एक नितांतसुंदर एकांत

Submitted by बेफ़िकीर on 14 December, 2017 - 12:16

स्फुट - एक नितांतसुंदर एकांत

एक नितांतसुंदर एकांत हवा आहे
ज्यात नसेल माझे शरीर
ज्यात सहज कळतील सगळ्या अगम्य, दुर्बोध कविता
आणि पटेल की त्या शरीरांनीच रचलेल्या होत्या
जे शरीरासकटही पटते आहेच
पण एका शरीराला ते पटल्यामुळे
इतर शरीरांना मान्य करायचे नाहीये

तुझ्या अंगाला लगडणारे
एक चिरगुट हवे आहे
आपण शरीर आहोत
हे आठवत राहण्यासाठी

एक जन्म हवा आहे
जो झाल्याचे कळत नाही
एक मृत्यू हवा आहे
जो आल्याचे कळत नाही

आणि शेवटी हवी आहे एक अवस्था
जिथे काहीही
'हवे आहे'ह्या सदरात मोडत नाही

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान आहे.
पण अशा एकांताला सुंदर म्हणता येईल का? Happy