रेशीमगाठी -३

Submitted by सुर्वेप्रतीक on 21 December, 2017 - 05:48

Reshimgathi 2.jpg

(भाग २ वरून पुढे )
खुशीची आई - तू माझ्याबरोबर येतेस समजलं
ख़ुशी - आई तुला माहितीय मला हे लग्न वगरे आवडत नाय ते . तू जा मी घरीच राहते .
खुशीची आई - हे बघ पुण्याला येऊन तुला ४ दिवस झाले .तू एकदाही घराबाहेर पडली नाहीस. ते काही नाही तुला यावंच लागेल माझ्याबरोबर .
ख़ुशी - बर येते मी नाही तर इथेआल्यापासून कशातच लक्ष लागत नाही आहे . हा बावळट ह्याला एक फोन किंवा message हि करता येत नाही .
ख़ुशीची आई - काय ग कोण बावळट ? आणि कोणाशी बोलतेयस ?
ख़ुशी -अग काही नाही ग , माझा एक मित्र आहे .तो कामानिमित्त मणिपूर ला गेलाय .४ दिवस झाले त्यांनी एकही कॉल किंवा message केला नाही .
खुशीची आई - आता समजलं इथे आल्यापासून तू एवढी उदास का आहे .अग मग एवढं प्रेम करतेस तर कर ना कॉल त्याला .
ख़ुशी - (जोरात ओरडून ) प्रेम ....आई तू ओळखते ना मला ..प्रेम वगरे ह्यात माझा इंटरेस्ट नाही आहे . आम्ही फक्त चांगले मित्र आहोत .आमचं चांगलं tunning जमत .तो मला न भेटताच मणिपूर ला निघून गेला .बावळट कुठचा .आणि मी हजार वेळा फोन केला तर ह्याचा फोन OUt of network येतोय .
ख़ुशीची आई - राहू द्या हा मॅडम .आई आहे तुझी मी . तुला तुझ्यापेक्षा जास्त ओळखते मी .
ख़ुशी - ओळखते ना .मग का माझ्या मागे लागलीस . जा ना उद्या तू तुझ्या मैत्रिणी बरोबर लग्नाला .
ख़ुशी - तुझी नाटक बंद कर आणि चल गपचूप माझ्याबरोबर
ख़ुशी व आई लग्नाला पोहचतात .ख़ुशी सगळ्यांपासून लांबच राहते .तिला सतत मानस ची आठवण येत असते .सारखा फोन on करून बघत असते कि आता करेल कॉल .आणि त्यात लग्नाचं वातावरण असल्यामुळे तिला काहीतरी अधुरं असल्यासारखं वाटत असत .ती काही तिथे जास्त वेळ थांबत नाही .आई ला सांगून तिथून निघून घरी येते . संध्याकाळी तिची आई घरी येते . तिला ख़ुशी च्या रूम मधून रडण्याचा आवाज येत असतो .ती तिच्या रूम मध्ये जाते .
खुशीची आई - ख़ुशी अग काय झालं रडतेस का ?
ख़ुशी -(पटकन स्वतःचे डोळे पुसून ) कुठे काय ?
खुशीची आई - हे बघ खर काय झालाय ते सांग मला . इथे आल्यापासून बघतेय मी तुला .पण तू समजूतदार आहेस . स्वतःचे निर्णय घ्यायला खंबीर आहेस म्हणून मी विचारत नव्हते . पण आता सांग मला काय झालय?
ख़ुशी -अग कुठे काय .डोळ्यात काहीतरी गेलय म्हणून पाणी आलंय. काहीतरी तुझं
ख़ुशीची आई - चक्क खोट बोलतेयस .तुझे डोळे सांगतायच मला .पण मी जबरदस्ती नाही करणार तुझ्यावर कारण मी तुला
ख़ुशी -(लगेच हसून ) कारण तू मला माझ्यापेक्षा जास्त ओळखतेस . माझी mamudi . लव्ह u .
