

.

वाहून चालले संचिताचे किनारे
शिड़े सुटलेली अन् भरले वारे
मन हलके अलगद झाले
दुःख सांडता मोकळे सारे

ओझे प्रारब्धाचे वाहण्यासाठी
प्रत्येकाचे गलबत येथे निराळे
वारा वादळ अन् लाटा उसळणे
खेळ खेळती ब्रह्म सावळे

काळ वेग आणि दिशा यंत्रे
मग कप्तानाचे महत्व कसले
नशीबाचे पड़ता उलटे फासे
वादळच स्वतः भोवऱ्यात फसलेले

गरजांच्या तुलनेत क्षितिज पुढे सरकते
आकाश दुखांचे ढग मनसोक्त बरसते
होकायंत्र अंतर्मुख जेव्हा विचार दर्शवते
शाश्वत सुखांचे बेट मला निश्चित गवसते ...

― अंबज्ञ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त आहे कविता
कडवे ३ मध्ये मात्र माझा समजण्यात गोंधळ झाला आहे.

@mi_anu
कसला गोंधळ ?
_______________पहा ह्यातून काही मी मदत करु शकेन कदाचित

यंत्रे = aptness precision but still its Machine
कप्तान = human behind machine. Myself (उद्धरेत आत्मनाम आत्मानम)
उलटे फासे = destiny horoscopes or uncertainty like natural calamities
वादळ = संकल्प विकल्पात्मक आपले मन / to be or not to be

सुंदर !