ती मी नव्हे...

Submitted by navya on 19 December, 2017 - 03:44

तुला माहिती आहे, तु रोज माझ्या स्वप्नात येतोस, काहीसा गुणगुणत थोडासा अल्लडपणे मला एका वेगळ्या जगात घेउन जातोस
पण तु जिच्या स्वप्नात रमतोस ती मी नव्हे माहिती आहे मला...
तुला माहिती आहे पावसात भिजताना प्रत्येक थेंबात तुझी आठवण भरलेली असते
काहीसे नि:शब्द काहीसे बोलके ते थेंब झेलताना वेळ ही थिजलेली असते
पण पाऊस बघुन तुला जिची आठवन येते ती मी नव्हे माहिती आहे मला..
तुला माहिती आहे तुला आठवताना नकळत एक कविता माझ्या ओठांवर येते
तुझा हसरा चेहरा आणि गालावर पडणारी खळी याबद्दल ती कविता सारं काही सांगून जाते
पण तुझ्या मनावर कोरलेली एकमेव कविता ती मी नव्हे माहिती आहे मला....
सगळं माहिती आहे रे मला पण या वेड्या मनाला काही पटत नाही सगळं समोर असूनही ह्याला काही दिसत नाही
तु एकदा सांग ना तु एकदा समजाव ना
पण तु जिला हे हक्काने सांगू शकशील ती मी नव्हे माहिती आहे मला...

Group content visibility: 
Use group defaults