खुशीची आई - लव्ह u २ माझ्या बचु. पण एक गोष्ट लक्षात ठेव ,सोबत लागते ख़ुशी .दुखातच नाही तर सुखात share करणार लागत आपल्याला . अगदी आपलं हक्काच असं माणूस .आणि म्हणूनच
ख़ुशी -(आई च वाक्य मधेच तोडून ) मी तुझ्यावर खूप प्रेम करते .
खुशीची आई - (हसून ) जाऊ दे योग्य वेळ आल्यावर समजेल तुला .
दुसऱ्या दिवशी ख़ुशी शीतल ला कॉल करते .मानसबद्दल चौकशी करते पण तिला हि काही माहिती नसत ,मग अमित ला कॉल करायचं ठरवते .आणि फोन करते .( फोन ची रिंग जाते )
ख़ुशी -हॅलो अमित . मी ख़ुशी
अमित- हाय ख़ुशी .तुझा नंबर save आहे सांगायची गरज नाही .
ख़ुशी -हम्म .कसा आहेस ?
अमित -( हसून ) मी का मानस ?
ख़ुशी - तू पण आणि(हळूच आवाजात ) मानस सुद्धा .
अमित - मी एक दम मजेत आणि मानस सुद्धा . हे थांब पण हे तू मला का विचारतेस तो तुला कॉल करत नाही का ? (मुद्दामून तिची खोड काढतो )
ख़ुशी - नाही राजे नाहीतर मी आपल्याला कॉल कशाला केला असता .
अमित - तरी बोलो आज आमची आठवण आली कशी
ख़ुशी -ते जाऊ दे .पण त्याचा फोन का लागत नाही आहे
अमित- अग तिथे नेटवर्क भेटत नाही .त्यांनी कंपनी च्या लँडलाईन वरून कॉल केलेला . त्याचे घरचे सुद्धा त्याच नंबर वर कॉल करतात . तुला देऊ का नंबर ?
ख़ुशी -( रागावून ) नको देउस .तुला कॉल करतो ना मग तुझ्याकडेच ठेव
असं बोलून फोन कट करते .थोड्यावेळानी अमितच्या मोबाईलवर ख़ुशी चा मेसेज येतो ( मला नंबर दे त्याचा )
ख़ुशी त्या लँडलाईन नंबर वर कॉल करते पण मानस बरोबर तीच बोलणं होत नाही .तो जागेवर नाही आहे असं तिला कळवण्यात येत .तो आला कि त्याला मला कॉल करायला सांगा असा message देते . दिवसभर तीच कशातही लक्ष लागत नाही . घरी कॉल करतो ,अमित ला कॉल करतो मग मला कसा विसरला हा ह्या विचारांनी ती अस्वस्थ होते .दुसरा दिवसही निघून जातो पण ह्याचा फोन काही येत नाही. आता तिला राहवत नाही आई कडे जाऊन तिला घट्ट मिठी मारून रडते .
ख़ुशी ची आई - अगदी आपल्या बापावर गेलीस तू .कधी पासून विचारतेय काय झालय तर सांगत नाही .सांग आता रडू बाई .
ख़ुशी - (रडत ) आई त्याची खूप आठवण येतेय ग .
खुशीची आई - मग का त्याच्या प्रेमाला नाही म्हणालीस .
ख़ुशी -(आश्चर्यचकित होऊन ) हे सगळं तुला कस माहित ?
खुशीची आई - तुझी आई आहे मी . त्यादिवशी तू काही मला सांगितलं नाहीस म्हणून शीतल ला कॉल केलेला मी .तिच्याकडून समजलं मला .
ख़ुशी - पण प्रेमाची मला भीती वाटते ग . आपल्या जीवनातला freedom निघून जात ग आणि पाहिलं खूप छान वाटत पण नंतर त्रास होतो याचा
खुशीची आई -(खुशीचं वाक्य अर्धवट तोडून ) त्रास आपण करून घेतो . प्रेम हे निरंतर जिवंत राहत फक्त माणसं बदलतात . मला माहितीय तू असा विचार का करतेयस . तुझे बाबा आणि मी एकमेकांवर खूप प्रेम करायचो अर्थात ते प्रेम आजही जिवंत आहे . आमचं लग्न झालं .नंतर तुझा जन्म झाला तो पर्यंत सगळं ठीक होत पण नंतर त्यांना ह्याचा त्रास व्हायला लागला कारण त्याना freedom पाहिजे होता .आणि तो मी त्यांना दिला सुद्धा .हे त्यांचं २ महिन्यानपूर्वी आलेलं पत्र . ह्यात त्यांनी आयुष्यभर एकटे राहिल्याची खंत लिहली आहे .मरणाच्या समयी सुद्धा त्यांच्या जवळ कोणीच नव्हतं .
ख़ुशी - (ओरडून ) काय ? काय बोलतेयस आई ?
खुशीची आई -(रडून ) तुला काय म्हणून मी सांगणार कारण तू त्यांचं नावही काढत नाही . आयुष्याच्या शेवटच्या समयी कुठे असतो ग तुमचा freedom . आणि प्रेमात कसलं आलाय ग हे सगळं . आपण प्रेम करतो कारण आपल्याला आयुष्यात कोणाची तरी साथ लागते . आयुष्य असं एकट्याने घालवणं सोपं नसत ग. हे माझ्यापेक्षा चांगलं कोण सांगणार तुला .आपण तरुण असतो तो पर्यंत हे सगळं सोपं वाटत पण म्हतारपणी हे सगळं कठीण होऊन बसत . तो तुझ्यावर खूप प्रेम करतो ख़ुशी .पुन्हा माझ्यासारखं त्याला एकटं पाडू नकोस.
ख़ुशी - मी चुकले आई . पण बाबा असे अचानक ..
खुशीची आई -(रडून ) मला सुद्धा माहिती नाही ग . त्यांना हार्ट अटॅक आला होता . शेवटच्या समयी सुद्धा त्यांना हॉस्पिटल मध्ये नेहायला कोणी नव्हतं . हे पञ आलं तेव्हा मी तिथे गेले . त्यांचे अतिमसंस्कार झालेलं होते .
ख़ुशी - (रडून आईला घट्ट मिठी मारते ) मी नाही असं होऊन देणार आई .पण तो आता लांब गेला आहे.
खुशीची आई - मला विश्वास आहे .येईल तो पुन्हा तुझ्याजवळ आणि त्यावेळी तू त्याला सोडू नकोस .
ख़ुशी - आई मला तुझा खूप अभिमान वाटतो.
ख़ुशी ची रजा संपते ती मुंबई ला येते .आल्या आल्या मानस च्या घरी जाते .घरात फक्त मानस ची बहीण मनाली असते.
मनाली - हाय ख़ुशी कशी आहेस .कधी आलीस ?
ख़ुशी - हि काय आताच येतेय .
मनाली -ये ना आत .
ख़ुशी - एक काम आहे माझं तुझ्याकडे .
मनाली -हो पण आत तर ये .
ख़ुशी आत येते .मनाली तिला पाणी आणून देते ,पाणी पिऊन झाल्यावर ख़ुशी बोलण्याच्या अगोदरच मनाली सुरवात करते .
मनाली - मला माहितीय तूझ काय काम आहे ते . दादा बद्दल विचारणार आहेस ना
ख़ुशी -(खाली मान करून ) हम्म ..
मनाली - बोला मॅडम .तुमच्या दोघात काय चाललंय ते आम्हाला सगळं समजल आहे
ख़ुशी - त्याचा मणिपूर चा address भेटू शकतो का ? म्हणजे त्यांनी घरी सांगितलंच असेल ना
मनाली - नाही ग . नाही सांगितलं त्यांनी . आणि फोन पण कधीतरीच करतो . जेव्हा आम्ही लावतो तेव्हा जाग्यावर नसतो . (वैतागून ) कुठे गेलाय जिथे नेटवर्क नाही . ह्याचा फोन नाही . पण तू अमित ला विचार ना तो तर त्याचाच कंपनी त काम करतो .
ख़ुशी -तुला वाटत नाही का मी विचारल नसेल. त्याला पण सुद्धा माहित नाही आहे .म्हणतो कसा माझं department वेगळ आहे .मी काही मदत नाही करू शकणार . shitt yaar आता मी काय करू .त्याच्याशी एकदा तरी माझं बोलणं होऊ दे देवा .(असं बोलून ख़ुशी डोक्याला हात लावून बसते )
मनाली -(ख़ुशी जवळ जाऊन )उदास होऊ नको ख़ुशी .दादा नेहमी म्हणतो कि माझी एक रेशीमगाठ जुळली आहे आणि ती गाठ आज मला तुझ्यात दिसली .तुझी हि तळमळ मी समजू शकते .
शीतल ला यायला आज उशीर झाला होता .ख़ुशी तिची वाट बघत सोफ्यावर बसली होती. तिला खूप असवस्थ वाटत होत म्ह्णून तिने music system जोरात लावला होता .
तेरे बिना
तेरे बिना, तेरे बिना लगता नही मेरा जिया
अब्ब तेरे सिवा चले मेरी सांसे ना रे ना
मेरे हमसफ़र फिरू दरबदर
शामो सेहर ढूंढे तुझको नजर
तेरे बिना, तेरे बिना लगता नही मेरा जिया
अब्ब तेरे सिवा चले मेरी सांसे ना रे ना
ती मानस च्या आठवणीत हरवली होती .शीतल केव्हाची आलीय हे तिला समजल सुद्धा नव्हतं .शीतल ने music system बंद केला .तरी ख़ुशी ला तीच भान नव्हतं .तेव्हा शीतल तिच्या जवळ गेली
शीतल - फुलासाठी गंध शोधताना फुलपाखराचे हाल झाले होते.
हुंगता येईल का वास आपल्याला भयाण कोडे पडले होते.
शोधले ना ना परीचे गंध... पण आवडेल का हा हि एक प्रश्न होता.
आता आवडो अथवा नं आवडो कर्म फुलपाखराने केले होते.
गंध द्यावया फुलपाखरू फुलाजवळ गेला, पाहताक्षणी फुलाला मग स्वतःच हरवून गेला.
विचारले फुलाने फुलपाखराला, काय रे कुठे हरवून गेलास ?
फुलपाखरू स्वतःशीच म्हणाला, आता कसं सांगू जीव माझा तू चोरून नेलास.
बिचारा फुलपाखरू... बिचारा फुलपाखरू...
ख़ुशी -(रडून ) शीतल .....
शीतल - जेव्हा आपला माणूस जवळ असतो ना तेव्हा त्याची किंमत कळत नाही आपल्याला . प्रेमातही असच होत ,पण मुद्दामून आपण त्याच्या पासून दूर जातो काय बरोबर ना ख़ुशी
ख़ुशी -(रडून ) आता अजून रडवणार आहेस का मला (असं बोलून तिला मिठी मारते )
शीतल -(ख़ुशी च्या डोक्यावर हात ठेवून ) त्याला एकदा पुन्हा मनापासून कॉल कर .बघूया नियती किती लांब ठेवते तुम्हा दोघांना .
ख़ुशी - करते उद्या .
दुसऱ्या दिवशी ख़ुशी ऑफिस ला जाते. गेल्या गेल्या मानस च्या ऑफिस मध्ये फोन करते . पुन्हा तेच जाग्यावर नाही म्ह्णून . मग एकदा mobile वर कॉल करून बघते .तर out of नेटवर्क. त्यात एवढ्यादिवसांनी ऑफिस ला आल्यामुळे तीच काम खूप pending असत . ऑफिस मध्ये जास्त वेळ बसून काम पूर्ण करून निघते. त्याच बस स्टॉप वर येते जिथे तिची आणि मानस ची भेट झालेली असते. तेवढ्यात तिचा फोन वाजतो .कुठचा तरी unknown नंबर असतो .ती कॉल उचलते. समोरून आवाज येतो ख़ुशी ...........ख़ुशी काहीच react होत नाही .तिचा तिच्या कानांवर विश्वासच बसत नाही . तिच्या डोळ्यात अश्रू येतात . हॅलो ख़ुशी ......
ख़ुशी -(रडक्या आवाजात ) मानस .....
मानस - हो . पण तू रडतेस कशाला .
ख़ुशी - मानस ..............
मानस - अग हो मानस च बोलतोय . भूत बघितल्या सारखं काय रिऍक्ट होतेस .
ख़ुशी - हो भूतच आहे तू .अचानक गायब व्हायचं .आणि नंतर समजत कि आपण मणिपूर ला गेलात .आणि आम्ही कोण .आम्हाला कॉल का कराल आपण . आणि आम्ही केला तर आपण जाग्यावर नसता.
मानस -झालं तुझं बोलून >>>
ख़ुशी -नाही ..का नाही फोन केलास तू मला ..मी कोण नाही का तुझी . सगळ्यांना फोन करतोस आणि मला नाही
मानस - मुद्दामूनच नाही केला . बघूया तुला माझी किती आठवण येते ते . तुझा २ वेळा फोन आला , काय miss करतेस ना मला?
ख़ुशी -(मनात -हो रे खूप मिस करतेय तुला .कस सांगू माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर ) एक ना .मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे
मानस- हा बोल .
ख़ुशी - नाही असं फोन वर नाही . तू लवकर ये ना please .
मानस - नाही ख़ुशी अजून तरी २ महिने लागतील परत यायला .
ख़ुशी - मग मी वाट बघेन तुझी . तुझ आवाज ऐकल्यावर खूप बरं वाटलं . जीवात जीव आला माझ्या .
मानस -अग पण आपण तर साधे मित्र आहोत बरोबर ना .
ख़ुशी -लवकरच कळेल तुला .
मानस - म्हणजे ?
ख़ुशी - त्यासाठी तुला लवकर यावं लागेल .
मानस - ते तरी शक्य नाही ,
ख़ुशी - ठीक आहे . मी वाट बघेन तुझी .
मानस - ओक चल ठेवतो फोन .take care बाय .
ख़ुशी - take care .बाय .
असेच दिवसेन दिवस ख़ुशी मानस च्या आठवणीत रमत असे ख़ुशी चा ऑफिसच्या कामा मध्ये वेळ निघून जात असे पण इतर वेळी ती मानस च्या आठवणीतच हरवलेली असे. आता तर तिला त्याचा भास व्हायला लागला आहे . ते दोघे जिथे जिथे जायचे तिकडे ती जात असे . ऑफिस सुटल्यावर ती coffe day मध्ये जाऊन भूतकाळात रमत असे .छत्री असली तरी पावसांत भिजत घरी जात असे . शीतल कशी बशी तिची समजूत काढत असे .तिला धीर देत असे .तिला तीच जीवन अपूर्ण आहे असं वाटू लागला होत कारण तिला त्याची सवय झाली होती .जे ती मनात लपवत होती ते तिच्या ओठांवर यायला लागला होत .ज्या गोष्टी पासून दूर पळत होती त्याच गोष्टी तिच्या जवळ यायला लागल्या होता .मानस च्या रेशीमगाठी तिला उमजू लागल्या होत्या .त्यात २ महिने निघून जातात
नेहमीप्रमाणे आजही ख़ुशी ऑफिस सुटल्यावर coffe day मध्ये जाते . तिकडे गेल्यावर सगळा coffe day खाली असतो . कोणच नसत .तेवढ्यात तिला कॉल येतो .शीतल चा कॉल असतो .ती उचलते .Happy Bday ख़ुशी असं बोलून फोन कट होतो .तेवढ्यात coffe day ची light जाते .सगळी कडे अंधार होतो .तेवढ्यात तिच्यावर एक spot light पडते .अचानक अंधारातून एक हात तिच्या समोर येतो .तो तिचा हात पकडतो .दुसरी spot light त्याच्यावर सुद्धा पडते .ती त्याला ओळखते तो मानस असतो . तिच्या डोळ्यात अश्रू येतात .एक हात हातात घेऊन दुसरा हात तिच्या कमरेभोवती ठेवून तो तिला जवळ खेचतो .तिच्या कपाळाला kiss करून तिला Happy Bday ख़ुशी असं wish करतो..त्या दोघांचा salsa डान्स सुरु असताना ,
मानस -सारे जुने दुवे, जळती जसे दिवे
पाण्यावरी जरा सोडून देऊया
ख़ुशी - माझी ही आर्जवे, पसरून काजवे
जातील या नव्या वाटेवरी तुझ्या
मानस -रस्ता नवा शोधू जरा, हातात हात दे
ख़ुशी - पुसुया जुन्या पाउल खुणा
सोबत तुझी साथ दे
दोघे हि -(हसून )ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा
कोऱ्या कागदाची, कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना .
दोघे एकमेकांन मध्ये पूर्णपणे बुडून गेलेलं असतात .अचानक त्यांच्या वरची spot light बंद होते . पुन्हा अंधार . खुशी मानस मानस म्हणून हाका मारते .तेवढ्यात सगळ्या light on होतात . तिच्या आजूबाजूला सगळा ऑफिस स्टाफ असतो आणि समोर शीतल व अमित उभे असतात . सगळेजण जोरात "Happy Bday ख़ुशी " पण तिची नजर मानस ला शोधत असते .तिच्या डोळ्यात अश्रू जमा झालेले असतात .तेवढ्यात शीतल व अमित बाजूला होतात . मानस त्यांच्या मागेच उभा असतो .तो तिच्या नजरेत पडतो .ती लगेच धावत जाऊन त्याला मिठी मारते .
मानस - मी बोलो होतो ना कि तू रडत येशील माझ्याजवळ .
ख़ुशी - I love U मानस
मानस - love u २ ख़ुशी .
तेवढ्यात अमित आणि शीतल त्यांच्या जवळ येतात आणि शीतल सुरवात करते
शीतल -मिळावे तुझे तुला…आस ही ओठी …
अमित - कोणी कुठे बांधल्या रेशीमगाठी
मानस - (ख़ुशी कडे बघून ) जुळून येती रेशीमगाठी…
ख़ुशी - (मानस च्या छातीवर आपलं डोकं ठेवून ) आपुल्या रेशीमगाठी.
ख़ुशी आणि मानस अजून हि एक मेकांच्या मिठीत सामावलेले असतात .त्यांना असं पाहताना अमित आणि शीतल चा हात कधी एकमेकांच्या हातात येतो हे त्यांना सुद्धा समजत नाही .आणि इथून सुरवात होते पुन्हा एकदा नवीन रेशीमगाठी ची .
( ह्या दोघांच्या रेशीमगाठी कधीच जुळून आलेल्या पण प्रेमाचं असंच असत. ते कधी व्यक्त होत तर कधी नाही .प्रेम हे तेव्हाच टिकते जेव्हा ते दोघांनाही हवे असते .आपली गाठ आपणच बांधायची असते आणि ती पण मजबूत असायला हवी .त्यालाच तर रेशीमगाठ म्हणतात .)
(समाप्त).

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त

मस्त आहे कथा. Happy
खूप दिवसांनी नवीन भाग आल्याने मागचे संदर्भ विसरायला झाले होते. पण कथा मात्र खूप आवडली.

प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद ..पहिल्या दोन भागाची लिंक मी खाली देत आहे त्यामुळे तुम्हाला एकाच वेळी इंटरेस्ट न जाता कथा वाचता येईल.
https://www.maayboli.com/node/64502
https://www.maayboli.com/node/64593

Khup Aawadli Katha.haluwar ani balanced.
Jashi tumhi aata link dilit saglya bhaga chi Tashi dar weli aadhiche n puchachya bhag link takun update kela tar khup continuity yeil ani wachayla soppa hoil. Tumhi wachakanche Che reply wachun dakhala gheta mhanun suggestion dila.saglyani asa linking kela tar chanach.